Thursday, May 14

ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

नांदेड। क्रिकेट ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामना पाहण्यासाठी जमलेल्या क्रीडा रसिकांनी अभूतपूर्व जल्लोष करत रोहित शर्मा च्या टीमचे अभिनंदन केले.

भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता .खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.

भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. सचिन उमरेकर यांनी सामने दाखवण्यासाठी हॉल उपलब्ध करून दिला होता.१९९९ पासून दिलीप ठाकूर हे क्रिकेट विश्वचषकातील भारताचे सर्व क्रिकेट सामने मोठ्या पडद्यावर निशुल्क दाखवत असतात.आतापर्यंत पन्नास षटकांचे ७ वेळा आणि ट्वेंटी २० विश्वचषकाचे ८ वेळा दिलीप ठाकूर यांच्यातर्फे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले.

२००७ आणि २०११ मध्ये भारताने एक दिवसीय विश्वकप जिंकल्यानंतर तसेच ट्वेंटी २० विश्वचषक २००७ मध्ये हिंदुस्थानने जिंकल्यानंतर भव्य रॅलीचे देखील दिलीप ठाकूर यांनी आयोजन केले होते. रोमहर्षक सामन्याचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिकांनी अर्धा तास आधीपासूनच प्रचंड गर्दी केल्यामुळे संभाजी उमरेकर हाइट्स ,शिवाजीनगर नांदेड येथील सभागृह खचाखच भरले होते. प्रक्षेपण अतिशय स्पष्ट व भव्य असल्यामुळे स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद लुटला.

IMG 20240630 WA0031 ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

भारताला विजय मिळाल्यानंतर प्रेक्षकांनी प्रचंड घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. तिरंगे झेंडे हातात घेऊन अनेक जण उत्साहात नाच करत होते. दिलीप ठाकूर यांना खांद्यावर उचलून बुलंद आवाजात घोषणा देण्यात आल्या.सामना संपल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, प्रदीपसिंह हजारी, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा , हुकूमसिंग ठाकूर, विलास जोगदंड, ॲड.करण जाधव,राजेश पावडे , शेख इम्रान, चक्रधर खानसोळे यांनी परिश्रम घेतले. दर वेळेस क्रीडा रसिकांना मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामने पाहण्याची मोफत सोय करत असल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे क्रिकेट प्रेमींनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!