हदगांव, शेख चांदपाशा| हदगांव शहरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या मुलीला फुस लावुन पळवुन नेल्या प्रकारणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीचा योग्यरित्या तपास न करता आरोपीस अद्याप अटक केली नाहीं. त्यामुळे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल हदगांव शाखेतर्फे आज पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.


हदगांव शहरात राहणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील १४ वर्षे वयाची असलेल्या अल्पवयीन मुलीला दुसऱ्या धर्मातील तरुणांनी संगणमत करून तिच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेले. या घटनेला एक महिना लोटला तरी अद्याप पोलिसांनी यातील गुन्हेगारांना शोधून अटक केली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या प्रकरणात योग्य गुन्हा व योग्य तपास न करता थातुरमातुर तपास करुन आरोपींना पाठीशी घालण्यात आल्याचा आरोप पिडीतेच्या कुटुंबीयांनी व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आला आहे.



सदर प्रकरणात पोलिसांनी योग्य कलम लावले नसल्याच ही आरोप पोलीसावर करण्यात येत असून व योग्य त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नसल्यामुळे एका आरोपीला अटक केली असली तरी तो मोकाटच फिरत आहे. मुख्य आरोपीला तर पोलिसांनी हटकले सुद्धा नाही असा गंभीर आरोप ही करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास करणाऱ्या व प्रकरणाशी संबंधित सर्व जबाबदार अधिकाऱ्याची चौकशी करुन सदरील अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे. सदर प्रकरणी पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पवार यांच्या नेतृत्वाखाली आणलेल्या मोर्चाद्वारे बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली आहे.


अन्यथा विश्व हिंदु परिषद व बजरंग दल हदगांव यांच्यावतीने जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा बजरंग दलाच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी बजरंग दलाचे किनवट जिल्हा संयोजक चंद्रकांत पवार, यांच्या नेतृत्वाखाली बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हदगांव पोलीस ठाण्यात मोर्चा काढून आंदोलन केले. याप्रकरणी बजरंग दलाच्या लेटर पॅडवर पोलीस ठाण्यात निवेदन घेतले नसल्यामुळे हदगांव तहसील कार्यालयात निवेदन देऊन दि. मंगळवारी मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. या मोर्चासाठी बजरंग दलाचे जिल्हा संयोजक चंद्रकांत पवार, माजी नगरसेवक बाळा माळोदे, कैलास महाजन, शिव पोगरे, बालाजी चिंचोलकर, केदार जाधव, अनिल माळोदे, जगदीश कदम, कृष्णा देशमुख, आशिर्वाद माळोदे, गजानन पांचाळ, युवराज काळे, पंजाब हुलगुंडे सोमेश कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पोलीस व जनता समन्वयक आवश्यक..!
सध्या हदगाव शहरात परिसरात विविध गंभीर घटनेचे प्रमाण वाढत असून यामध्ये पोलिसांचे अपुरी संख्या जिल्हा पोलीस अधीक्षकांची दुर्लक्ष परिणाम स्वरूप विविध गंभीर गुन्हाचे होण्याचे प्रमाण वाढत वाढत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे पोलीस जनता याचा अजिबात समन्वय दिसून येत नाही येत नाही . परिणाम स्वरूप अशा घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येत आहे उल्लेखनीय आहे.

