हिमायतनगर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत मनिषा आश्रम शाळेचे विद्यार्थी ठरले अव्वल -NNL
Uncategorized
हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुकास्तरीय खो- खो व क्रिकेट ,कुस्ती स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून, खो - खो स्पर्धेत मनिषा आश्रम शाळा पोटा 14 वर्षे मुले ,मुली दोन्ही गट प्रथम आणि 19 वर्ष गट ही पहिला आला आहे. क्रिकेट मध्ये 14 वर्ष वयोगट राजा भगीरथ मा.व उच्च मा. विद्यालय हिमायतनगरने शाळा प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या खो-खो स्पर्धेचे उदघाटन पो.नि. बी.डी. भूसनुर व मनिषा आश्रम शाळेच्या अध्यक्षा शशीकलाताई राठोड, गट शिक्षणाधिकारी आर.आर. जाधव यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन करण्यात आले. यावेळी क्रिडा संयोजक के.बी. शेन्नवाड, अनिल मादसवार, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी मु.अ.राठोड, सेवानिवृत मु.अ. ए.आर. अनगुलवार, जी.डी. कापसे यांच्या उपस्थीत झाले. पंच म्हणून माधूरी तिप्पनवार, चव्हाण सर, भावडे सर आदी उपस्थित होते.
तर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन सेवानिवृत म...
