नांदेड| ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगाराना अटक करण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी पोलिस निरीक्षक भाग्यनगर यांना आदेशीत केले होते त्यानुसार पो.नि. शेडंगे यांनी गुन्हे शोध पथकास माली गुन्हयातील आरोपोतांचा शोध घेवुन गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या.


पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दि.29/08/2024 रोजी पो.स्टे.भाग्यनगर गु.र.न. 421/24 कलम 331 (3).305 BNS प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयात पोलिस निरीक्षक रामदास शेंडगे यांचे आदेशाने पो.स्टे भाग्यनगर गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.केजगीर व पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे आरोपी निषपन्न करुन दि.30/08/2024 रोजी पेट्रोलिंग दरम्यान ऐ. के. संभाजी मंगलकार्यालया जवळ सदर गुन्हयातील विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन गुन्हयातील गेलामाल संबधाने विचारपुस करत सदर विधीसंघर्षीत बालकाचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मालापैकी सोन्याचे दोन पेंडॉल सोन्याचे मनी 16 नग एक सोन्याची चैन व एक घडी असे चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आनला आहे. तसेच पो.स्टे. भाग्यनगर नांदेड येथील मोबाईल मिसींग मधील दोन अॅन्ड्रॉइड मोबाईल हस्तगत करण्यात आले.

सदरची कामगीरी ही मा.श्री अविनाश कुमार पोलिस अधिक्षक नांदेड, मा.श्री सुरज गुरव अप्पर पोलिस अधिक्षक नांदेड, मा.श्री खंडेराव धरने अप्पर पोलिस अधिक्षक भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली श्री रामदास शेंडगे पोलिस निरीक्षक भाग्यनगर, गुन्हे शोध पथक पो. स्टे भाग्यनगर चे पो.उपनि के.बि. केजगीर पो.हे.कॉ 2150 विशाल माळवे, पो.हे.कॉ 1098 गजानन किडे, पो.कॉ.516 हनवता कदम, पो.कॉ. 932 / अदनान पठान यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
