Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

The high pressure power line in Taroda area should be removed | तरोडा भागातील उच्चदाब विद्युत वाहिनी काढण्यासाठी नागरिकांचे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शहरातील जगमवाडी येथून निघालेली लाईन छत्रपती शाहू महाराज चौक, उल्हासनगर, पाटबंधारे नगर,जेतवन नगर, वैशाली नगर,तरोडा बु. व खु.ते सांगवी भागातील दाट लोकवस्तीतून गेलेली उच्चदाब विद्युत वाहिनी नवीन लिंक लाईन कॅनाल रोड ने टाकण्यात यावी यासाठी या भागातील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने आज दि. 22 जुलै 2024 रोजी महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता डोये साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता जाधव साहेब यांचीही यावेळी उपस्थिती होती. नांदेड शहरातील तरोडा बु. व खु. भागातून 33 के.व्ही. ची वीज वाहिनी गेली असून पूर्वी या भागात विरळ वस्ती असल्यामुळे त्याचे कोणालाही काही वाटत नव्हते. परंतु आता या भागात वस्ती वाढ होऊन यापासून अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे व या वीज वाहिनीमुळे आतापर्यंत अनेकांचे जीवही गेले आहेत. त्याबाबत वेळोवेळी या भागातील नागरिकांनी संबंधितां...
Celebrating Guru Poornima on behalf of Kinwat Sanskar Bharati | किनवट संस्कार भारतीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा – NNL

Celebrating Guru Poornima on behalf of Kinwat Sanskar Bharati | किनवट संस्कार भारतीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| सबंध विश्वाला एकात्मतेचा विचार देत कला साहित्य संगीत या क्षेत्रातील सर्व कलावंतांना एकत्रित करण्याचे काम संस्कार भारती करते असून यातून देश पातळीवर अनेक नवे न वे साहित्यिक कलावंत प्राप्त होत आहेत. कलेचे भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य संस्कार भारती करते असे प्रतिपादन किनवट येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संस्कार भारती देवगिरी प्रांत वनवासी कला आयाम प्रमुख डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक सदभाव जिल्हाप्रमुख आनंद सोनटक्के, नामदेवजी गवळे होते यावेळी मंचावर शहराध्यक्ष प्रशांत कुलकर्णी संस्कार भारतीचे नृत्य विधाप्रमुख सचिन शिंदे तसेच प्रतिष्ठित नागरिक गणपत काशिनाथ गीते, दादाराव नरबा कागणे, महाजन भुजंगा मरडे उपस्थित विस्तारक ओमकार ढोणे, युवराज आडे होते. गोकुंदा येथील शिवशंकर नगरात श्री महादेवाच्या भव्य अश...
The tree planting movement was strengthened by distributing fruit saplings | रवि नेम्माणीवार यांनी फळ रोपटे वाटप करून वृक्ष लागवड चळवळीला बळ दिले – गशिअ. ज्ञानोबा बने – NNL

The tree planting movement was strengthened by distributing fruit saplings | रवि नेम्माणीवार यांनी फळ रोपटे वाटप करून वृक्ष लागवड चळवळीला बळ दिले – गशिअ. ज्ञानोबा बने – NNL

नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| वाढदिवसानिमित्त इतर खर्च न करता , कुटूंबाला घेऊन देवदेव करत पर्यटन करण्यापेक्षा वृक्षमित्र रवि नेम्माणीवार यांनी फळ रोपटे वाटप करून वृक्ष लागवड चळवळीला बळ दिल्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे , असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी केले. तालुक्यातील गोकुंदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नयाकॅम्प केंद्राचे केंद्रिय मुख्याध्यापक वृक्षमित्र रवि नेम्माणीवार यांनी  आपल्या 53 व्या वाढ दिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना घरी लावण्यासाठी सिताफळ व पेरूचे रोपटं वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी उपसरपंच शेख हैदर शेख युसूफ उपाख्य सरू भाई , माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य शेख सलीम , मनसब योग साधना केंद्राचे संचालक अखिल खान , सभापती अमजद पठाण (वाई) ,ग्राम पंचायत सदस्य ज्योतिब गोणारकर , ज्ञानेश्वर सिडाम ,...
Plantation of trees by Marotrao Hendre | वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ लकडोबा हिंदू स्मशान भूमीत मारोतराव हेंद्रे यांच्यातर्फे वृक्षलागवड – NNL

