आरोग्यनांदेड

World Hepatitis Day : जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील औषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त विशेष जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हिपॅटायटिस-बी हा आजार एचआयव्हीपेक्षा जास्त सहजतेने पसरणारा व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणारा आहे. या दिनानिमित्त हिपॅटायटिस बी चाचण्या, औषधोपचार व लसीकरणच्या मुबलक प्रमाणात उपलब्धतेबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आज माहिती दिली. आरोग्य कर्मचा-यांनी त्याचा पुरेपुर लाभ घेण्यासाठी आवाहन केले. आरोग्यसेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःच्या सुरक्षेचे भान ठेवणे आणि संसर्गाच्या जोखमीबाबत सजग राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी प्रबोधन करून हा दिवस साजरा करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन औषधवैद्यकशास्त्र विभागाकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. राहुल देशमुख यांनी हिपॅटायटिसचे प्रकार, लक्षणे, निदान व उपचार याविषयी सोप्या शब्दात माहिती दिली. दिर्घकालीन यकृतावर होणारे बदल, यकृताचा सिरोसिस, निकामी होणे आणि यकृताचा कर्करोग यासारखे गंभिर परिणामाबद्दल माहिती दिली. त्यांनी सध्या वापरात असलेली नवीन औषधे, रोगनिदानासाठी उपलब्ध तपासण्या व उपचार पद्धतीवर प्रकाश टाकला.

औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. शितल राठोड यांनी हिपॅटायटिस आजार, त्यावरील उपचार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आजारपणावर उपचार करण्याबरोबरच आजार होऊच नये, यासाठीची भूमिका डॉक्टरांनी बजावणे ही काळाची गरज आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यांनी हिपॅटायटिसचे प्रकार A, B, C, D आणि E यांचे संसर्गाचे मार्ग, आजाराचे टप्पे, लक्षणांची तीव्रता आणि संभाव्य गुंतागुंती याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय विषाणूजन्य हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम, लसीकरण सुविधा आणि औषधोपचार याविषयी माहिती दिली.

जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम 2 scaled World Hepatitis Day : जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

डॉ.सुभाष मोरे यांनी हिपॅटायटिस बी संसर्गानंतरचे प्रतिबंधक उपाय या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष धोका असलेल्या परिस्थितीमध्ये कोणते तातडीचे पावले उचलावीत हे त सोप्या आणि परिणामकारक भाषेत स्पष्ट केले. त्यांनी संस्थेमध्ये Needle Stick Injury Protocol”, तसेच लसीकरण नोंदी व प्रतिबंधक उपचार व्यवस्थापन यांच्याबद्दल माहिती दिली.

डॉ. संजय मोरे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र यांनी संस्थेमध्ये उपलब्ध असलेल्या विविध चाचण्यांची माहिती दिली. जनऔषध वैद्यकशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ.आय. एफ. इनामदार यांनी Hepatitis Vaccination Schedule यावर सविस्तर माहिती दिली व संवादादरम्यान लसीकरणाचे महत्त्व समजावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा एस. बोलके सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र विभाग यांनी पार पाडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. गोडबोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय कापसे तसेच उप अधिष्ठाता डॉ. वाय. एच. चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ. एस.आर.वाकोडे (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग) डॉ. चंडालिया (औषधशास्त्र विभाग), डॉ. अनिल देगावकर (शल्य शास्त्र विभाग), डॉ. वंदना दुधमल (शरिरशास्त्र विभाग), डॉ. किशोर राठोड (बालरोगशास्त्र विभाग), डॉ. अरविंद चव्हाण (बालरोगशास्त्र विभाग), डॉ. संजीव झांगडे (श्वसनविकार शास्त्र विभाग), डॉ. उमेश अत्राम (मनोविकार विभाग) डॉ. मुंकुंद कुलकर्णी तसेच इतर निवासी डॉक्टर, नर्सिंग व पॅरामेडिकल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. उबेदुल्ला खान यांनी समर्पक शब्दांत आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या पुढाकाराने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डॉ. कपिल मोरे, डॉ. फारुकी राफे, डॉ. भारती राठोड, डॉ. मोहन भंडारे, डॉ. संदीप उप्पोड, डॉ. अमितकुमार पोतुलवार, डॉ. गोविंद लोणे, डॉ. संपदा पन्नु, डॉ. महेश देशमुख, डॉ. मुस्कान सुतारीया, डॉ. देव अटारा, डॉ. मोहन मुलगीर, डॉ आयुषी केवलीया परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी पार पडला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!