Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माहुरातून पाठिंबा -NNL

ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला माहुरातून पाठिंबा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आरक्षणासाठी प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे तसेच पुणे येथे ॲड. मंगेश ससाणे व ॲड. मृणाल ढोरे पाटील यांनी ७ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.त्याला माहूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज, बारा बलुतेदार, अलुतेदार,भटक्या विमुक्त जाती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. दि.२१ जून रोजी तहसीलदार माहुर यांचे मार्फत तसे निवेदन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. ओबीसी समाजाच्या विविध संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात शिष्ट मंडळासह उपोषण स्थळी जावून उपोषणकर्त्यांची भेट घेण्याची व त्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात लेखी आश्वासन देण्याची विनंती केली आहे. तसेच ओबीसी आरक्षाला धक्का लागल्यास ओबीसी बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या रस्त्यावर उतरतील ...
मंडळ अधिकारी ला जायमोक्यावर जाऊन चौकशी करायला सहामहीण्या पासून वेळ मिळेना -NNL

मंडळ अधिकारी ला जायमोक्यावर जाऊन चौकशी करायला सहामहीण्या पासून वेळ मिळेना -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। मौजे लांजी ता. माहूर येथील गणेश शेषेराव दामलवार व इतर ३ यांनी दिनांक २८.११.२०२३ रोजी तहसिलदार कार्यालयात रस्ता खुला करुण देणेबाबत विनंती अर्ज केला होता. तरी त्याबाबत मा. तहसिलदार साहेब माहूर यांनी मंडळ अधिकारी, माहूर यांना चौकशी करीता दिनांक २९.१२.२०२३ रोजी पत्र काढले. या प्रकरणात आपण जायमोक्यावर जाऊन विषयाकीन रस्ता खुला करून देण्याची नियमानुसार कार्यवाही करावी व या कार्यालयास अनुपालन अहवाल सादर करावा तसेच संबंधितना अवगत करावे प्रकरणात विलंब करू नये या बाबत दक्षता घ्यावी. पत्र काढून सहा महीने उलटूनही मंडळ अधिकारी व्हि.के.पाईकराव जायमोक्यावर न गेल्याने उलट सुलट चर्चा होत आहे. मौजे लांजी येथील शे.स.न.१९ मध्ये ये-जा करण्यास असलेली भावकी हिस्यातील परंपरागत वहिवाट असलेला व ७/१२ इतर अधिकार रकान्यात नोंद असलेला बैलगाडी रस्ता आडवत असल्याने रस्ता खुला करुण मिळणे ...
१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

नांदेड
भोकर। आज दि.२१ जून " जागतिक योग दिवस " केंद्र शासन,महाराष्ट्र शासन, सार्वजानिक आरोग्य विभाग यांच्या सूचनेनुसार व मा.डॉ. निळकंठ भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड, मा. डॉ बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड, मा.डॉ प्रताप चव्हाण वैद्यकिय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर, मा. डॉ संदेश जाधव तालुका आरोग्य अधिकारी भोकर यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण रुग्णालय भोकर व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा " जागतिक योग दिवस " ग्रामीण रुग्णालय भोकर तेथे साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक डॉ. विजयकुमार दंडे, डॉ संदेश जाधव, डॉ सारिका जावळीकर यांनी योगा बदल माहिती, योगआसनाचे महत्त्व सांगीतले व प्रात्याक्षिक करून दाखविले. आयुष विभागाचे डॉ विजयालक्ष्मी घोडजकर (किनीकर) यांनी प्रास्ताविक केले आभार प्रदर्शन डॉ थोरवट यांनी केले डॉ मुदशिर यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रा...
उमरखेड येथील नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! -NNL

