शिवणी, भोजराज देशमुख। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत किनवट तालुक्यातील शिवणी येथील अक्षरा संतोष जाधव व अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींनी उत्कृष्ट कामगिरी करीत पुढील महिन्यात १७ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपली निवड कायम केली. या यशाबद्दल या दोन्ही भगिनींना विविध स्थरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
कु.अंतराने १४ वर्षाखालील वयोगटात इंडियन प्रकारात खेळताना सर्वोत्कृष्ट गुणाची कमाई केली. तर अक्षराने १७ वर्षे वयोगटात इंडियन प्रकारात खेळताना तृतीय क्रमांक मिळवीत राज्यस्तर स्पर्धेत आपला प्रवेश मिळविला आहे.नारायना ई टेक्नो स्कुलमधे १० व्या वर्गात शिकणाऱ्य अक्षराचे शाळेचे प्राचार्य प्रविण कुमार , क्रीडाशिक्षक इरफान खान यांनी दोघींचे अभिनंदन केले. असून ८ वीत श्री चैतन्य टेक्नो स्कुलमधे शिक्षण घेत असलेल्या अंतराचे शाळेच्या प्राचार्या डॉ बलदिप कौर ओबेरॉय , क्रीडा शिक्षक संदिप पाटील यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत .
दोघी बहीनीच्या या यशाबदल् त्याचे आई,वडील संतोष जाधव, बाबुराव खंदारे,याच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील महिण्यात १७ ते २० ऑक्टोबर दरम्यान नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी संतोष जाधव यांच्या दोन्ही मुलींना किनवट भाजापा तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, सरपंच लक्ष्मीबाई डुडुळे , माजी सरपंच शांताबाई मोहिते,उपसरपंच सुनिता संतोष जाधव , महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती कमलबाई देशमुख, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बालगंगाराम भुशिवाड, भोजराज देशमुख, बाळासाहेब कल्याणकर,निलेश कन्नावार ,संग्राम बिरकुरे, उमाकांत देशमुख, हनमंतु भुशिवाड,निलेश कोडगिरे,यादव आमले, राजू बेहरे,सुनील पांडे,राहुल वाठोरे, विनोद मोहिते, शेख जब्बार तल्लारीकर,भुशन बोंदरवाड,किनवट तालुका क्रीडा शिक्षक संदीप येशीमोड,पत्रकार प्रकाश कार्लेवाड,यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत.