Ms akshara & ms antara selection ; शिवणी येथील कु .अक्षरा व कु.अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींची राज्यस्तर धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड -NNL
शिवणी, भोजराज देशमुख। जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व नांदेड जिल्हा आर्चरी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने दि.२६ ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान श्री गुरुगोविंद सिंघजी स्टेडियम येथे आयोजित विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत किनवट तालुक्यातील शिवणी येथील अक्षरा संतोष जाधव व अंतरा संतोष जाधव या दोघी बहिणींनी उत्कृष्ट कामगिरी करीत पुढील महिन्यात १७ ते २० ऑक्टोबर २०२४ दरम्यान होणाऱ्या राज्यस्तर शालेय धनुर्विद्या स्पर्धेसाठी आपली निवड कायम केली. या यशाबद्दल या दोन्ही भगिनींना विविध स्थरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय प्रशिक्षिका वृषाली पाटील जोगदंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .
कु.अंतराने १४ वर्षाखालील वयोगटात इंडियन प्रकारात खेळताना सर्वोत्कृष्ट गुणाची कमाई केली. तर अक्षराने १७ वर्षे वयोगटात इंडियन प्रकारात खेळताना तृतीय क्रमांक मिळवीत राज्यस्...
