Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
खा. चंद्रकांत हंडोरे 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर -NNL

खा. चंद्रकांत हंडोरे 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर -NNL

नांदेड
नांदेड। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे हे आज दिनांक 24 जून रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. खा. चंद्रकांत हंडोरे यांना भेटण्यासाठी भीमशक्तीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नांदेड जिल्हा भिमशक्ती च्या वतीने करण्यात आले आहे . खा. चंद्रकांत हंडोरे यांचे सोमवार दिनांक 24 जून रोजी हैदराबाद येथून दुपारी एक वाजता नांदेड विमानतळावर खाजगी विमानाने आगमन होईल. त्यानंतर ते शासकीय विश्रामगृह येथे भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांशी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी हितगुज करतील. त्यानंतर एका खाजगी कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहतील. त्यामुळे काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि भीमशक्तीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रगृह येथे उपस्थित राहावे असे अहवान नांदेड जिल्हा भिमाशक्तीच्या वतीने करण्यात आले आह...
गरोदर मातांनी सुदृढ व निरोगी राहण्यासाठी पालेभाज्याचा वापर करावा –  किशन गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी -NNL

गरोदर मातांनी सुदृढ व निरोगी राहण्यासाठी पालेभाज्याचा वापर करावा –  किशन गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। अतिदुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणाऱ्या किनवट तालुक्यातून मानव विकास अभियाना अंतर्गत कुपोषण मुक्त नांदेड जिल्हा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलन करणवाल यांनी पाऊले उचलली असून प्रथमता अविकसित व दुर्गम भाग असलेल्या तालुक्यातील रुग्णांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न चालवले आहेत . त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र इस्लापूर येथे मानव विकास योजने अंतर्गत कॅम्प घेण्यात आला. त्यामध्ये सर्व गरोदर माता व स्तनंदा मातांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.के. पी. गायकवाड यांनी गरोदर मातांना पौष्टिक आहारात पालेभाज्याचा वापर करावा प्रोटीन्सचा आहारात समावेश असावा त्यामुळे बालकाची सुदृढ वाढ होण्यास मदत होते त्याचबरोबर गरोदर मातांना स्तनपान विषयी माहिती व प्रात्यक्षिक करून...
जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL

जल जीवन मिशन योजनेच्या कामा मुळे दाहा फुटाच्या रस्त्यांची झाली पाऊलवाट -NNL

नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यभर कामांचा शुभारंभ केला, त्या अंतर्गत गुंडवळ येथे हि काम करण्यात आले. दलीत वस्ती मध्ये असलेला दहा फुटाचा सीमेंट रस्ता फोडून पाईप टाकण्यात आले. परंतु संबंधित ठेकेदाराने फोडलेला रस्ता सपाट न करता मोठ- मोठे दगड ठेवल्याने हा रस्ता केवळ पायवाट झाला असून साधी बैलगाडी हि जात नसल्याने गावक-याना अडचनीचा सामना करावा लागत आहे. ह्या कडे संबंधित टक्केवारी मुळे दुर्लक्ष करीत असल्याचा गावकरीचा आरोप आहे. तालुक्यात अनेक गावात जलजिवन मिशनअंतर्गत पाण्याची टाकी व पाईप लाईनचे काम करण्यात आले. पाईप लाईनचे काम करतांना लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले सिमेंटचे रस्ते संबधित कंत्राटदाराने फोडले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना त्या फुटलेल्या...
संतगुरु कबीरदास यांची जयंती; संत रोहिदास नगरात मोठ्या उत्साहात साजरी – NNL

