Thursday, July 2

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांचे बिनविरोध निवड -NNL

नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांचे बिनविरोध निवड -NNL

नांदेड
नांदेड। महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना मराठवाडा अध्यक्षपदी बलभीम शेंडगे यांची बिनविरोध निवड श्रीराम मंगल कार्यालय खोपोली जि. रायगड येथे नुकतीच करण्यात आली. माजी अध्यक्ष मारोती गायकवाड हे सेवानिवृत्त झाल्यामुळे मराठवाडा अध्यक्ष पद रिक्त होते. रायगड जिल्ह्यातील श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे नुकतीच राज्य स्तरीय सर्वसाधारण सभेचे आयोजित करण्यात आले होते. त्यात मुखेड येथील कर्मचारी जिप्सीभूषण बलभीम शेंडगे यांची राज्याध्यक्ष सुरेश पोस्तांडेल यांच्या सूचनेनुसार कोअरकमिटी सदस्य विश्वनाथ घुगे व माजी अध्यक्ष मारोती गायकवाड यांनी बलभीम शेंडगे यांची बिनविरोध निवड करत असल्याची घोषणा केली. यावेळी उपस्थितांनी बलभीम शेंडगे यांना अनुमोदन दिले. यापूर्वी बलभीम शेंडगे यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी/ संवर्ग कर्मचारी संघटना नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष पद अनेक वर्ष...
उमरखेड विधानसभेत पहिल्यांदाच 30 कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक ! तब्बल दहा तास चालली बैठक -NNL

उमरखेड विधानसभेत पहिल्यांदाच 30 कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक ! तब्बल दहा तास चालली बैठक -NNL

उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार। आमदार नामदेव ससाने यांनी विधानसभेतील विकासात्मक बाबीवर पुढाकार घेत उमरखेड विधानसभेतील उमरखेड व महागाव तालुक्यातील शासकीय कार्यालया अंतर्गत कार्यरत प्रलंबित व प्रस्तावीत कामे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 व रेल्वे प्रकल्पाची कामे इत्यादी कामाचा आढावा यासोबतच शेतकऱ्यांच्या निगडित असलेल्या प्रश्नावर आमदार नामदेव ससाने यांनी तब्बल 30 कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक काल दिनांक 26 रोजी उमरखेड येथील राजे संभाजी उद्यान गार्डन हॉल येथे घेतली .या बैठकीत सर्व कामे ही वेळेवर करण्याचे आदेश यावेळी आमदार नामदेव ससाने यांनी अधिकाऱ्यांना दिलीआहे .उमरखेड विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आमदारांनी सर्व झाडून पुसून कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्याची ही पहिलीच वेळ असून या बैठकीत प्रामुख्याने रखडलेल्या रेल्वे महामार्ग व राष्ट्रीय महामार्ग 361 तसेच शेतकऱ्यांच्या निगडित...
ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। क्रिकेट ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामना पाहण्यासाठी जमलेल्या क्रीडा रसिकांनी अभूतपूर्व जल्लोष करत रोहित शर्मा च्या टीमचे अभिनंदन केले. भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता .खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. सचिन उमर...
नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

Blog
नागपूर। कोकण ते खान्देश विदर्भ मध्य रेल्वेकडून (Periodicity) प्रायोगिक तत्त्वावर कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणारी गाडी क्र ०११३९/४० नागपुर मडगाव (गोवा)दरम्यान धावणाऱ्या  द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. आता विदर्भ ते कोकण चालणारी ही गाडी २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे. खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत चालवली जाणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडीक्र.०११३९ नागपुर जं ...
नांदेड जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन -NNL

