Sunday, July 5

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

A case has been registered against police inspector of Hadgaon | पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल – NNL

क्राईम, नांदेड
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तालुक्यातील पेवा गावाचे पोलिस पाटील बालाजी केशवराव जाधव ( वय 48) यांनी पेवा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपुर्वी त्यानी हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याच व्हिडीओ त्यांनी बनवला होता. या घटनेमुळे हदगाव तालूक्यात व नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान आज पोलिस पाटील आत्महत्येप्रकरणी हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे पेवा गावचे पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात हदगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सदाशिव भडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. माझ...
Gurukul Public School, Nanded | नांदेडच्या गुरुकुल पब्लिक स्कुल मध्ये संस्कार भारती नांदेडचा आगळा वेगळा गुरुपौर्णिमा साजरी – NNL

Gurukul Public School, Nanded | नांदेडच्या गुरुकुल पब्लिक स्कुल मध्ये संस्कार भारती नांदेडचा आगळा वेगळा गुरुपौर्णिमा साजरी – NNL

नांदेड, करियर
नांदेड | भारतीय संस्कृती मध्ये व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा पर्वास अनन्यसाधारण असे महत्व आहे. आपल्यावर संस्कार करणाऱ्या गुरुप्रति आदरभावना व्यक्त करण्याचा दिवस असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना याचे महत्व कळावे; यासाठी संस्कार भारती नांदेड; दरवर्षी एका शाळेमध्ये पारंपरिक गुरु पूजन सोहळ्याचे आयोजन करते. या वर्षी दि.२२ जुलै २०२४ रोजी नांदेड संस्कार भारतीच्या वतीने गुरुकुल पब्लिक स्कूल मध्ये पारंपरिक गुरू पूजन सोहळा संपन्न झाला. आरंभी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सौ.चारुताताई देशपांडे यांचे समवेत संस्कार भारती नांदेडच्या अध्यक्षा राधिका वाळवेकर, मार्गदर्शक तथा संरक्षक सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. दीपक कासराळीकर, कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद देशपांडे आणि गुरुकुलच्या मुख्याध्यापिका सौ.वैशाली देशमुख आणि सौ.पल्लवी जोशी या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, नटराज पूजन, व्यास पूजन व सरस्वती पूजनाने कार्यक्...
Nana Patole | धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: नाना पटोले – NNL

Nana Patole | धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प: नाना पटोले – NNL

राजकीय
मुंबई| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही. गेल्या १० वर्षापासून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात जनतेच्या हितापेक्षा हेडलाईन मॅनेजमेंटचीच काळजी घेतलेली दिसते. देशात आज बेरोजगारीची मोठी समस्या असताना तरुणांना पक्क्या नोकऱ्या देण्यासाठी सरकारकडे कोणतेही ठोस धोरण नाही. शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतूद नाही, एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली असून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघु, छोटे व मध्यम उद्योगासह सर्वसामान्यांची निराशा केली आहे. सरकार टिकवण्यासाठी बिहार आणि आंध्रप्रदेशला मोठा निधी आणि महाराष्ट्राच्या तोंडाला मात्र पाने पुसली आहेत यावरून शिंदे-फडणवीस-अजित पवारांनी केंद्रात काही पत नाही ह...
An appeal to machine owners to register | मृद व जलसंधारणाच्या कामासाठी मशिनधारकांना नोंदणी करण्याचे आवाहन- NNL

An appeal to machine owners to register | मृद व जलसंधारणाच्या कामासाठी मशिनधारकांना नोंदणी करण्याचे आवाहन- NNL

नांदेड, कृषी
नांदेड| राज्यात मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशिनधारकांची नोंदणी करणेबाबत 8 जानेवारी 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच संचालक, मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी याबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार पुढील तपशिलाप्रमाणे मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी मशिनधारकांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नांदेड यांनी केले आहे. मशिनधारकांची नोंदणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता निश्चित करण्यात आली आहे. मशिनधारक महाराष्ट्रातील रहिवासी असावा. स्वत:च्या मालकीची उत्खनन किंवा बॅकहोल लोडर उत्खनन या प्रवर्गामध्ये असणारी तत्सम मशिनरी (जेसीबी, पोकलेन, टाटा हिताची, ह्यूंदाई व इतर ) असावी. पॅनकार्ड, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेतील खाते , जीएसटी क्रमांक इ. मृद व जलसंधारणाची कामे करण्यासाठी इच्छूक असलेल्या...
Nitin Bhutada | जीन प्रेस संचालकांच्या उदारतेमुळे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा – नितीन भुतडा – NNL

Nitin Bhutada | जीन प्रेस संचालकांच्या उदारतेमुळे छत्रपतींचा पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा – नितीन भुतडा – NNL

Blog, उमरखेड, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासंदर्भातील अडचण असलेल्या चार दुकानदारांना जीन प्रेस मधील कॉम्प्लेक्स मध्ये दुकाने देण्याचे ठरल्यामुळे त्या चार दुकानदारांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणी तडजोड झाली असल्याने जीन प्रेस संचालकांनी दाखवलेल्या उदारतेमुळे छत्रपतींच्या पुतळ्याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ऑगस्ट महिन्यात पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात येईल अशी माहिती भाजपाचे जिल्हा समन्वय तथा जीन प्रेस कोअर कमिटीचे सदस्य नितीन भुतडा यांनी पत्र परिषदेत दिली . छत्रपती शिवरायांचा बंदिस्त अश्वारूढ पुतळा मोकळा करून नियोजित जागेत उभारण्यात यावा यासाठी काल दि 22 जुलै शिवप्रेमींनी जन आंदोलन उभारले होते .नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांनी एका महिन्यात पुतळा उभारणीचे काम सुरू करू या आश्वासनावर सदर आंदोलन मागे घेण्यात आले .प्रशासनाने दिलेले आश्वासन हे दुकानदारांनी...
Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL

