नांदेड| भाजपा महानगरच्या वतीने महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस कोणतीही होर्डिंग ,बॅनरबाजी न करता रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येणार आहे.


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्तानं पक्षाचे कोणतेही नेते, कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत. वृत्तपत्रातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत. असं केल्यास तो पक्षशिस्तीचा भंग मानण्यात येईल असे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले होते पक्षाच्या धोरणानुसार भाजपा महानगरच्या वतीने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय महानगराध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर यांनी घेतला आहे.


शहरातील छ.शिवाजीनगर मंडळाच्यावतीने हनुमान मंदिर येथे, नांदेड उत्तर ग्रामीण मंडळाच्यावतीने, काबरानगरच्या परशुराम चौक, जंगमवाडी मंडळाच्यावतीने, श्रीनगरच्या पंचशील ड्रेसेसजवळ, तरोडा सांगवी मंडळाच्यावतीने, भावसार चौक, नवा मोंढा मंडळाच्यावतीने अण्णाभाऊ साठे चौक, हनुमान पेठ मंडळाच्यावतीने, हनुमान पेठ मुथ्था चौक, सराफा, गाडीपूरा मंडळाच्यावतीने, जुना मोंढा टॉवरजवळ, सिडको मंडळाच्यावतीने, सिडकोच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ तर नांदेड दक्षिण ग्रामिण मंडळाच्यावतीने, धनेगाव ग्रामपंचायत कार्यालयाजवळ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


शहरातील या महारक्तदान शिबीरात अधिकाधिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक महानगराध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर, मंडळ अध्यक्ष अमित वाघ, बंडू पावडे, आशीष नेरलकर, सुनिल राणे, भालचंद्र पवळे, अंबादास जोशी, आशीषसिंह ठाकूर, सचिन रावका व विश्वांभर शिंदे यांनी केले आहे.



