Award distribution ceremony ; युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न – NNL
किनवट | परमेश्वर पेशवे........समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी गेल्या 30 वर्षापासून सातत्याने लिखाणाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणारे पत्रकार म्हणून परमेश्वर पेशवे यांची ख्याती आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या दि.18रोजी झालेल्या हिवरा येथील राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांना सन्मान चिन्ह देऊन व पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता.१८) रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, त...
