Kamari village flooded due to heavy rain water : अतिमुसळधार पावसाच्या पाण्यामुळे कामारी गावाला पुराचा वेढा; पिंपरीचा संपर्क तुटला – NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| विदर्भ - मराठवाड्याच्या सीएमवरून वाहणाऱ्या हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीला महापूर आल्याने लाखाडी नदीही दुथडी भरून गेली आहे. या पुराच्या पाण्याने मौजे कामारी गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. या ठिकाणी लाखाडी, कयाधू आणि पैनगंगेचा संगम असल्याने गावातील हनुमान मंदिरासह अनेक दुकाने पाण्यात गेली आहेत. एवढेच नाहीतर पुराच्या पाण्याने परिसरातील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापूस, हळद उसासह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत एकही पुढार्यांनी किंवा महसूल अधिकारी कर्मचारयांनी गावाला भेट देऊन साधी विचारपूस देखील केली नसल्याने खंत शेतकरी, नागरीकातून व्यक्त केला जात आहे.
कयाधू नदीसह पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याने बाजूलाच असलेल्या पिंपरी गावच्या रस्त्यावर पाणीच पाणी आले असून, वीरसनि आणि कामारीच्या मध्यभागी असल्याने पिंपरी आणि विरसनी गावचा तीन द...