नांदेड जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन -NNL

नांदेड
नांदेड। जिल्हयात तीन नवीन कायदयांच्या अंमलबजावणी करीता नांदेड पोलीस दलाकडून जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, जनतेने कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले आहे. भारतातील प्रमुख तीन फौजदारी कायदयांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. भारतात नव्याने 1) भारतीय न्याय संहिता 2023 2) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 व 3) भारतीय साक्ष अधिनियम- 2023 या प्रमाणे कायदयांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. या तीनही कायदयांना भारत सरकारने अधिसूचना जारी करुन मंजूरी दिली असल्याने दिनांक 01 जुलै, 2024 पासून तीनही कायदे संपुर्ण भारतात अंमलात येणार आहेत. नवीन कायदयांची अंमलबजावणी होणे करीता व जनतेस नवीन कायदयाची माहिती सहजरीत्या प्राप्त होणेकरीता दिनांक 01 जुलै, 2024 रोजी नांदेड पोलीस दलाकडून जिल्हयात पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन कायदयां...
नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाखाचा धनादेश वाटप -NNL

नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाखाचा धनादेश वाटप -NNL

नांदेड
नांदेड। लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदार संघातील नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना नांदेड दक्षिण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख रुपयांचे लोहा तहसिल कार्यालयात धनादेश वाटप करण्यात आले. नुकतेच काही दिवसांपूर्वी लोहा तालुक्यातील व नांदेड दक्षिण मतदारसंघातील शेवडी बा.येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडला यात वादळी वाऱ्यासह पावसापासून बचाव करण्यासाठी शेवडी बा. येथील शेतकरी शिवाजी विठ्ठल मुडेवाड ट्रॅक्टरच्या टाॅलीच्या आडोशाला थांबले असता ट्रॅक्टरची टॅली उलटुन शेतकरी शिवाजी विठ्ठल मुडेवाड यांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या एका घटनेत शिवणी जामगा येथील महिला सुनंदा श्रीराम जामगे या शेतात काम करीत असताना जोरदार विजेच्या कडकडाटासहित पाऊस पडत असताना अचानक आकाशातून वीज सुनंदा श्रीराम जामगे यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या दोन्ही कुटु...
सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत सायकलीने धरली शाळेची वाट ” म.ज्यो. फुले विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातून 261 मुलींना सायकली -NNL

सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत सायकलीने धरली शाळेची वाट ” म.ज्यो. फुले विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातून 261 मुलींना सायकली -NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। " घरापासून शाळेपर्यंत दररोज ये-जा करण्याची थांबली आता  पायपीट , सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत  सायकलीने धरली शाळेची वाट " अशीच प्रचिती आदिम तालुक्यातील गुणवत्तेचं ज्ञानपीठ असलेल्या  गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आली. पुढील वर्ग  व वाहतुकीची साधनं नसल्याने सातवीनंतर शाळा सोडण्याचं मुलींचं जास्त प्रमाण ग्रामीण भागात दिसून यायचं. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक कुटुंबातील पालक आपल्या मुलींसाठी वाहतूक सुविधा किंवा सायकल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे अनेक मुलींना शिक्षण सोडावे लागते त्यामुळे शाळेत मुलींची मोठी गळती होते. ही गळती थांबवण्यासाठी सरकारने मुलींना 5 किमीच्या आत घर ते  शाळा ये-जा करण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना मोफत सायकल वाटप योजना सुरू केली आहे. त्यामुळे अनेक मुल...
तालुका क्रीडा संकुलासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर; आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित -NNL

