Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144 लागू -NNL

Uncategorized
नांदेड| मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 डिसेंबर 2022 ते 19 जानेवारी 2023 पर्यंत घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमित केले आहेत. याबंदी आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जानेवारी 2023 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत ...

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात 26 डिसेंबर रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन -NNL

Uncategorized
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील भूमि अभिलेख कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच्या कार्यालयात पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख श्रीमती एस. पी. सेठीया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भूमि अभिलेख विभागातून दिनांक 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती योजनेशी संबंधीत लाभाच्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी ही पेन्शन अदालत आयोजित केली आहे. या पेन्शन अदालतमध्ये येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्यांच्या समस्या बद्दल लेखी म्हणणे आवश्यक त्या कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांच...

अनुसूचित जातीच्या पीडित शेतकऱ्याचे विद्युत भवन समोर आमरण उपोषण -NNL

Uncategorized
(६ वर्षांपूर्वी भरले कृषी पंपासाठी कोटेशन,अजून वीज जोडणी नाही,ऍट्रॉसिटी व दफ्तर दिरंगाई कायद्या नुसार कारवाई करावी ही प्रमुख मागणी,अधीक्षक अभियंता जाधव यांनी आंदोलकांना मोठ्या आवाजात बोलून दडपशाही करण्याचा केला प्रयत्न,आंदोलन चिघळण्याची शक्यता) नांदेड| अनुसूचित जातीचे पीडित अर्जदार कॉ.प्रभाकर मोघाजी दर्शनवाड रा.मोहपुर ता.कीनवट जि.नांदेड यांनी सन २०१६ मध्ये दि.१४ डिसेंबर रोजी मोहपूर ता.किनवट येथील कृषी पंपासाठी रीतसर कोटेशन भरणा केलेले असून त्यांना अद्याप वीज जोडणी करून दिलेली नाही. ते सीटू संलग्न असंघटित कामगार संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आहेत. तसेच जातीने मातंग आहेत. त्यांच्या शेतातील वीज जोडणी करून,त्यांना झालेल्या मनस्तापाची व आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी तसेच ज्या ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी व इतरांनी कॉ.दर्शनवाड यांची अडवणूक केली व त्रास दिला आहे. त्या सर्वांवर ऍट्रॉसिटी ऍ...

पत्रकार संघाकडून शहीद जवान हणमंत काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन -NNL

Uncategorized
उस्माननगर, माणिक भिसे। येथील शहीद जवान हणमंत काळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने व राज्य पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख यांच्या वतीने प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे,राज्यपुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, उपसरपंच सदर बाशीद शेख, माजी पं.स.सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड, ग्रामसेविका सौ.डि.जी.शिंदे - माने , संभाजी काळम पाटील, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य , नागरिक,रुग्ण उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उस्माननगर येथील शहीद जवान प्रतिष्ठानचे आयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे यांच्या वतीने दि.१९ ड...

आसाराम बापूंच्या अनुयायांकडून पुण्यात भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा -NNL

Uncategorized
पुणे। तुलसी पूजन दिवसाच्या प्रसारासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून रविवार, दि १८ डिसेंबर रोजी पुण्यात 'भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा' काढण्यात आली. २५ डिसेंबर हा 'तुलसी पूजन दिवस' म्हणून आसाराम बापूंच्या अनुयायांकडून २०१४ पासून साजरा केला जातो.याही वर्षी मोठ्या प्रमाणावर हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी पुण्यात आज सायंकाळी ६ वाजल्यापासून सारसबाग ते संभाजीबाग या मार्गावर भव्य हरिनाम संकीर्तन यात्रा काढण्यात आली. सफेद वस्त्रे आणि भगवी टोपी, उपरणी परिधान करून भक्तगण सहभागी झाले. तुलसीपूजनाचे, तुलसी महात्म्य सांगणारे फलक त्यांनी हाती घेतले होते. आसाराम बापूंच्या छायाचित्रांचे रथही सामील झाले होते. 'यतो धर्म,स्ततः जय ', ' अपनी संस्कृती, अपनी विरासत ', ' आदते बदलो, विचार बदलो' असे संदेश देणारे फलक अनुयायांनी हाती घेतले होते. यात्रेदरम्यान तुळशीच्या रोपांचे...

बोम्मईंच्या चिथावणीखोर ट्वीट्सवर राज्य सरकार गप्प का..? – अशोक चव्हाण -NNL

Uncategorized
नागपूर। कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरून केलेल्या चिथावणीखोर ट्वीट्सबाबत महाराष्ट्राची दिशाभूल केली जात असून, या गंभीर प्रकरणावर राज्य सरकार गप्प का आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, बोम्मई यांनी केलेल्या ट्वीट्सची भाषा आक्षेपार्ह होती. त्यावर प्रक्षोभ उडाल्यानंतर ते ट्वीटर हॅंडलच फेक असल्याचा खुलासा करण्यात आला. परंतु, बोम्मई यांचे ते ट्वीटर हॅंडल जानेवारी २०१५ पासून सक्रिय आहे. ट्वीटरने त्याला व्हेरिफाय देखील केले आहे. त्या हॅंडलवर अजूनही कर्नाटक सरकारद्वारे घेतल्या जाणाऱ्या शासकीय निर्णयांची माहिती दिली जाते आहे. ते ट्वीटर हॅंडल फेक असेल तर मग आतापर्यंत महाराष्ट्राबाबतचे ते आक्षेपार्ह ट्वीट डिलिट का करण्...

हिमायतनगर पोलिसाची दमदार कार्यवाही दुचाकी व बॅटरी चोरास केली अटक -NNL

Uncategorized
हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहरासह तालुक्यात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी पासून दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत. तसेच बॅटरींची चोरकरण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारावर आळा घालण्याचे आदेश पोलीस अधीक्षकाकडून मिळाल्यानंतर हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर यांनी जमादार अशोक सिंगनवार व त्यांच्या टीमला चोरट्याच्या तपास कामी रवाना केले होते. हिमायतनगर पोलीस टीमने ट्रॅक्टरच्या बॅटरी चोर व दुचाकी चोरास मुद्देमालासह अटक केली आहे. हिमायतनगर पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे शहरातील नागरिकातुन पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे. आयपीसी 379 अंतर्गत हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रारकरते प्रवीण गंगाधर मामिडवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल असलेल्या गुन्ह्याचा मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तपास करून जमादार अशोक सिंगणवाड, पोलीस नाईक नागरगोजे यांनी आरोपी गोपाल रामराव बाटाने वय 27...

कारला येथे श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा….NNL

Uncategorized
हिमायतनगर। कारला येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले असुन ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ काकडा,किर्तन होणार आहेत या सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. कारला येथे श्री कृष्ण मंदीर कमिटी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह दि. 24 डिसेंबर पासून सुरुवात होणार असुन 10 जानेवारी रोजी समाप्ती होणार आहे. या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा, 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 4:30 ते 6 हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार आहे. ज्ञानेश्वर पारायण व्यासपीठ ह. भ.प.शिवाजी महाराज वडगावकर, हरिपाठ व काकडा ह. भ. प.मारोती महाराज राहूलवाड व सिबदरा येथील त्यांचा संच सादर करणार आहेत .दि.29 डिसेंबर रोजी नादब्रह्म संगीत संच न...

नांदेड जिल्हास्तरीय अजिंक्यपद क्रॉसकन्ट्री स्पर्धा व राज्य निवड चाचणीचे आयोजन -NNL

Uncategorized
नांदेड। महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय क्रॉसकन्ट्री स्पर्धा 25 डिसेंबर रोजी परभणी येथे होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेद्वारे जिल्हास्तरीय क्रॉसकन्ट्री अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता गुरुकुल इंग्लिश स्कूल असदवण शाळेच्या मैदानात ग्रामीण तंत्रनिकेतन गेट ते पांगरी रोड पाईप लाईन,श्री गुरु गोविंदसिंघजी इंजिनिअरिंग कॉलेज च्या अलीकडे विष्णुपुरी जवळ नांदेड या रोडवर करण्यात आले आहे. या ठिकाणी आयोजन केले आहे.(ठिकाण माहीत नसेल तर खालील मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा) स्पर्धेला येतांना खेळाडूंनी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बोर्ड प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे. मुला-मुलींसाठी 16, 18 व 20 वर्षीय तसेच खुला पुरुष महिला गट राहणार आहे. कामगिरी पात्र खेळाडूसच पुढील स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल. जिल्...

नांदेड येथे ” बहना भाग मत जाना ” या युवती संस्कार शिबिराचे आयोजन -NNL

Uncategorized
नांदेड। मुलींवर अविश्वास नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे या उद्देशाने भाजपा महानगर नांदेड तर्फे रविवार दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एनएसबी कॉलेज नांदेड येथे " बहना भाग मत जाना " या युवती संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये लाखो युवकांचे प्रेरणास्थान असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते सोपानदादा कनेरकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून लव्ह जिहादच्या दृष्चक्रात अडकलेल्या तरुणी आपबिती कथन करणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. शिबिराचे हे अकरावे वर्ष असून यावर्षीचे शिबिर हे मुली व महिलांसाठी राखीव आहे. या शिबिरात वेळेवर उपस्थित राहणाऱ्या मुलींना व महिलांना क्युबिक बायोटेक तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. तसेच सोडतीद्वारे भाग्यवान ठरणाऱ्या चार मुलींपैकी दोघींना टॅलीचे तर इतर दोघींना एमएससीआयटी चा तीन महिन्यांचे कॉम...
error: Content is protected !!