संतगुरु कबीरदास यांची जयंती; संत रोहिदास नगरात मोठ्या उत्साहात साजरी – NNL

नांदेड
नविन नांदेड| संतगुरु रोहीदास तिर्थक्षेत्र बळीरामपूर नांदेड परिसरातील कै. बापूराव पाटील खतगांवकर सांस्कृतिक सभागृहात संतगुरु कबीरदास यांच्या जयंतीचे आयोजन तिर्थक्षेत्राचे संस्थापक वामनराव मे. विष्णुपूरीकर यांच्याकडून करण्यात आले होते. सर्वप्रथम सरपंच प्रतिनिधी तथा मा. सरपंच इंद्रजित पांचाळ यांच्या शुभहस्ते व मुख्याध्यापिका एस.पी. चंद्रावार, मा. उपसरपंच संभाजी जाधव पाटील, मा. सरपंच नागोराव आंबटवार व ग्रामपंचायत सदस्य किशनराव गव्हाणे, अशोक तु. लाठकर, अ‍ॅड. प्रमोद कामठेकर, चंद्रकांत कटकमोड, गुंडप्पा बारोळे, चंद्रकांत सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सतगुरु कबीरदास यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रघुनाथ वाघमारे, शंकर अन्नपूर्णे, साईनाथ अन्नपूर्णे, आकाश आडपवार, ग्रा.पं. लिपीक प्रतिक सुर्यवंशी, काशीनाथ पारधे, वेदांत पांचाळ, गणेश अन्नपूर्णे, ...
लोहा शहरा “बेशिस्त” बॅनरवर पोलिसांची कार्यवाही; शहराने सोडला मोकळा श्वास -NNL

लोहा शहरा “बेशिस्त” बॅनरवर पोलिसांची कार्यवाही; शहराने सोडला मोकळा श्वास -NNL

नांदेड, क्राईम
लोहा। लोहा शहरात वाट्टेल तेथे  व वाटेल  तेवढे दिवस बॅनर  कमानी लावण्याची पद्धती रूढ झाली कथित एका घटनेत विधीमंडळात प्रश्न गेला तरीही नगर पालिका प्रशासनाने कोणताही बोध घेतला नाही. उलट पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनीच शहराच्या विद्रुपीकरणाच्या कृतीवर कायदाचा बडगा उगारला .पुन्हा शहरातील बेशिस्त बॅनर पोलिसांनी काढले  .शहरातील व्यापाऱ्यांसह जागरूक नागरिकांनी  याचे स्वागत केले  रस्त्याने सुटकेचा श्वास सोडला आणि शहर मोकळे झाले. नगर पालिकेचा सत्ताधारी काळात जो मनमानी कारभार होता त्यामुळे शहरात वाट्टेल तेथे आणि वाट्टेल तेवढे दिवस रस्त्यावर ...दुकाना समोर बॅनर राहत होते. नगर पालिकेने कधीच बॅनर साठी जागा नेमून दिली नाही आणि कधीही  उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही .केवळ कागदोपत्री न्यायालयाच्या आदेशाचे अहवाल देऊन पालन केले जाते असे कळते. शहरात बसस्थानक मुख्य चौक, भाजी मंडई या भागात...
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पत संस्थेच्या अध्यक्षपदी आनंदराव मोरे तर सचिव पदी जमील अहेमद-NNL

नांदेड
नांदेड। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी आनंद बाबाराव मोरे यांची उपाध्यक्षपदी अशोकराव रावणगांवकर तर मानद सचिव पदी जमील अहेमद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी पत संस्थेच्या सन 2024-2029 या पंचवार्षिक कालावधीसाठी दिनांक 3 मार्च 2024 रोजी निवडणुक झाली होती व त्याच दिवशी मतदानानंतर मतमोजणी ही पार पडली. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत संस्थेचे माजी अध्यक्ष सुनिल सोळके पुरस्कृत बैंक कर्मचारी विकास पॅनलचे सर्वच 13 उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडुन आले. दरम्यानचे कालावधीत 15 मार्च पासून लोकसभेच्या निवडणुकीची आचार संहित चालू झाल्याने कर्मचारी पत संस्थेच्या पदाधिकारी निवडीची प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु सहकार निवडणुक प्राधिकरण यांच्या ओदशाप्रमाणे 10 जून पासून आचार संहिता शिथील झालेली असल्या...
लवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार – डी.आर.एम. नीती सरकार -NNL

