क्रिकेट दरम्यान निर्णयामुळे गेम पलटी होणार नाही याची खबरदारी घ्यावी -आ.माधवराव पाटील जवळगावकर -NNL
Uncategorized
हिमायतनगर,अनिल मादसवार| क्रिकेटचे सामने घेताना आलेल्या खेळाडूंना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे. क्रिकेट सुरु असताना कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता विचारपूर्वक घ्यावा. चुकीचा निर्णय दिला जाणार नाही याची खबरदारी घेतली तर क्रिकेटचे सामने सुरळीत होतील. आणि कोणत्याही संघावर किंवा खेळाडूवर अन्याय होणार नाही. यासाठी विचारपूर्वक निर्णय द्यावा अश्या सूचना आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी क्रिकेट सामने आयोजित करणाऱ्या कमिटीला केल्या.
ते हिमायतनगर येथील राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेल्या ड्रीम सिटी प्लॉटिंगच्या मैदानावर स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धेचे दि.२० डिसेंबर रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातीला स्वर्गीय पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या प्रतिमेला पुष्पह...