तालुका क्रीडा संकुलासाठी ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर; आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
श्रीक्षेत्र माहूर। माहुर येथील तालुका क्रीडा संकुलासाठी शासनाने ४ कोटी ९९ लक्ष रुपये मंजूर केले आहे. किनवट /माहूर विधानसभा मतदार संघाचे कार्यकुशल आ.भिमराव केराम यांच्या प्रयत्नांचे मोठे फलित असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. लवकरच क्रीडा संकुलाचा मुहूर्त साधला जाईल अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे यांनी दिली आहे. माहुर तालुक्यात विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची वाढती संख्या, सोई,सुविधा,साधने, मैदान, अनुभवी प्रशिक्षक आदी बाबींचा अभाव व अनेक स्पर्धेतून क्रीडा क्षेत्रात माहुर तालुक्याचे नाव मोठे करणाऱ्या खेळाडूंची गरज लक्षात घेऊन आ.भिमराव केराम यांनी क्रीडांगण आणि क्रीडा संकुलासाठी अविरतपणे पाठपुरावा केला होता. पांडवलेणी जवळील २-५० एकर शासकीय जागेत सदर क्रीडा संकुल उभारले जाणार आहे.क्रीडा संकुलाचा मार्ग प्रशस्त करून दिल्याबद्दल नगरसेवक सागर महामुने,अनिल वाघमारे यांचेसह ...
दिंडीतील भाविकांसाठी सासवड येथे 2 आणि 3 जुलै मोफत उपचार शिबिर -NNL

दिंडीतील भाविकांसाठी सासवड येथे 2 आणि 3 जुलै मोफत उपचार शिबिर -NNL

नांदेड
नांदेड। नांदेड येथील सूजोक , निसर्गोपचार तज्ञ डॉ. संभाजी पवार आणि त्यांचा टीम द्वारे भाविकांच्या गुडघे , कंबर दुखी यावर मोफत उपचार करण्या साठी सासवड येथील माऊलीच्या मुक्कामा जवळ मेन रोड वर 2आणि 3जुलै रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . हडसर ते सासवड दिवेघाट मार्गे जवळ पास 32 किलोमिटर चा सर्वात अवघड आणि मोठा पल्ला असतो. भाविका मध्ये वयस्कर मंडळी जास्त असते त्यांना गुडघे,कंबर दुखी चा संभवतो. यासाठी दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा सासवड येथे मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सूजोक, अकुप्रेसर, मसाज, निसर्गोपचार द्वारे तज्ञ डॉ.संभाजी पवार, डॉ. अवधुत पवार आणि त्यांच्या टीम द्वारे मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या वेळी त्यांच्या सोबत नरेद्रसिंघ ग्रंथी , बाळासाहेब पवार , डॉ प्रविण जाधव , उधव काकडे , अशोक जाधव , उधव जाधव , आकाश चिलगर , आकाश जाधव, अल्केश भोसीकर , अरविंद जा...
नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह ; शैक्षणिक धोरणातील बदल ही काळाची गरज – प्रा. मोटेगावकर -NNL

नवीन शैक्षणिक धोरण स्वागतार्ह ; शैक्षणिक धोरणातील बदल ही काळाची गरज – प्रा. मोटेगावकर -NNL

नांदेड
नांदेड। मागील 40 वर्षापासून शैक्षणीक धोरणात कोणतेही बदल केले गेले नाहीत. तर शासन आता शैक्षणीक धोरणात आमूलाग्र बदल करु पाहतेय. आणि हा बदल झालाच पाहिजे, शासनाने सुरू केलेल्या नवं शैक्षणीक धोरण ही सध्या काळाची गरज आहे. असे मत नवं शैक्षणीक धोरणाबाबत प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी व्यक्त केले. या शैक्षणिक धोरणाबाबत अनेक पालक संभ्रमावस्थेत आहेत. आणि हे स्वाभाविक आहे. कारण हे नवं शैक्षणीक धोरण चांगले आहे की नाही. सरकार हे धोरण राबवून जे प्रयोग करते आहे. यामुळे आपल्या पाल्याचे भवितव्य धोक्यात तर येणार नाही ना? असे अनेक प्रश्न आज पालकांना या नवं शैक्षणीक धोरणाबाबत आहेत. याविषयी जागृती अभियान राबवून पालकांच्या शंकेचे निरसन केले गेले पाहिजे. कारण सरकार राबवीत असलेले हे नवं शैक्षणीक धोरण अत्यंत उत्तम आहे. नवं शैक्षणीक धोरणात विद्यार्थ्याना आपल्या आवडीचे विषयांची निवड करून ध्येय ठरविता येते. अनेक ...
error: Content is protected !!