World Hepatitis Day : जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम
नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदेड येथील औषध वैद्यकशास्त्र विभागाच्यावतीने जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त विशेष जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हिपॅटायटिस-बी हा आजार एचआयव्हीपेक्षा जास्त सहजतेने पसरणारा व मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करणारा आहे. या दिनानिमित्त हिपॅटायटिस बी चाचण्या, औषधोपचार व लसीकरणच्या मुबलक प्रमाणात उपलब्धतेबद्दल अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी आज माहिती दिली. आरोग्य कर्मचा-यांनी त्याचा पुरेपुर लाभ घेण्यासाठी आवाहन केले. आरोग्यसेवा देणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःच्या सुरक्षेचे भान ठेवणे आणि संसर्गाच्या जोखमीबाबत सजग राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी प्रबोधन करून हा दिवस साजरा करण्याचा कार्यक्रमाचे आयोजन औषधवैद्यकशास्त्र विभागाकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुर...