Plantation of trees by Marotrao Hendre | वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ लकडोबा हिंदू स्मशान भूमीत मारोतराव हेंद्रे यांच्यातर्फे वृक्षलागवड – NNL

नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| वाढते प्रदूषण आणि पर्यावरणाचा होऊ लागलेला ऱ्हास तसेच पाण्याहची कमतरता लक्षात घेऊन लकडोबा चौकात असलेल्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमी समितीने पावसाळा सुरु झाल्यापासून वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात नगरपंचायतीचे कर्मचारी मारोतराव हेंद्रे यांनी सहभाग घेऊन वडिलांच्या स्मृती प्रीत्यर्थ सुपारीची २१ झाड दान देऊन त्याची लागवड केली आहे. हिंदू स्मशान भूमीच्या सामाजिक कार्यात शहरातील इतर नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं. हिमायतनगर शहरातील लाकडोबा चौक परिसरात असलेल्या हिंदू स्मशान भूमीचे आता स्वर्गात रूपांतर होऊ लागले आहे. येथील स्मशानभूमीच्या कायापालट करण्यासाठी मागील वर्षभरापासून दर रविवारी येथील वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमी समितीच्या युवकांनी श्रमदान करण्याला सुरुवात केली आहे. युवकांच्या श्रमसदनात शहरातील विविध जागरूक नागरीकातून सहकार्य मिळत...
Khirdan on the occasion | कांचननगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व गुरूपौर्णिमा निमित्ताने खीरदान – NNL

Khirdan on the occasion | कांचननगर येथे अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व गुरूपौर्णिमा निमित्ताने खीरदान – NNL

नांदेड
नांदेड| साहित्यरत्न ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त व गुरूपौर्णिमा निमित्ताने कांचननगर ता.जि.नांदेड येथील सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली खीरदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. दरवर्षी कांचननगर ता.जि.नांदेड येथील सामाजिक युवा कार्यकर्ते सचिन खंदारे विविध प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात. नुकताच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ व गुरूपौर्णिमा निमित्ताने खीरदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यास समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून खीरीचा आस्वाद घेतला. यावेळी सौ.अनिताबाई खंदारे ( ग्रामपंचायत सदस्या ) सौ.कमलबाई खंदारे. सौ.सुनिताबाई खंदारे , सौ.भाग्यश्री खंदारे , सौ. अश्विनी खंदारे , सौ.वैशाली खंदारे , सौ.दीपाली सूर्यटले , यांची उपस्थिती होती. खीरदान वाटपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुर्यकांत खं...
Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी – NNL

Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी – NNL

नांदेड
नांदेड| अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या भागातील नागरिकांनी ह्या मार्गांवरील अनाधिकृत हातगाडे हटवावीत अश्या मागणीचे निवेदन दि.22 जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यामार्फत आयुक्तांना पाठविले आहे. देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांचे म्हणणे आहे कि, आमची परवानगी न घेता काही व्यक्तींनी जबरदस्ती हातगाडे लावलेले आहेत. ह्या हातगाड्यामुळे सदरील रोडवर नेहमी ट्रैफिकजाम राहते एम्बुलन्स येण्या-जाण्यासाठी सुध्दा अवघड झाले आहे. आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी सुध्दा अवघड होत आहे. हे हातगाडेवाले ग्राहकासोबत दादागीरी करुन नेहमी भांडण सुध्दा करीत आहेत. सदरील हातगाडेवाले कचरा बाजुच्या नालीमध्ये टाकत आहेत व उरलेला कचरा रोडवर टाकत आहेत. त्यामुळे नालीचे पाणी तुंबत आहे व घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तसेच सदरील हातगाडेवाले माईकव्दारे ओरडून ध्वनीप्र...
Anil Mane Karanjikar | हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र अनिल माने करंजीकर यांना हिंदी भाषेतील पि एचडी प्रदान – NNL

Anil Mane Karanjikar | हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र अनिल माने करंजीकर यांना हिंदी भाषेतील पि एचडी प्रदान – NNL