उमरखेड येथील नांदेड व हिंगोली खासदारांचा विठ्ठल बागेत सत्कार ! -NNL

नांदेड, उमरखेड, हिंगोली
उमरखेड,अरविंद ओझलवार। काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी त्यांच्या विठ्ठल बाग निवासस्थानी नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण व हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा स्नेह मिलन सोहळा आयोजित केला होता . याप्रसंगी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्या कुटुंबीयांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी बोलताना प्रकाश पाटील देवसरकर यांनी सांगितले की ,हा सोहळा आयोजित करण्याचे कारण म्हणजे दिल्ली दरबारी अतिशय जवळचे नातेवाईक असलेले दोन खासदार झाल्याने त्यांचा फायदा उमरखेड विधानसभेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला पाहिजे हा उद्देश ठेवून विठ्ठल बागेत त्यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे . यावेळी बोलतांना नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांनी मी जरी नांदेडचा खासदार असलो तरी उमरखेड विधानसभेचा विकास करण्यासाठी नेहमी आमच्या महाविकास आघाडीचे खासदार नागेश पाटी...
वृद्ध इसमाच्या साठ हजार रुपयांवर अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला -NNL

वृद्ध इसमाच्या साठ हजार रुपयांवर अज्ञात चोरट्यानी मारला डल्ला -NNL

क्राईम, उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। येथील पुसद रोड वरील भारतीय स्टेट बँक येथे एका वृद्ध इसमाने कॅश काँटरवरून साठ हजार रुपये रक्कम पिशवीत टाकून ढाणकी रोडवरील एचडीएफसी बँकेकडे जात असताना अज्ञात चोरट्यांनी पैशाच्या थैलीला चिरा मारून साठ हजार रुपये लंपास केल्याची घटना दि 19 जून रोजी दुपारी 2.15 वाजता दरम्यान घडली . फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे . भिकू राजूसिंग राठोड रा दिंडाळा वय 68 वर्ष या वृद्ध इसमाने एचडीएफसी बँकेत पैसे भरण्यासाठी गेले असता त्यावेळी साठ हजार रुपये कमी पडले असल्याचे मॅनेजर यांनी सांगितले असता बँकेतील तेथील हिंगमिरे नामक कर्मचारीला घेऊन भारतीय स्टेट बँक येथे बँकेतील जमा असलेले साठ हजार रुपये काढण्यासाठी गेले. कॅश काऊंटरवरून पैसे काढून एका पिशवीमध्ये घेऊन एस डी एफ सी बँके कडे परत येत असताना पैशाच्या थैलीवर लक्ष ...
हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

हिमायतनगर-पळसपूर-डोल्हारी-सिरपल्ली अर्धवट रस्त्याकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी लक्ष द्यावे – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार। केंद्र व राज्य शासनाने आमदार खारादाराच्या मागणीची दखल घेऊन हिमायतनगर नडव्यापासून पळसपुर डोल्हारी मार्ग शिरपल्ली जाणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत २०२२ मध्ये मंजूर करून कामाला सुरुवात केली. मात्र एकंबा - सिरपल्ली - डोल्हारी - पळसपूर - हिमायतनगर रस्त्याच अर्धवट काम ठेऊन गुत्तेदाराने पलायन केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकातून संबंधित ठेकदाराविरुद्ध जनप्रक्षोभ वाढला आहे. संबंधित गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या रस्त्यावरील तिन्ही गावच्या लोकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. आता पावसाळ्यात देखील रस्त्यावरून ये जा करतांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असून, या अर्धवट रस्त्यामुळे अनेकांना पाठदुखी, कंबरदुखी, मणक्याचे आजार व अपघाताचा सामना करावा लागतो आहे. या रस्त्याच्या अर्धवट कामाकडे नवनिर्वाचित खा. नागेश पाटील आष्टीकर यां...
टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड – NNL

टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड – NNL

स्पोर्ट्स
नाशिक| टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील. मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मागील वर्षाचे मीडिया प्रमुख गणेश राजु भालेराव यांची पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र मीडिया प्रमुख पदी निवड करण्यात आली या सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय टेनिस क्रिकेट च्या सचिव श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम ,महाराष्ट्र महिला डायरेक्टर धनश्री गिरी, टेक्निकल डायरेक्टर स्वप्निल ठोंबरे, मुंबई विभाग अध्यक्ष महेश मिश्रा,नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड ,विलास गिरी सर्व जिल्हा सचिव अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते. या वार्षिक सहविचार सभेमध्ये भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मिनाक्षी गिरी मॅडम यांनी आलेल्या सर्व जिल्हा सचिवांना टेन...
विद्यार्थ्यांनी ठराविक कोर्सचा आग्रह न धरता स्पर्धा परीक्षेस समोर जावे ! डॉ.गणेश जोशी – NNL