Free the locked statue of Chhatrapati Shivaji and erect it with dignity | छत्रपती शिवरायांचा बंदिस्त पुतळा मुक्त करून सन्मानाने उभारा; उमरखेड कडकडीत बंद – NNL

उमरखेड, महाराष्ट्र, हिंगोली
उमरखेड, अरविंद ओझलवार| छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील तीन वर्षापासून नगरपरिषद च्या प्रांगणातील शेडमध्ये बंदिस्त करून ठेवला आहे . सदर पुतळ्यासंदर्भात मागील तीन वर्षात अनेक उपोषण व आंदोलन झाले परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज 22 जुलै रोजी जन आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. त्यानुसार आज सकाळी 11 वाजता शिवप्रेमींनी नगरपरिषद मध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु नगर परिषदेचे मुख्य द्वारावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने गेट जवळ थांबून ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान न . प. मुख्याधिकारी यांनी शिवप्रेमींना दोन महिन्याचा कालावधीचे पत्र दिले असताना ते नकारात त्वरित कार्यवाही करण्याची मागणी करत पत्र फाडून टाकण्यात आले यावेळी आक्रमक झालेल्या शिवप्रेमींना पोलिसांनी अडवल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .दरम्यान आज शिवप्रेमींनी दिलेल्या शहरा...
Rotarian Surendra Kodgirwar | रोटरीयन सुरेंद्र कोडगिरवार सपत्निक सन्मानित – NNL

Rotarian Surendra Kodgirwar | रोटरीयन सुरेंद्र कोडगिरवार सपत्निक सन्मानित – NNL

Blog, उमरखेड, हिंगोली
उमरखेड| सुरेंद्र कोडगिरवार यांनी रोटरी क्लब मध्ये सतत २५ वर्षे सेवारत असल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार फेटा शाल। सन्मान चिन्ह देऊन रोटरी क्लबचे प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्रांतपाल अरुण कावडकर, समन्वयक किशोर राठी,रोटरी क्लब उमरखेड चे संस्थापक अध्यक्ष डॉ या. मा. राऊत,अध्यक्ष दत्ता गंगासागर,सचिव चेतन माहेश्वरी, कैलास उदावंत ,व्यासपीठावर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देतांना सुरेंद्र कोडगिरवार। म्हणाले रोटरी क्लब साठी हे वर्ष रोप्ममोहत्सवी असल्याने या वर्षी विशेष प्रकल्प राबउन क्रीडा, शिक्षण, आरोग्य,कृषी ,याशिवाय विविध क्षेत्रात भरीव। कामगिरी करून जिल्हा स्तरावर रोटरी क्लब उमरखेड चे नाव लौकिक करू असे मत कोडगिरवार यांनी व्यक्त केले...
Himayatnagar railway gate road potholes suffer motorists | हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता वाढली  – NNL

Himayatnagar railway gate road potholes suffer motorists | हिमायतनगर रेल्वे फाटक रस्त्याच्या खड्डयांमुळे वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता वाढली – NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| किनवट - भोकर या राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या हिमायतनगर शहराजवळील रेल्वे फाटक रस्त्यावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. येथून जाताना रस्त्यात खड्डा आहे कि... खड्ड्यात रस्ता हे कळणे अवघड बनले आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. संबंधित विभागाने या जीवघेण्या रस्त्याकडे लक्ष देऊन किमान पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ खड्डे बुजवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी केली जाते आहे. नांदेड जिल्ह्यातील धनोडा ते भोकर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ची निर्मिती करताना हिमायतनगर जवळील रेल्वे फाटकावरून उड्डाण पूल मंजूर करण्यात आला होता. दरम्यान ठेकेदारने हिमायतनगर ते धानोडा आणि भोकर ते रेल्वे फाटक दरम्यानच्या रस्त्याचे काम पूर्ण केले. मात्र संबंधित ठेकेदाराने हिमायतनगर शहरानजीक असलेल्या रेल्वे फाटक पासून उड्डाण पुलाचे काम जाणीवपूर्वक केले नाही. त्यामुळे रेल्व...
Lokmanya Tilak’s birth anniversary | हु ज पा महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती – NNL

Lokmanya Tilak’s birth anniversary | हु ज पा महाविद्यालयामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती – NNL

नांदेड
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयंवतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. डी. के. कदम हे होते. ते आपले विचार मांडताना म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे योगदान महत्त्वाचे होते. की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे एक देशभक्त होते. त्यांना भारतीय क्रांतीचे जनक म्हणतात असा मोलाचा संदेश लोकमान्य गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने बोलताना दिला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. के. कदम सर होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. डी. सी. देशमुख सर व आभार प्रदर्शन डॉ. एल. बी. डोंगरे सर यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी म...
Individual Farms under Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme |मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Individual Farms under Chief Minister Sustainable Agriculture Irrigation Scheme |मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

नांदेड
नांदेड| राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना राबविण्याबाबत 29 जून 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याचा अर्ज पुढील तपशिलाप्रमाणे करावा. या योजनेचा अर्ज करण्यासाठी सेतूसुविधा केंद्र, गावातील कृषि सहाय्यक, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे. लाभार्थी पात्रता अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.40 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रीकदृष्टया योग्य असणे आवश्यक. अर्जदार शेतकऱ्यांनी यापुर्वी मागेल त्याला शेततळे, सामूहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी निवड  ...
error: Content is protected !!