नांदेड
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्याचे भूमिपुत्र ताठ जेष्ठ पत्रकार लक्ष्मण माने यांचे सुपुत्र अनिल लक्ष्मण माने यांना तमिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयातून हिंदी भाषेची पी.एच.डी. प्रदान करण्यात आली आहे. याना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल नातेवाईकांसह मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे. नांदेड जिल्ह्यातील गरीब कुटुंबातील युवक अनिल लक्ष्मण माने याने शिक्षणाबाबत असलेली आस्था आणि जिद्दीच्या जोरावर "आधुनिक हिंदी कविता और मानव मूल्य" (इक्कीसवीं सदी के प्रथम दशक के विशेष संदर्भ में) या विषयात पी.एच.डी. चा प्रबंध सादर केला. या यशामध्ये त्यांना शोध निर्देशक - आचार्य. एस. वी. एस. एस नारायण राजू यांच मोलाचे मार्गदर्शन मिळाले. अत्यंत खडतर परिस्थितीत सुद्धा अनिल यांनी शिक्षणाची जिद्द सोडली नाही.आई वडिलांच्या आशीर्वादाने हे सर्वोच्च यश मिळवल असे त्यांनी आमच्या प्रतिनिधीस बोलताना सांगितलं. या अगोदर स्वामी रामानंद त...
Be alert in the wake of heavy rains – Chief Minister Eknath Shinde | प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Be alert in the wake of heavy rains – Chief Minister Eknath Shinde | प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ, स्थानिक स्वराज्य संस्थांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

महाराष्ट्र
मुंबई| भारतीय हवामान खात्याने मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी मदत करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. सर्व प्रशासनाने सतर्क राहावे, हवामान खात्याकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून परिस्थितीची वेळोवेळी माहिती घेण्यात यावी आणि त्यानुसार नियोजन आणि व्यवस्थापन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. दुर्घटनेच्या संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण करावे, नागरिकांना त्याबाबत सतर्क करावे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिक्रिया दलाची (SDRF) तयारी उच्च पातळीवरची असावी. बंधारे, तलाव यांचे पाणीस्तर निर्धारित करावेत आणि पुराचा धोका ...
शिवाजी महाविद्यालय सिडको दोन विधार्थी आय. आय. टी. साठी निवड – NNL

शिवाजी महाविद्यालय सिडको दोन विधार्थी आय. आय. टी. साठी निवड – NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड येथील अमेय शशिकांत बल्लाळ व कु.ऋतुजा गजानन चक्रावार या दोन विद्यार्थ्यांचा अनुक्रमे आय. आय. टी जोधपुर व आय. आय. टी मंडी येथे निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे. शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड येथील अमेय शशिकांत बल्लाळ व कु.ऋतुजा गजानन चक्रावार या दोन विद्यार्थ्यांचा अनुक्रमे आय. आय. टी जोधपुर व आय. आय. टी मंडी येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी या संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव यांच्या मार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक विकास पाटील, सौ.देगावकर ,वरिष्ठ लिपिक वसंत वाघमारे, सुनील देवकर, गजानन सूर्यवाड आदींची उपस्थिती होती....
Give strength to the true leaders of the movement | चळवळीतील सच्चा नेत्यांना बळ द्या : प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन – NNL

Give strength to the true leaders of the movement | चळवळीतील सच्चा नेत्यांना बळ द्या : प्रा. राजू सोनसळे यांचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| आंबेडकरी चळवळीच्या नावावर स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या आणि संधी साधू नेत्यांपासून आता सावध होण्याची वेळ आली असून चळवळीतील सच्चा नेत्याच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन आंबेडकरी चळवळीतील नेते प्राध्यापक राजू सोनसळे यांनी केले आहे . नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सिद्धार्थनगर येथील पंचशील विहाराला भेट दिली असता ते येथील नागरिकांशी संवाद साधत होते. पुढे बोलताना प्रा. राजू सोनसळे म्हणाले की , नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसीचा उमेदवार देण्यात आला होता परंतु ओबीसीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वंचित मधील आणि आंबेडकरी चळवळीतील काही स्वार्थी नेतृत्व घराच्या बाहेर पडले नाही . आपल्या घरातूनच आपण प्रचार करत असल्याचे नाटक त्यांनी केले. परिणामी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. खरे तर अशा परपोषी नेतृत्वापासून आपण सावध होण्याची व...
error: Content is protected !!