HomeनांदेडCelebrating Guru Poornima on behalf of Kinwat Sanskar Bharati | किनवट संस्कार...

Celebrating Guru Poornima on behalf of Kinwat Sanskar Bharati | किनवट संस्कार भारतीच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा – NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| सबंध विश्वाला एकात्मतेचा विचार देत कला साहित्य संगीत या क्षेत्रातील सर्व कलावंतांना एकत्रित करण्याचे काम संस्कार भारती करते असून यातून देश पातळीवर अनेक नवे न वे साहित्यिक कलावंत प्राप्त होत आहेत. कलेचे भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य संस्कार भारती करते असे प्रतिपादन किनवट येथे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त संस्कार भारती देवगिरी प्रांत वनवासी कला आयाम प्रमुख डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सामाजिक सदभाव जिल्हाप्रमुख आनंद सोनटक्के, नामदेवजी गवळे होते यावेळी मंचावर शहराध्यक्ष प्रशांत कुलकर्णी संस्कार भारतीचे नृत्य विधाप्रमुख सचिन शिंदे तसेच प्रतिष्ठित नागरिक गणपत काशिनाथ गीते, दादाराव नरबा कागणे, महाजन भुजंगा मरडे उपस्थित विस्तारक ओमकार ढोणे, युवराज आडे होते. गोकुंदा येथील शिवशंकर नगरात श्री महादेवाच्या भव्य अशा मंदिरात पति वर्षाप्रमाणे याही वर्षी किनवट संस्कार भारतीच्या वतीने गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला प्रथम भारत माता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यावेळी संस्कार भारतीचे जिल्हाप्रमुख संजय महाजन मरडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प ग्रंथ व एक वृक्ष देऊन स्वागत केले. यावेळी संस्कार भारतीचे कार्यकर्ते धोंडीबा साकुळे व शिवशंकर नगर मधील सात्विक कोतुरवार कार्तिक कोतुरवार, विवेक कोतुरवार प्रणव कोतुरवार, पुणेश साईनाथ कासटकर, रोशन पल्लाळे ,साईनाथ यादव कर ,प्रदीप तिरमलदार गणेश राजुटकर, शिवप्रसाद साकुळे शिवहरी साकुळे मारुती केंद्रे, सोहन सोनटक्के ,गुरुनाथ मरडे, गजानन साकुळे अनेक युवकांनी यामध्ये मोठा सहभाग नोंदवला.

गुरुपौर्णिमेनिमित्त आपले विचार मांडताना मार्तंड कुलकर्णी यांनी अनेक महत्त्वपूर्ण उदाहरण देऊन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजयजी मरडे यांनी केले आपल्या अध्यक्ष समारोपात आनंद सोनटक्के यांनी संघाच्या एकूण उत्सवातील पौर्णिमा उत्सवाचे महत्त्व सांगत संस्कार भारतीचे कार्य कसे चालते यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमासाठी नगरातील मोठ्या प्रमाणात नागरिक आदी मान्यवर जेष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धोंडीबा साकुळे यांनी केले कार्यक्रमासाठी नगरातील संघ शाखेचे स्वयंसेवक.. प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते..

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments