Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

तहसीलदार मृणाल जाधव यांनी साजरा केला मुलाचा वाढदिवस अंध विद्यार्थ्यासोबत -NNL

Uncategorized
किनवट, माधव सूर्यवंशी। किनवटच्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस बोधडी येथील अंध विद्यार्थ्यासोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली असून जाधव यांनी सहकुटुंब अंध विद्यार्थ्यासोबत वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. किनवट तालुक्याच्या तहसीलदार सौ.मृणाल जाधव यांनी आपला मुलगा वीर याचा वाढदिवस अंध विद्यालयात साजरा केला यावेळी अंध शाळेतील विदयार्थी व संस्थेचे सचिव प्रकाश टारफे व विद्यालयाचे प्राचार्य वि. के.कांबळे ,दिलीप मुंडे, व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.याप्रसंगी संगीत रजनी कार्यक्रमासह विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला....

फेलोशिपच्या मागणीसाठी आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांचे आजपासून नागपुरात उपोषण -NNL

Uncategorized
नांदेड। महाराष्ट्रातील संशोधन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर फेलोशिप देण्याच्या मागणीसाठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान नागपुरातील यशवंत स्टेडियम धंतोली येथे नांदेडसह राज्यातील गजानन डुकरे, रामदास वागतकर, संतोष तायवाडे, आकाश ढोले, गजानन वागतकर, बालाजी डवरे, गणेश पांढरे यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी ता. १९ डिसेंबरपासून साखळी उपोषण चालू केले आहे. या मागणीसाठी महाराष्ट्रातील शेकडो संशोधक विद्यार्थी एकवटले असून यापूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अनेकवेळा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु पोकळ आश्वासनांशिवाय विद्यार्थ्यांच्या हाती काहीच लागत नसल्याने आज पासून त्यांनी साखळी उपोषण चालू केले आहे. सविस्तर वृत्त असे की, सध्या राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती अधिछात्रवृत्ती मिळते परंतु या योजनेचा लाभ महा...

रासायन मिश्र ताडी विक्री बंदसाठी माजी नगरसेविका झाल्या आक्रमक -NNL

Uncategorized
बिलोली। तालुक्यातील कुंडलवाडी येथे गेल्या वर्षभरा पासून निव्वळ ताडी विकण्याचा परवाना असलेल्या परवाना धारक दुकानातुन शरीरास हानिकारक अशी रासायन मिश्र ताडीची होत आहे.या बाबत माजी नगरसेविका आक्रमक झाले असून ही विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन कुंडलवाडीच्या नगरसेविका सौ.पर्यागबाई मुरलीधरराव शिरामे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे,विरोधी पक्ष नेते ना.अजित पवार, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत. निवेदकांनी निवेदनात असे नमुद केले आहेत की,तालुक्यातील एक मोठे शहर व बाजारपेठ म्हणून कुंडलवाडी शहराची ओळख आहे.येथे ताडी (शिंदी) पिणाऱ्यांची संख्या बर्यापेकी आहे.अशात जवळपास गेल्या वर्षभरा पासून येथील ताडी विक्री करणारा परवाना धारक ताडी दुकानदार संबंधित उत्पादन शुल्कचे निरिक्षक व कांही वरिष्ठ पातळी वरील अधिकारी यांना हाताशी धरून चक्क रासायन घटकांचा ताडीत वापर करून रा...

विद्यार्थ्यांच्या हितासाठी MPSC चा नवीन अभ्यासक्रम दोन वर्षांनंतर लागू करा – नाना पटोले -NNL

Uncategorized
नागपूर| महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीत बदल करून त्याची अंमलबजवणी पुढील वर्षापासून म्हणजे २०२३ पासून करण्याच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो. विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन नवीन पद्धत २०२३ पासून लागू करण्याऐवजी दोन वर्षांनंतर २०२५ पासून लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या परीक्षा पद्धतीच्या बदलाचे आकलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा अवधी देणे गरजेचे आहे. लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण होण्यात या नवीन पद्धतीने अडचण निर्माण होऊ शकते. पुरेसा कालावधी मिळाला तर विद्यार्थ्यांना तयारी करण्यास वेळ मिळून त्यांचे स्वप्न पूर्ण होण्...

दलित, मागास, आदिवासींचे जगणं कष्टप्रद व अपमानास्पद झाले – अॅड. राजेंद्रपाल गौतम -NNL

Uncategorized
नांदेड| या देशात समता प्रस्थापनेचे प्रयत्न समाज सुधारकांनी केले. त्यांच्या कार्याकडे साऱ्या समाजाने दुर्लक्ष केले आहे. धर्माच्या नावावर उच्चनीचतेची उतरंड रचली गेली आहे. दलित, मागास, आदिवासींचे जगणं कष्टप्रद व अपमानास्पद झाले आहे. हे सगळं थांबविण्यासाठी तथागत गौतम बुद्धाचा सम्यक मार्गच दिशा दाखवील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत समाज निर्मितीसाठी व्यवस्थेत नागवलेल्या सर्वच लोकांनी एकत्रित येणे गरजेचे आहे, असे मत दिल्ली सरकारमधील पूर्व कॅबिनेट मंत्री अॅड. राजेंद्रपाल गौतम यांनी व्यक्त केले . नांदेड येथे शुक्रवार दिनांक १६ डिसेंबर रोजी बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने 22 प्रतिज्ञा सन्मान सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका डॉ. राम वाघमारे यांनी विशद ...

