Monday, June 29

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

सावळी सदोबा परिसरातील विविध मागण्यासाठीच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस -NNL

Uncategorized
आर्णी। आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा व परिसरातील विविध समस्या व अडचणी सोडवा रास्त असलेल्या मागन्या दोन दिवसात सोडवा अन्यथा सावळी सदोबा येथून जाणारे सर्व रस्ते बंद करू तसेच गावकऱ्यांच्या सहमती ने संपूर्ण गाव बंद करू असा इशारा सावळी सदोबा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच बाळासाहेब शिंदे व सदस्य अहेमद तंवर यांनी दिला. सावळी सदोबा भागातील विद्युत चा प्रश्न , संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचा प्रश्न,कापेश्वर येथील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न, अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्यांचा प्रश्न, झापरवाडी येथील पांदण रस्त्याचा प्रश्न व आयता येथील गॅस सिलिंडर च्या स्फोटाने मूत्यू पावलेल्या कुटुंबाला शासकीय मदत करन्याचा प्रश्न अशाप्रकारचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिनांक 20 डिसेंबर मंगळवार पासून सुरू केलेल्या उपोषण...

कर्मचारी मध्यवर्ती महासंघाची हिंगोली जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

Uncategorized
हिंगोली। राज्य सरकारी गड - ड (चतुर्थ श्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य च्या वतीने काल दिनांक 20 डिसेंबर 2022 रोज मंगळवार रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथील सभागृहामध्ये कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश आहेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची सभा यशस्वीपणे संपन्न झाली असून या बैठकीमध्ये आगामी 16 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाबाबत चर्चा होऊन, आंदोलन यशस्वी करण्याकरिता कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मा. श्री. सुरेश आहेरकर, महासंघाचे राज्य सह कोषाध्यक्ष मा. श्री. रामदास शिराळे, महासंघाचे राज्य संघटक सचिव मा. श्री. रामभाऊ पांचाळ यांनी मार्गदर्शन केले आहे. सेवानिवृत्त /वैद्यकीय दृष्टया अपात्र होणार्‍या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या एका पाल्यास पूर्वीप्रमाणे शासनसेवेत सामावून ...

पोखरभोसी येथे अखंड दत्तनाम सप्ताहास प्रारंभ -NNL

Uncategorized
उस्माननगर, माणिक भिसे। उस्माननगर-येथून जवळच असलेल्या पोखरभोसी ता. लोहा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड दत्तनाम सप्ताहास प्रारंभ झाला आहे. या सप्त्यामधील दैनंदिन कार्यक्रम १९ डिसेंबर रोज सोमवार पासून नाम सप्त्यास सुरूवात झाली आहे.सकाळी ७ ते ९ बाळक्रिडा ग्रंथाचे पारायण ,सायंकाळी ५ ते ६ आनंद पाठ,सायंकाळी ६ ते ९ महापूजा, रात्री ९ ते११ किर्तन व पहाटे भूपाळी होनार आहे. आनंद संप्रदायाचे महामेरू ,परज्ञानी महंत बाळगीर गुरू मोहनगीर महाराज व ब्रम्हचारी वैरागी महाराज यांच्या आशिर्वादाने सदरील सप्त्याचे पोखरभोसी येथे उत्साहात सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. अखंड दत्तनाम सप्त्यामध्ये किर्तनकार म्हणून दि.२१ डिसेंबर रोज बुधवारी द. भ.प.दत्तराम पाटील ताटे,दि.२२ डिसेंबर रोज गुरूवार ह्या दिवशी द.भ.प. शिवाजी पाटील शिंदे टाकळीकर दि.२३ डिसेंबर रोज शुक्रवार ह्या दिवशी द.भ.प. शामसुंदरगीर महाराज आष्टीकर ,दि २४...

