उस्माननगर, माणिक भिसे| लोहा तालुक्यातील येळी येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्याचे उद्देशाने कांही वाळू माफियांकडून इंजिनच्या साह्याने चालणारी वोट एका कंटेनर मधून नदीकडे दाखल होत असल्याचे गोपनीय माहितीवरून महसूल पथकाने शनिवारी (ता.१४) रोजी सायंकाळी आठच्या दरम्यान ही बोट उस्माननगर पोलिसांच्या ताब्यात दिली.


यावर लोहा तहसीलदार यांच्याकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कापशी मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे यांनी सांगितले. येळी, चिंचोली, कौडगाव, कामळज गोदावरी नदीपात्रातून वाळू माफियांकडून बिनदिक्कतपणे अवैध वाळू उपसा व वहातूक करून मनमानी भावाने बांधकामासाठी दिली जाते मात्र अलीकडे अवैध वाळू उपसा विरोधी महसूलचे पथक ॲक्शन क्शन मोडवर आले असून पोलिसांच्या मदतीने अवैध वाळू उपसा विरोधात धडक कारवाई सुरूच आहे त्या अनुषंगाने शनिवारी (ता.१४) रोजी सायंकाळी डोणवाडा शिवारातील गायरान क्षेत्रात कंटेनर क्रमांक ( एमएच ४६ बीडी. ७१७७) मध्ये ठेवून ही बोट नदीपात्रात सोडून

अवैध वाळू उपसा करणार असल्याचे आढळून आले. त्यामूळे वेळीच महसूल विभागाच्या पथकाने कंटेनर व बोट पकडून उतरण्यापूर्वीच पकडून उस्माननगर पोलिसांच्या ताव्यात सदर वाहन व बोट दिली असून लोहा तहसीलदार यांचेकडून दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती मंडळ अधिकारी दिली.