आंबानगर सांगवी येथे राज्यस्तरीय गायन महास्पर्धा -NNL

Uncategorized
"समाजस्वर" "समाजशब्द" आणि "समाजविद्या" पुरस्कारांचे होणार वितरण नांदेड| राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा महापरिनिर्वाण दिन आणि काशिनाथ वाठोरे यांच्या ९ व्या स्मृतिदिना निमित्त आंबानगर (सांगवी बु.) नांदेड येथे मंगळवार दि. २० डिसेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय संगीतमय गितगायन महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी १०.३० वा. बालाजीराव गच्चे नांदेड यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही प्रबोधनकार कैलासदादा राऊत हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिराबाई काशिनाथ वाठोरे ह्या राहणार आहेत. या महास्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५००० रु., ३००० रु., २००० रु. आणि १००० रु. अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. संगीतकार तथागत आणि समाधान राऊत नांदेड यांचे ऑर्गन, पॅड, बॅझो, ढोलक, तबला आदी अत्याधुनिक संगीत साहित्य सर्व स्पर्धकांसाठी...

पानभोसीच्या “नेसुबो” विदयालयाचे थाळी फेक, जुडो तिहेरी उडी मध्ये यश -NNL

Uncategorized
लोहा| शालेय क्रीडा स्पर्धेत पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक . विदयालयांच्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडी, गोळा फेक ,लांब उडी,बॉक्सिंग, जुडो या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून विभागीय पातळीवर या खेळाडूंची निवड झाली आहे. प्राचार्य राजीव भोसीकर व मार्गदर्शक शिक्षक यांच्यामुळे शाळेस हे यश संपादन झाले. जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या यात पानभोशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात थाळी फेक - कु. माधवी भोसीकर - ( प्रथम ), तिहेरी उडी --जान्हवी भुजबळ ( प्रथम ) महेश गित्ते लांब उडी -महेश गीते ( प्रथम ) ट्रिपल जंम्प् - व्दितीय-, सुभाष केंद्रे, थाळी फेक - , हेमराज यादव ( द्वितीय ) ज्युडो कराटे - प्रथम क्रमांक, - गौरी संगम नागठाणे, किक बॉक्सींग - प...

वनकामगारांचे मुखेड येथे आमरण उपोषण -NNL

Uncategorized
मुखेड, रणजित जामखेडकर| बेकायदेशीररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना कामावर पुर्ववत घ्यावे, औद्योगीक न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे या मागण्यांसाठी शासकीय औद्योगिक कामगार संघटनेच्यावतीने मुखेड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून कायम रोजंदारीवर काम करणार्‍या काही कामगारांनी कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी मा.औद्योगिक न्यायालयात धाव घेवून जैसे थे आदेश मिळवले आहेत. औद्योगिक न्यायालयात गेल्याचा राग मनात धरुन काही कामगारांना वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी बेकायदेशीररित्या न्यायालयीन आदेश असतांनाही कामावरुन कमी केले आहे. त्या जागी कमी रोजंदारीत नवीन कामगारांची भरती करुन कामगार कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचे शासकीय औद्योगिक कामगार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बेकायदेशिररित्या कामावरुन कमी केलेल्या कामगारांना तात्क...

विधान भवनावर धडकणार लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ -NNL

Uncategorized
नागपूर| महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रबिका या हिंदू तरुणीचे 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये. तसेच दुसरीकडे देशात छळ, बळ, कपट यांद्वारे हिंदूंचे वाढते धर्मांतर नव्या राष्ट्रांतराला जन्म देऊ शकते. हे राष्ट्रघातकी ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी नागपूर येथे हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समाज यांच्या वतीने 21 डिसेंबर या दिवशी नागपूर विधान भवनावर राज्यस्तरीय ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून संत, धर्माचार्य, संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘हिंदु जनजागृ...

सकाळी 9 पासून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी -NNL

Uncategorized
नांदेड, अनिल मादसवार| जिल्ह्यात ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजेपासून पुढे सुरू केली जाईल. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीच्या दृष्टीने काटेकोर नियोजन केले आहे. नांदेड येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सभागृह, प्रशासकिय इमारत येथे सकाळी 9 वा. मतमोजणी सुरू होईल. अर्धापूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 11 वा., भोकर येथे तहसिल कार्यालय तळमजला येथे सकाळी 10 वा. हदगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल. हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे सकाळी 11 वा., किनवट येथे तहसिल कार्यालय येथे सकाळी 10 वा., माहूर येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., धर्माबाद येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा. मतमोजणी सुरू होईल. उमरी येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10.30 वा., बिलोली येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., नायगाव येथे तहसिल कार्यालयात सकाळी 10 वा., मुखेड ...
error: Content is protected !!