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिंकण्यासाठी तयारीला लागा – आ. जवळगावकर -NNL

Uncategorized
हिमायतनगर। कृषी उत्पन्न बाजार समिती च्या होणाऱ्या निवडणुकी पुर्वी कांग्रेस पक्षाच्या प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांनी तयारीला लागायचे असुन, हि होणारी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असणारी निवडणूक आहे. त्यासाठी प्रत्येकांनी तयारीला लागायचे असल्याचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी बैठकीत सांगितले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात जवळगाव येथे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, संचालक, हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष,सदस्य यांची उपस्थिती होती. या बैठकीत आ. जवळगावकर म्हणाले की येत्या काही दिवसात कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. त्यामुळे आजपासून कांग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच, चेअरमन, यांनी तयारी करायची असुन...

बोम्मईंच्या ‘त्या’ ट्वीटबाबत फडणवीस केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिणार -NNL

Uncategorized
नागपूर। कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. बोम्मई यांच्या महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्या व चिथावणी देणाऱ्या ट्वीट्सबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या महाराष्ट्राच्या अवमाननेचा व राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा मुद्दा लावून धरला होता. बुधवारी विधीमंडळातील कामकाजादरम्यान चव्हाण यांनी या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्राची बदनामी करणारे ते ट्वीट बोम्मई यांच्या व्हेरिफाईड हॅंडलवरून झाले आहेत. त्या ट्वीटर हॅंडलला ब्ल्यु टिक आहे. अजूनही ते ट्वीट डिलिट झालेले नाहीत. तरीही महाराष्ट्राचे सरकार त्यांनी पाठीशी का घालते? ते हॅंडल फेक असल्याचे सांगून आपण त्यांची पाठराखण का ...

हदगाव तालुका रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी चंपतराव कवळे पाटील -NNL

Uncategorized
हदगाव, गजानन जिदेवार। रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची हदगाव तालुका कार्यकारिणी विशेष बैठक मंगळवार दि. २० डिसेंबर रोजी हदगाव जि.नांदेड येथे दुपारी २वा . जेष्ठ स्वस्त धान्य विक्रेते चंपतराव भगाजीराव कवळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस प्रमुख पाहुणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक एडके, कार्याध्यक्ष अब्दुल सलिम अ.मुनिर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अनिल कुलकर्णी, राज्यसहसचिव शाहुराज गायकवाड प्रमुख मार्गदर्शक नेते श्रीनिवास दमकोंडवार , संघटनेचे तालुका नेते शेषराव कदम पाटील उपस्थित होते. या बैठकीस यादव मिराशे,जयप्रकाश देशमुख,शेख अतिक,मल्लिकार्जुन मुखेडी,दादाराव महाजन , गणपत बास्टेवाड,रामराव , केरई, कमलबाई साखरे ,कैलास देशमुख (सुर्यवंशी), सचिन भाले, पांडुरंग तेलुरे,मारोतराव सोनाळे , पांडूरंग तरटे , मारोती चेपुरवार उपस्थित होते. या बैठकीत एकमताने रास्तभाव ...

छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड दौरा; 24 रोजी हिमायतनगर तालुक्यात -NNL

Uncategorized
नांदेड, अनिल मादसवार। स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचा दौरा सूरु असून, या दौर्‍यामध्ये गावा-गावात स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद्घाटन करण्यात येते. रायगड, जळगाव, नाशिक, परभणीच्या यशस्वी दौर्‍यानंतर आता नांदेड जिल्ह्यात दि 23 डिसेंबर 2022 शुक्रवार रोजी सकाळी 8:30 नांदेड मगनपुरा, शिवदरा 9.00, बामणी 9:30, चिचंगव्हाण 10:00, उंचाडा 11:30, तालंग 12:00, नेवरी 12:30, कोळी 1:00, तळणी 1:30, जेवण 2:30, कव्हळी 3:00, शिरड 3:30, पेवा 4:00, निवघा सभा 5:00, बोरगाव 5:30, शिपोरि 6:00, हदगाव 6:30, सभा हदगाव 7:00, चिंचोली 7:30, बाभळी 8:00, गुरफळी (जुनी) 8:30, गुरफळी(नवी) सभा 9.00, तसेच शनिवार, दि 24 डिसेंबर 2022 रोजी नेताजी पालकर समाधी स्थळी भेट तामसा वडगाव तामसा 10:00, फळी 10:30, हारडफ सभा 11:00, धोतरा 11:30, कामारी 12:00, जवळगाव सत्कार 12:30, वाघी...