विद्यार्थ्यांनी ठराविक कोर्सचा आग्रह न धरता स्पर्धा परीक्षेस समोर जावे ! डॉ.गणेश जोशी – NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर| व्हाईस ऑफ मीडिया तालुका शाखा माहुरतर्फे २०२३-२४ मध्ये उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या तालुक्यातील दहावी,बारावी,व स्कॉलरशिच्या विद्यार्थ्यांचा सत्कार जिनियस किड्स इंग्लिश स्कूलच्या माहुरच्या प्रांगणात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून नांदेड महानगर व्हाईस ऑफ मीडिया अध्यक्ष डॉ.गणेश जोशी,तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज बितनाळकर हे व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी डॉ.गणेश जोशी म्हणाले की हल्ली डॉक्टर, इंजिनियर होण्याचे फॅड पालक व विद्यार्थी करीत आहेत, विद्यार्थीनी स्पर्धा परिक्षेत सामील होउन नव्या पिढीने, जिल्हाधिकारी ,पोलीस अधिक्षक,आयकर अधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व तस्सम राजपत्रित होण्यासाठी स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही असे सांगितले. याशिवाय आदिवासी व नक्षलप्रवण माहुर किनवट तालुक्यात व्हाईस ऑफ मीडियाच्या वती...
आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुकादेवी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा -NNL

आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुकादेवी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आर्ट ऑफ लिव्हिंग व श्री रेणुका देवी महाविघालय माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शुक्रवार दि,२१ जून रोजी सकाळी ६.३० वा, श्री रेणुकादेवी महाविद्यालयाच्या महाविद्यालयाच्या इंडोर हॉलमध्ये प्रथम रवि शंकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक डॉक्टर राम कदम यांनी योगाचे प्रकार सांगत आसन,कपाल भाती,नाडिशोधन, भस्त्रिका, भ्रामरी प्राणायाम ध्यान, सुदर्शन क्रिया,असे विविध योगासनाचे प्रशिक्षण देऊन महत्व सागितले ,दररोज एक तास योग,प्राणायाम,ध्यान, केल्याने तनावमुक्त व उत्साही मन ,नकारात्मक भावनांतुन मुक्तता,आत्मविश्वासात वाढ,प्रभावी निर्णयक्षमता,मनाची एकाग्रता,निर्मळ व कुशाग्र बुद्धि,सक्षम आरोग्य,व रोग प्रतिकारक शक्ती वाढतेअसे अनेक शरीराचे फायदे होत असल्याचे सागितले. यावेळी संस्थेच्या, प्राचार...
8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात….शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

8 जुलै रोजी जरांगे पाटील नांदेड जिल्ह्यात….शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅली -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। दि. 08 जुलै रोजी मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असुन, सगेसोयरे कायद्याची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी ते पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करून समाज बांधवाशी संवाद साधणार आहेत. 6 जुलै पासून हिंगोली जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या *शांततेत मराठा आरक्षण संवाद रॅलीला* अनुक्रमे परभणी, नांदेड, लातुर धाराशिव, बीड, जालना आणि शेवट हा छत्रपती संभाजी नगर येथे होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस अशा हिशोबाने जरांगे पाटील हे त्या त्या जिल्ह्यातील समाज बांधवांशी संवाद करून जर का सरकारने 13 जुलै पर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या काळातला मराठा समाजाचा निर्णय हा सरकारला परवडणारा नाही मग तो 288 विधासभेत मराठा उमेदवार उभे करने असेल किंवा मग त्यांचे पाडणे असेल या सर्व विषयावर ते सरकारला चेतावणी आणि समाजासोबत संवाद या दोन गोष्टी साठी ते मराठ...
error: Content is protected !!