नांदेड| दहा वर्षापूर्वी पोलिस खात्यांतर्गत अनेक पोलिस बांधवानी फौजदारकीची परीक्षा दिल्या. यापैकी उत्तीर्ण झालेल्या पोलिसांच्या नियुक्तीचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे अनेक पोलिस बांधव स्टार विनाच निवृत्त झाले असल्याने पोलिस दलामध्ये नाराजी आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तीर्ण झालेल्या पोलिसांचे स्टार लावून याना पदोन्नती द्यावी अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


पोलिस खात्यात पोलिस शिपाई पदापासून काम करणाऱ्या पोलिसांना सेवेत दहा वर्षे बजावल्यानंतर खात्यांतर्गत परीक्षा देवून फौजदार होण्याची संधी असते. २०१३ साली राज्यातील हजारोहून अधिक पोलिस बांधवानी परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक पोलिस बांधव फौजदार परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.


११ वर्षापूर्वी पोलिस खात्यांतर्गत फौजदारकीची जाहिरात सुटल्यानंतर परत अशी जाहिरात आलीच नाही. एकीकडे लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या तोकडी आहे. यामुळे पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. असे असताना परीक्षा घेवून ती पास होवून सुध्दा राज्य सरकार पोलिसांना पदोन्नती न देता एक अन्याय करत आहे. रिक्त जागा असतानाही त्या भरल्या जात नाहीत. हि बाब लक्षात घेता मंत्री महोदयांनी ही उदासिनता हटवून पोलिस अधिकाऱ्यांच्या जागा भराव्यात, अशी अपेक्षा पोलिस बांधवानाकडून व्यक्त होत आहे.


फौजदार परीक्षा उत्तीर्ण झाल्याने लवकरच दोन स्टार खांद्याला लागतील व पोलिस अधिकारी म्हणून काम करता येईल, अशी अपेक्षा पोलिसांना होती. मात्र दुर्देवाने गेल्या दहा वर्षानंतरही परीक्षा उत्तीर्ण झाले असतानाही हजारो पोलिस फौजदारकीपासून वंचित राहिले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेकडो पोलिसांचा समावेश आहे. याबाबत अनेकांनी वारिष पोलिस अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

आजघडीला १० वर्षांपूर्वी परीक्षा दिलेले अनेक पोलिस निवृत्त झाले आहेत. काही पोलिसांना फौजदारकी मिळाली मात्र ज्यांना लाभ मिळाला त्यांना पुरेसा कालावधी मिळाला नसल्याचे एका पोलीस बांधवानी आमच्या प्रतीनिधीस बोलताना सांगितले आहे. राज्य सरकार पदोन्नती देऊन रिक्त जागा भरण्यास चालढकल करत असल्याने उत्तीर्ण झालेले काही पोलिस न्यायालयात गेले. न्यायालयानेही पोलिस भरतीच्या २५ टक्के जणांना लाभ द्यावा असा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन होऊन पदोन्नती मिळेल याची वाट 10 ते 11 वर्षापासून परेशान आहोत.. फौजदारकीची वाट बघत बसलोत. मात्र किरकोळ कारणं सांगून पदोन्नती पुढे ढकलली जात असल्याने पोलिस दलातून नाराजीचा सूर उमटत आहे.


