किनवट | परमेश्वर पेशवे……..समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने लिखाणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे पत्रकार म्हणून परमेश्वर पेशवे यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दि.18रोजी झालेल्या हिवरा येथील राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांना सन्मान चिन्ह देऊन व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता.१८) रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, तालुका व सर्कलनुसार युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करून जिथे छोट्या – मोठ्या, ग्रामीण आणी शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने पञकारांची संघटना करून पूर्ण महाराष्ट्र भरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद नं करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी जो विडा उचलेला आहे. त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणी याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वतोपारी मदत होत असल्याने या संघटनेमध्ये राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणी एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असेही त्यांनी राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी आपले मत व्यक्त केले. सदर राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेञातिल मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उमरखेड महागांव विधानसभा मतदार संघाचे मा. आमदार राजेंद्र नजरधने प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत साईनाथ महाराज , शाम महाराज भारती, महागाव पंचायत समितीचे माजी सभापती विजय महाजन,पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे, युवा ग्रामिण पञकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते माणुसकीची भिंत, सामाजिक संस्था पुसद, रवींद्र बाबूसिंग जाधव, कायदेविषयक सल्लागार, कु.माधुरी दिपक कटकोजवार, उत्कृष्ट महिला पत्रकार, युवा ग्रामीण पत्रकार संग,दिग्रस, उत्कृष्ट तालुका, युवा ग्रामीण पत्रकार संग,अहमदनगर, उत्कृष्ट जिल्हा, आतिश गेंटलवार, युवा उद्योजक, परमेश्वर पेशवे तालुका प्रतिनिधी किनवट उत्कृष्ट पत्रकार, सत्कार महामुने, उत्कृष्ट युवा पत्रकार, पुरुषोत्तम कुडवे ग्रामपंचायत झिरपूरवाडी, उत्कृष्ट सरपंच, सौ.शितल गोविंद गावंडे, उत्कृष्ट पोलीस पाटील.
जिजाऊ ज्ञान मंदिर सेमी इंग्लिश स्कूल मुखेड, उत्कृष्ट शाळा, अमृतराव दादाराव देशमुख, प्रगतशील शेतकरी, श्री रेणुका देवी कबड्डी क्लब माहूर, क्रीडा पुरस्कार डॉ.अजय जाधव माहूर, वैद्यकीय सेवा, राष्ट्रसंत साईनाथ महाराज, आध्यात्मिक, एकनाथ माधवराव डुमने, उत्कृष्ट शिक्षक तसेच उत्कृष्ट पत्रकार म्हणून जयवंतराव भागानगरकर, पाटणबोरी, दिपक मेढे, अहमदनगर, करण धोंगडे, वाशिम, वसंत कपाटे, माहूर, प्रभाकर पांडे, नांदेड, लक्ष्मण टेकाळे, दिग्रस, विनोद कनाके,केळापूर, शरद तांबे,अहमदनगर, बाळकृष्ण भोसले, अहमदनगर, सतीश आकुलवार, चंद्रपूर, रितेश पुरोहित, महागाव, भगवान कांबळे, धर्माबाद, जयश्री घोडके,बीड, विजय आमले, माहूर, भाऊराव कोटकर, वर्धा, लुकमान आहेमद लतिफ आहेमद पठाण, दिग्रस, राजू सोनुने, पुसद, कांता राठोड, पुणे, गणेश महाडिक, पुणे, अशोक मंडलिक, राहुरी, सचिन वैद्य, वर्धा, राजू राठोड, पुसद, संजय करवटकर, राळेगाव प्रदीप ईश्वरमलजी मेहता, दिग्रस यांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा ग्रामिण पञकार संघटणेच्यावतीने करण्यात आले होते.