Marathi journalists association ; नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी अनिल कसबे तर सरचिटणीसपदी अनुराग पोवळे

मुंबई। नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारणीची आज बुधवारी घोषणा करण्यात आली. या कार्यकारिणी मध्ये कार्याध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे तर सरचिटणीस पदाची जबाबदारी पत्रकार अनुराग पोवळे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये नऊ उपाध्यक्ष, ११ संघटक यांच्यासह ४० जणांचा समावेश आहे.

मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी जिल्हा कार्यकारणीला मान्यता देण्याची शिफारस मराठी पत्रकार परिषदे कडे केली होती. त्यानुसार त्यानुसार सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा प्रभारी प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी आज मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जिल्हा कार्यकारणीची अधिकृतरित्या घोषणा केली. सदर कार्यकारिणीची मुदत जिल्हाध्यक्ष यांच्या कार्यकाळा पर्यंत राहणार आहे. तसेच नविन अध्यक्षाची निवड लोकशाही पद्धतीने होणार असल्याचे प्रा. नाईकवाडे यांनी जाहीर केले आहे.

यामध्ये नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी अनिल कसबे यांची तर सरचिटणीसपदी अनुराग पोवळे यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारणीत नऊ उपाध्यक्ष, अकरा जिल्हा संघटकही निवडण्यात आले आहेत. नूतन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अनिल कसबे यांची निवड करण्यात आली आहे सरचिटणीस पदाची जबाबदारी पत्रकार अनुराग पोवळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पत्रकार संघाच्या जिल्हा समन्वय समितीची प्रमुख जबाबदारी प्रकाश कांबळे, विजय जोशी, चारुदत्त चौधरी, ॲड. प्रदीप नागापूरकर, गोवर्धन बियाणी आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांच्याकडे राहणार आहे.

या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी सुनील श्रीमनवार (किनवट), जी.पी.मिसाळे (धर्माबाद), ॲड.दिगंबर गायकवाड (कंधार), प्रभाकर लखपत्रेवार (नायगाव), बी. आर. पांचाळ (भोकर), राजेश शिंदे राजापूरकर (नांदेड), राजेंद्र कांबळे (बिलोली), ॲड.संदीप कामशेट्टे (मुखेड) आणि गजानन पाटील (हदगाव) यांची निवड करण्यात आली आहे.

परिषद प्रतिनिधी म्हणून सुभाष लोणे (अर्धापूर), सर्फराज दोसानी (माहूर) हे काम पाहतील. कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी बजरंग शुक्ला (नांदेड) यांच्याकडे देण्यात आली आहे. जिल्हा पत्रकार संघाचे मुख्य संघटक म्हणून अविनाश पाटील (नांदेड) तर सह जिल्हा मुख्य संघटकपदी मनोहर कदम (नांदेड) तसेच जिल्हा संघटक म्हणून प्रदीप वाकोडीकर (किनवट), पंडित पतंगे ( हदगाव ), परमेश्वर गोपतवाड (हिमायतनगर), अभय कुळकजाईकर (नांदेड), सुनील पारडे (नांदेड),दिलीप वाघमारे (नायगाव), सुनील पोळकर ( मुखेड), शेख अहमद (लोहा), संजय कोलते (मुदखेड), ॲड.सत्यनारायण मानसपुरे (कंधार) आणि अमृत देशमुख हे कार्यरत राहतील.

जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव म्हणून ईश्वर पिनलवार (मुदखेड), रुपेश पाटील (देगलूर), राजेश वाघमारे (भोकर) तसेच राज ठाकूर (माहूर) यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी प्रा.शरद वाघमारे (अर्धापूर) व सह प्रसिद्धी प्रमुख, म्हणून सुभाष काटकांबळे (नांदेड) यांना संधी देण्यात आली आहे. कार्यकारिणी सदस्यपदी जयकुमार अडकिने (माहूर), शेख हुसेनी (उमरी), रमेश ठाकूर (सिडको नांदेड), ज्ञानेश्वर सुनेगावकर (नांदेड) आणि सचिन डोंगळीकर (नांदेड) यांची निवड झाली आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे,विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे, अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष ॲड.प्रदीप नागापूरकर, गोवर्धन बियाणी व जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button