Thursday, May 14

Tag: After India beat South Africa in the final of the Twenty20 World Cup; Sports fans gave unprecedented cheers to Rohit Sharma’s team

ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

ट्वेंटी-ट्वेंटीच्या अंतिम फेरीत हिंदुस्तानने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर क्रीडा रसिकांचा अभूतपूर्व जल्लोष -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड। क्रिकेट ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हिंदुस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व सुरेश लोट यांच्यातर्फे लावण्यात आलेल्या मोठ्या पडद्यावर क्रिकेट सामना पाहण्यासाठी जमलेल्या क्रीडा रसिकांनी अभूतपूर्व जल्लोष करत रोहित शर्मा च्या टीमचे अभिनंदन केले. भाजपा नांदेड महानगर व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल , अमरनाथ यात्री संघाच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता .खा. अशोकराव चव्हाण,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खा.डॉ. अजित गोपछडे, मराठवाडा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, ला. योगेश जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडकरांना स्टेडियम मध्ये बसल्याचा आनंद मोफत लुटण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. भाजप वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ. सचिन उमर...
error: Content is protected !!