श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | तीर्थक्षेत्र माहूर गडावर जाणाऱ्या रस्त्याला लागून असलेल्या टेकडीवर स्थित नवसाला पावणाऱ्या श्री गणेश मंदिराला जाण्यासाठी रस्त्याची मागणी अनेक भाविक करत होते परंतु आजी माजी पदाधिकाऱ्यांनी याकडे सतत दुर्लक्ष केले त्यामुळे मंदिरावर जाणाऱ्या अनेक भाविकांना ठेचकाळत जावे लागत होते त्यामुळे भाविकांच्या मागणीची दखल घेत भाजपाचे एकमेव नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे कडे सतत पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केल्याने श्री गणेश भक्त भाविकां कडून त्यांचे अभिनंदन होत आहे
माहूर गडावरील देवस्थानावर जाणाऱ्या रस्त्याला लागून पौराणिक नवसाला पावणाऱ्या श्री गणेशाचे मंदिर असून या मंदिरावर गडावर जाणारा प्रत्येक भाविक दर्शन घेऊन जातो तसेच जाताना दर्शन न झाल्यास परत येताना तरी प्रत्येक भाविक दर्शनासाठी येत असतो तसेच नवसाला पावणारा गणपती अशी मोठी आख्यायिका या मंदिरा सोबत जुळलेली असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत आपापले नवस करतात, येथील पुजारी गजानन कुलकर्णी यांनी अनेक वेळा शासनासह आजी-माजी पदाधिकाऱ्याकडे येथे रस्ता विद्युत व्यवस्था पाणी व्यवस्था करून देण्याची मागणी केली होती परंतु कोणीही लक्ष दिले नसल्याने भाविकांना त्रास होत होता.
श्री गणेशाचे भक्त सागर उर्फ गोपू महामुने यांचे कडे गजानन कुलकर्णी यांनी रस्ता करून देण्याची मागणी केल्याने त्यांनी याची दखल घेत भाजपाचे माहूर शहरातील नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी विद्यमान आमदार भीमराव केराम यांच्याकडे पाठपुरावा केल्याने त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये निधी मंजूर केला व नियमानुसार उत्कृष्ट दर्जा राखत काम पूर्ण करून घेतले,दर्शनासाठी येणारे लहान मुले महिला वृद्ध भाविकातून नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त होत अभिनंदन होत आहे
“श्री गणेश मंदिरावर जाणाऱ्या रस्त्याची मागणी विद्यमान आमदार भीमराव केराम यांचे माध्यमातून पूर्ण करण्यात आली असून येथे विद्युत रोशनाई रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याचा संकल्प असून गडावरील सर्व देवस्थानांचा विकास तसेच पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी विकास आराखड्याचा पाठपुरावा केल्याने तीर्थक्षेत्रावरील अनेक विकास कामे शहरातील रस्त्याची कामे मार्गी लागत आहेत असे विद्यमान भाजपाचे नगरसेवक सागर उर्फ गोपू महामुने यांनी सांगितले”