Tuesday, July 7

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालणार्‍यांना उच्च न्यायालयाची चपराक; अधिकार्‍यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश -NNL

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालणार्‍यांना उच्च न्यायालयाची चपराक; अधिकार्‍यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश -NNL

धार्मिक
मुंबई/उस्मानाबाद| श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात भ्रष्टाचार करणार्‍यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल केले नाहीत; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणार्‍या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांना अवमाननेची साधी नोटीस पाठवली आहे. तसेच धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना प्रत्यक्ष उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु विधिज्ञ परिषदे’चे अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी या वेळी कामकाज पाहिले. यापूर्वी न्यायालयाने दिलेले निर्देश न पाळल्याने हिंदु जनजागृती समितीने ही अवमानना याचिका दाखल केली होती. वर्ष १९९१ ते २००९ या काळात श्रीतुळजापूर मंदिर संस्थ...
दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचे कार्य – डॉ. अर्जुन मापारे -NNL

दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांचे कार्य – डॉ. अर्जुन मापारे -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| दुस-यासाठी जगला तो ख-या अर्थाने जगला या संतांच्या शिकवणी प्रमाणे धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर हे जीवन जगत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. अर्जुन मापारे यांनी केले. ४७ व्या महिन्याच्या कायापालट उपक्रमात ॲड.ठाकूर यांनी ५२ भ्रमिष्टांची कटींग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे, चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षिसी दिली. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणाऱ्या कायापालट उपक्रम पाहण्यासाठी डॉ. मापारे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना डॉ. मापारे असे म्हणाले की, समाजसेवा क्षेत्र म्हटले की,एकच नाव समोर येते ते म्हणजे दिलीपभाऊ ठाकूर यांचे. शंभरच्या आसपास उपक्रम ते सातत्याने राबवत असल्यामुळे करावे तितके कौतुक कमी आहे. यापुढे दरमहा भ्रमिस्टांच्या तपासणीसाठी मी येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मि...
Unprecedented response of Youth Congress to Balaji Gadhe’s Farmer Rumane Morcha : युवक काँग्रेसचे बालाजी गाढेच्या शेतकरी रुमणे मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद -NNL

Unprecedented response of Youth Congress to Balaji Gadhe’s Farmer Rumane Morcha : युवक काँग्रेसचे बालाजी गाढेच्या शेतकरी रुमणे मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद -NNL

नांदेड, कृषी
मुदखेड/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील मुदखेड शहरात युवक काँग्रेसच्या वतीने आज दि. 06 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील गाढे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या रुमणे मोर्चाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रुमणे मोर्चात सहभाग घेतला. युवक काँग्रेसच्या वतीने बालाजी गाढे पाटील यांनी मुदखेड तालुक्यातील शेतकरी जनतेच्या विविध मागण्यांना घेऊन शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक ते तहसील कार्यालय असा रुमणे मोर्चा आयोजीत केला होता. त्यात प्रामुख्याने शेतीविषयक, वीजेच्या समस्यांसंदर्भात व रस्ते तसेच निराधार, वृद्ध व अपंग घटकांच्या मागण्या शासनाच्या बहिऱ्या कानांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम, प्रदेश सरचिटणीस श्रावण रॅपनवाड, तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, शहराध्यक्ष कैलास गोडसे, राजअप्...
Nana Patole : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले -NNL

Nana Patole : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती. पण १० वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यातील जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप केले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा संपवण्याचे काम केले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपाने मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल कर...
Devotees response to Shree Hujur Saheb Nanded CIDCO to Shirdi padayatra : श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

Devotees response to Shree Hujur Saheb Nanded CIDCO to Shirdi padayatra : श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड| श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयात्रेला भाविक भक्तांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, महाआरती झाल्यानंतर साईबाबा कि जय, साईनाथ महाराज की जय या घोषणा देत या पदयात्रेला सुरूवात झाली. सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृटी ढोलताशांच्या गजरात मार्गक्रमण करतांना विविध भागात साईबाबा पालखी पुजन व सहभागी यात्रेकरूंना चहा, फराळ, फळे वाटप करण्यात आली. तर या यात्रेत खासदार अशोकराव चव्हाण यांच्या सह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक जणांनी व पत्रकार यांच्या सह महिला युवक युवती यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. दरवर्षी प्रमाणे याही तेराव्या वर्षी श्रावणमास निमित्ताने साईबाबा नगर . सिडको नांदेड हुजूर साहेब येथुन शिर्डी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पदयात्रेत जवळपास १०० भाविक भक्त सहभागी होणार असून, ही यात्रा ४१७ किलोमीट...
Police raided Hatbhatti liquor store in Vaivadi, Dabdari : हिमायतनगर तालुक्यातील दाबदरी, वायवाडी येथे हातभट्टी दारू अड्डय़ावर पोलीसांची धाड – NNL

