स्वच्छता , आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधेकडे लक्ष द्या – नागरिकांची मागणी -NNL
Uncategorized
उस्माननगर, माणिक भिसे। ग्रामीण भागात खुप वर्षांपुर्वी जनतेला मुलभूत सुविधा म्हणून अन्न, वस्त्र , निवारा या तीन गोष्टी कडे अन्यन साधारण महत्व दिले जात होते.पण आज २१ व्या शतकात मानवाला या गोष्टी बरोबर आरोग्य,स्वच्छता, शिक्षण हे महत्त्वाचे साधन बनले आहे ,. म्हणून पुढाऱ्यांनी व स्वता: ला मी नेता ,कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्यानी या सोयी सुविधेकडे लक्ष द्यावे अशी मागणी समोर येत आहे.
नागरिकांनी दर पाच वर्षांनी आप आपल्या वार्डाच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर सांगितलेल्या उमेदवारांना प्राधान्य देवून निवडणुकीत मतदान देतात.आपल्या महाराष्ट्रातील गावोगावी खऱ्या लोकशाही मार्गाने निवडणूका होताना दिसून येतात.लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेल राज्य म्हणजेच लोकशाही....ही लोकशाहीची व्याख्या दिवसेनदिवस लोप पावत जात असल्याचे दिसून येत आहे.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सण, उत्सवात प्रत्येका...