असदवन येथील वस्तीवर जाऊन भटक्या विमुक्त जातीचा लोकांना राशन कार्ड चे तहसिलदार अंबेकर यांच्या हस्ते वाटप -NNL

Uncategorized
नविन नांदेड। असदवन येथील वस्तीवर जाऊन जय भारत माता सेवा समिती नविन दिल्ली यांच्या सहकार्याने महाराष्ट्र शासन महसूल विभाग नांदेडचा वतीने आजादी का अमृत महोत्सव निमित्त शासन आपल्या दारी ऊपकम अंतर्गत भटक्या विमुक्त जातींचा लोकांना राशन कार्डचे वाटप २१ डिसेबंर रोजी तहसिलदार किरण अंबेकर, तलाठी मनोज देवणे, यांच्या हस्ते करण्यात आले. असदवन येथे गेल्या दहा ते बारा वर्षां पासून स्थायीक झालेल्या जवळपास दहा ते बारा कुटुंब मधील जेष्ठ नागरिक,महिला ,युवक ,बालके आसे जवळपास शंभर जण आहेत,कोरोना काळात महसूल प्रशासनाने या वस्तीवर धान्य उपलब्ध करून दिले होते, अखेर जय भारत माता सेवा समितीचा वतीने दासराव हंबर्डे यांनी तहसीलदार किरण अंबेकर यांच्याशी संपर्क करून राशन कार्ड बाबत चर्चा केली व अखेर राशन कार्ड संबंधी कागदपत्रे सादर करून राशन कार्ड काढले, त्याचे वाटप कार्यक्रम २१ डिसेंबर करण्यात आले. यावेळी नवीन ...

ग्रामपंचायतीच्या नव्याने निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच व सदस्यांनी लोकोपयोगी कामे करावेत – बालाजी बच्चेवार -NNL

Uncategorized
नांदेड। जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न झालेल्या असुन नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांनी भविष्यात राजकारण विरहित लोकोपयोगी कामे करावीत असे आवाहन भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे. जिल्हाभरातील नवनिर्वाचित सर्व लोकनियुक्त सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन करून बालाजी बच्चेवार म्हणाले की, गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक गावांत स्थानिक विविध राजकीय पक्ष पदाधिकारी एकत्रितपणे येवून निवडणूक लढवतात गावचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा मुख्य हेतू असतो. परंतु, विजयानंतर बाहेरील अनेक जेष्ठ मंडळी आपल्याच पक्ष विजय झाल्याचे सांगितले जाते. ग्रामपंचायत निवडणूक समर्थक लढवित असतात यासाठी राजकीय चिन्हे नसते असेही स्पष्ट करून ते म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात विविध गटाचे व पक्षाची लोकनियुक्त सरपंच व सदस्य म्हणून निवड...

आलेगावचे प्रगतशील शेतकरी प्रशांत पाटील मोरे यांना डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर -NNL

Uncategorized
उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे आलेगाव ता.कंधार येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत शंकरराव मोरे यांना नुकताच नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत डॉ शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यात सोशल मीडियावर व प्रत्यक्ष किंवा थेट बांधावरून नांदेड आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक वेळेस शेती विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे, खते, सेंद्रिय शेती याविषयीची सतत माहिती आपल्या गुपच्या माध्यमातून व शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन देत असतात.तसेच प्रशांत मोरे यांनी नोकरीच्या मागे न लागता व वेळ वाया न जाऊ देता आपल्या शेतात भावाला व घरातील महीलाना सोबत घेऊन रात्रन दिवस काबड कष्ट करून शेतात विविध प्रकारच्या जातींच्या भाजी, पाला, फळाची पिके घेऊन पिकवली. विविध प्रयोग करून शेतात पिके जोमाने घेतले. या नाविन्यपूर्ण उपक्रम शिल शेतकऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्हा पर...
error: Content is protected !!