Police raided Hatbhatti liquor store in Vaivadi, Dabdari : हिमायतनगर तालुक्यातील दाबदरी, वायवाडी येथे हातभट्टी दारू अड्डय़ावर पोलीसांची धाड – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| तालुक्यातील दाबदरी व वायवाडी गाव येथे हात भट्टी, गावठी दारू अड्डय़ावर धाड टाकून पोलीसांनी हातभट्टी, गावठी दारू जप्त केली आहे. हि कारवाई दि. ४ रविवारी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे. नुकतीच नांदेड येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपमहासंचालक शहाजी उमाप यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अविद्या धंदे बंद करा अश्या सूचना दिल्यानंतर हिमायतनगर पोलीस एक्शन मोडवर आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाबदरी येथे यातील नमूद आरोपीने विना परवाना बेकायदेशीर रित्या हातभट्टी, गावठी दारू किंमत ७ हजार रूपये अश्या स्वरूपाचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला माल मिळून आला. व तसेच वायवाडी येथे ही अश्याच स्वरूपाचा १४ हजार पाचशे रूपयांचा हात भट्टी, गावठी दारू किंमतीचा माल मिळून आल्याने दोन्ही ठिकाणच्या आरोपी विरु...
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना – NNL

बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उपाययोजना – NNL

देश विदेश
मुंबई| बांगलादेशातील नागरी अशांततेच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची पावले उचलली आहेत. या विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध होणे आणि त्यांची भारतात परतण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशातील अशांततेमुळे परदेशी नागरिकांच्या, विशेषतः अशांत भागात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तिथे शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला असून बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता त्वरित कृतीची गरज अधोरेखित केली आहे. प्रभावित ...
Four youths died after drowning in the quarry : खदानीत बुडून चार तरुणाचा मृत्यू ; लोहा तालुक्यातील झरी येथील घटना – NNL

Four youths died after drowning in the quarry : खदानीत बुडून चार तरुणाचा मृत्यू ; लोहा तालुक्यातील झरी येथील घटना – NNL

नांदेड, क्राईम
नांदेड, दत्ता शिराणे| नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे झरी येथे एका खदानीत बुडून चार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना दि. ६ मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील पाच तरुण हे सकाळी लोहा तालुक्यातील झरी येथील एका खदानीवर पोहण्यासाठी गेले होते. यातील चार जन पाण्यात उतरले. आणी एकजण मात्र बाहेर थांबला होता. पोहता येत नसल्याने व तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने शेख फुज्जाइल, काजी मुज्जमील, आफान, सय्यद सिद्दीकी हे १८ ते २० वयोगटातील तरूण या चार जनांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मोहम्मद फैजान हा एक जन पाण्याबाहेर असल्याने तो वाचला आहे. घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उप अधिक्षक सुशीलकुमार नायक, सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पा...
Battery operated spray pump : “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप” करिता लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे- NNL

Battery operated spray pump : “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप” करिता लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे- NNL

कृषी, नांदेड
नांदेड| कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे. या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२२-२३ ते २०२४-२५ या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप” या बाबीचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर दि. १4 ऑगस्ट, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करा...
Fake notes are coming in the market : हिमायतनगरातील व्यापाऱ्यांनो सावधान..? बाजारपेठेत येताहेत बनावट नोटा – NNL

Fake notes are coming in the market : हिमायतनगरातील व्यापाऱ्यांनो सावधान..? बाजारपेठेत येताहेत बनावट नोटा – NNL

नांदेड, क्राईम
हिमायतनगर| हिमायतनगर शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून २०० आणि ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात येत असल्याची ओरड होते आहे. याचा फटका शहरातील काही व्यापाऱ्यांना बसला आहे. इतर व्यापाऱ्यांनी तरी सतर्क होऊन खरेदी विक्रीचा व्यवहार करताना नोटा तपासून घेणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या दोन वर्षांनंतर पुन्हा हिमायतनगर बाजारपेठेत सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात बनावट नोटा चालविल्या जात असल्याचे सांगितले जात आहे. हिमायतनगर पोलिसांनी मागील काळात पोटा बु. येथे एका दुकानात नोटा चलनात आणताना हा प्रकार उघड झाला होता. त्याच्याकडून पोलिसांनी २०० आणि ५०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त करून कार्यवाही केली होती. आता पुन्हा हिमायतनगर बाजारपेठेत बनावट नोटा चलनात येत असल्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावर बनावट नोटांचे छायाचित्र फिरत असल्याने बनावट नोटांचा रॆकेट तर येथे सक्रिय झालं नाही ना..? अश...
error: Content is protected !!