लवकरच हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन अत्याधुनिक सुविधा मिळणार – डी.आर.एम. नीती सरकार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर,अनिल मादसवार। मुदखेड आदीलाबाद या ब्रॉडगेज रेल्वे लाईनवर असलेल्या हिमायतनगर रेल्वे स्थानकाला आज दि 22 रोजी नांदेड रेल्वे डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या कामकाजाची पहाणी केली असून, संबंधित अधिकाऱ्याला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या नाविनिकरणाचे काम सुरू असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून कायापालट केला जात आहे, आगामी काळात हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अप्पर प्रबंधक राजेंद्र कुमार मीना यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेल्वे पोलीस मोठया संख्येने उपस्थित होते. हिमायतनगर हे शहर तेलंगणा आणि विदर्भाच्या स...
पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी दिलाय भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा – NNL

पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी दिलाय भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा – NNL

नांदेड
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भारतीय जनता पक्षात दहा वर्षापूर्वी प्रवेश केलेल्या माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी आज पक्षनिरीक्षक माजीमंत्री रावसाहेब दानवे नांदेडात असताना भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भारतीय जनता पक्षात दहा वर्षापूर्वी प्रवेश केलेल्या माजीमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज भारतीय जनता पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे आज पक्ष निरीक्षक रावसाहेब दानवे हे नांदेडात असताना त्यांनी आपला राजीनामा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.किशोर देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर हदगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यानंतर...
नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी शक्करगे यांच वृद्धापकाळाने निधन – NNL

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी शक्करगे यांच वृद्धापकाळाने निधन – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांचं वृद्धापकाळाने शनिवार दि.२२ रोजी दुपारी निधन झाले. मृत्यूसमयी ते ८५ वर्षाचे होते. त्याची राजकीय कारकीर्द सरपंच, सभापती, जि.प. सदस्य व परमेश्वर मंदिर संचालक अशी होती. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, 3 मुल 2 मुली, सुना, पुतणे, नातवंड असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या दि.२३ रोजी रविवारी दुपारी 12 वाजता उमरखेड - बोरी रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अशी माहिती श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली. लक्ष्मणरावजी गिरजप्पा शक्करगे यांच मोठा यांच सामाजिक, राजकीय क्षेत्रात मोठं योगदान राहिल आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्वसामान्य नागरिकांच्या अडी अडचणींना प्राधान्य दिला जायचं. त्यांनी वयाच्या ८३ वर्षापर्यंत राजकीय क्षेत्रा...
लोहा विधानसभा प्रतापराव पाटील चिखलीकरांनी लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह – NNL

लोहा विधानसभा प्रतापराव पाटील चिखलीकरांनी लढवावी कार्यकर्त्यांचा आग्रह – NNL

नांदेड
लोहा| नांदेड लोकसभा मतदार संघात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. थोडी तीस -चाळीस हजार मतांची मेहनत घेतली असती तर साहेब खासदार झाले असते अशी भावना कार्यकर्त्यांची झाली असून, आपण केलेला हलगर्जीपणा आपल्यासाठीच त्रासदायक ठरले आहे. याची जाणीव झाल्यानंतर कार्यकर्ते खडबडून जागे झाले आहेत. त्यांनीं लोहा विधानसभा मतदार संघात माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी अपेक्षा जाहीरपणे व्यक्त केली असून, पत्रकार परिषद घेऊन सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने लोहा पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील व माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड मध्ये पराभूत झाल्या नंतर त्यांनी विधानसभा निहाय आढाव बैठका घेतल्या. आपल्या होम पिचवर लातूर लोकसभा मतदार संघाचा आढावा तसेच कार्यकर्त्...
error: Content is protected !!