Kamari village flooded due to heavy rain water : अतिमुसळधार पावसाच्या पाण्यामुळे कामारी गावाला पुराचा वेढा; पिंपरीचा संपर्क तुटला – NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ – मराठवाड्याच्या सीएमवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आल्याने लाखाडी नदीही दुथडी भरून गेली आहे. या पुराच्या पाण्याने मौजे कामारी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या ठिकाणी लाखाडी, कयाधू आणि पैनगंगेचा संगम असल्याने गावातील हनुमान मंदिरासह अनेक दुकाने पाण्यात गेली आहेत. एवढेच नाहीतर पुराच्या पाण्याने परिसरातील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापूस, हळद उसासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत एकही पुढार्यांनी किंवा महसूल अधिकारी कर्मचारयांनी गावाला भेट देऊन साधी विचारपूस देखील केली नसल्याने खंत शेतकरी, नागरीकातून व्यक्त केला जात आहे.

कयाधू नदीसह पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने बाजूलाच असलेल्या पिंपरी गावच्या रस्त्यावर पाणीच पाणी आले असून, वीरसनि आणि कामारीच्या मध्यभागी असल्याने पिंपरी आणि विरसनी गावचा तीन दिवस्पुन दोन्ही गावाशी संपर्क तुटलेला आहे. या गावातील नागरिकांना उदरनिर्वाहाचे साहित्यासाठी पुरातून पोहत येऊन मार्ग काढावा लागत आहे. तर हि बाब लक्षात घेता या ठिकाणच्या पुलाची कामे करण्यात येऊन पुन्हा गावचा संपर्क तुटणार नाही यासाठी राजकीय नेत्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी गेली अनेक वर्षपासून होत असताना देखील याकडे कुणीच लक्ष देत नसल्याची ओरड होऊ लागली आहे. मागील वर्षी इसापूर धारण ओव्हरफ्लो झाल्यामुळे पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी सुद्धा या कामारी गावात पाणी आले तर पिंपरी गावचा संपर्क तुटला होता.

या पुराच्या पाण्यामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदा मात्र पाहल्यांदाचं ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात वरून राजा आक्रमक झाल्यामुळे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी लादली आहे. उमरखेड कडे जाणाऱ्या बोरी पुलावरून पाणी वाहू लागल्याने अतिवृष्टीचा पावसामुळे पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने नदीकाठावरील गावकर्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकूणच तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीपिके पाण्याखाली आली असून, नदी नाल्याच्या काठावरील शेतपिके खरडून वाहून गेली आहेत. तसेच अनेक गावातील आणि हिमायतनगर शहरातील घरांची पडझड झाली आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि नदीकाठच्या कामारी, पळसपूर, विरसनी, पिंपरी, घारापुर, गावात पाणी शिरण्याची भीती असल्याने महसूल पथकाने लक्ष देऊन गावातील नागरिकांना धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिमायतनगर तालुक्याकडे लक्ष केंद्रित केले असून, प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. आज नायब तहसीलदार तांडेवाड यांनी पैनगंगा नदीकाठावर भेट देऊन पुरच्या पाण्याजवळ कुणीही जाऊ नये अश्या सूचना दिल्या आहेत. पुराच्या पाण्याने कामारी गावात येणारे रस्ते बंद झाल्यामुळे काही शेतीमध्ये वानरांच्या टोळी झाडावर अडकल्या आहेत. तसेच नदीकाठावरील डोल्हारी येथे देखील तीन दिवसापासून १५ वानर झाडावर अडकून पडलाय आहेत. याबाबतचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आज वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी येऊन वानरांना अण्णा पुरवठा केला असला तरी पूर जास्त असल्याने रेस्क्यू करणे जमले नसल्याचे गावकर्यांनी सांगितले आहे. पुरच्या पावसाने जनावरांचा चारा पाण्यात भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. हि बाब लक्षात घेता हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत शासनाकडून देण्यात यावी, आणि पुरामुळे धोका होऊ पाहणाऱ्या गावाकडे विशेष करून लक्ष देऊन शेतकऱ्यांना व नागरिकांना या पुराच्या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी शेतकरी नागरिकांनी केली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button