Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Naseem Khan : अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी, विधानसभेत मविआचा झेंडा फडकवू: नसिम खान -NNL

Naseem Khan : अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी, विधानसभेत मविआचा झेंडा फडकवू: नसिम खान -NNL

राजकीय
मुंबई| अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रीत सदस्यपदी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांची नियुक्ती झाल्याने अल्पसंख्याक समाजासह सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. नसीम खान यांच्या रुपाने अल्पसंख्याक समाजाला राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व दिल्याबद्दल काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. अल्पसंख्याक समाज हा नेहमीच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पक्षानेही वेळोवेळी संधी दिलेली आहे.राहुलजी गांधी, मल्लिकार्जून खर्गे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या नवीन जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस व मह...
Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL

Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| शहरातील वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. या भागात खासदार, माजी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींसह प्रतिष्ठितांचे वास्तव्य असतांना देखील ड्रेनेज लाईन कनेक्शन आणि रस्त्याचे कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांमधून ओरड होत आहे. शहरातील वसंतनगर भाग सखल भाग म्हणून ओळखला जातो पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी या भागात पाणीच पाणी होते गतवर्षी बहुतांशाच्या घरात पाणीच पाणी शिरले होते मात्र यावर्षी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाच्या वतीने याभागात पाणी जमा होणार नाही यासाठी नालीकामास सुरुवात झाली त्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरु झाले पावसाळ्याच्या अगोदर ही कामे पूर्णत्वास होणे अपेक्षित असतांना देखील हे काम रखडवण्यातच गुत्तेदारांनी धन्यता मानली अशी परिस्थिती आहे. एक-दोन दिवस काम करायचे आणि नंतर ओरड झाल्यानंतर पुन्हा कामास स...
बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL

बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा केला जप्त -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नूतन पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे स्वाधीन अधीकारी नांदेड जिल्हा यांना अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सक्त आदेश दिले होते. त्यावरून बिलोली पोलीसांनी अवैध धंदद्यावर छापा मारून 1,38,990/-रू चा गुटखा जप्त केला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 18.08.2024 रोजी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, पोस्टे बिलोली हे स्वतः व पोउपनि दिलीप मुंडे, पोहेकों मारोती मुद्देमवार, पोकों घोंगडे, जळकोटे, विदयमवार, मपोशि सोळंके, होमगार्ड येडके, भालेराव असे पोस्टे बिलोली हध्दीतील अवैध धंद्यावर करवाई करणे करीता शासकीय वाहनांने जात असतांना, गस्त करीत असतांना जुना बसस्थानक बिलोली येथे आले. यावेळी त्यांना गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, बिलोली शहरामधील कुंडलवाडी रोडवरील नासीर पानशॉप या पानपट्टीवर एक इसम हा आपल्या ताब्यात विना परवाना बेकायदेशिररीत्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व आरोग्यास...
शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

शिवमहापुराण कथास्थळी शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| आपल्या रसाळ वाणीने शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून लाखो भाविकांना मंत्रमूग्ध करणारे विश्वविख्यात कथावाचक, भागवत भूषण, परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून त्यासाठी भव्यदिव्य आणि शाही मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दि. 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी ग्राउंड कौठा नांदेड येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळात शिवमहापुराण कथा वाचन होणार आहे. या महाकथेचा लाभ घेण्यासाठी सुमारे पाच लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित असल्याची माहिती डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत सावकार पातेवार यांनी दिली. सभास्थळी 50 बाय 100 फूटाचे विशाल शाही व्यासपीठ उभारण्यात येत आहे. भाविकांना कथेचा लाभ घेण्यासाठी 375 बाय 800 फूटाच्या जागेत तीन भव्य सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना पिण्याचे पाणी, पंखे, कुलर आदींसह पार्कीगचीही व...
सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

सिडकोत ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नविन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको येथिल स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे तथा फेस्कॉमचे सचिव जयवंत सोमवाड,पंढरीनाथ मोटरगे,निळकंठ कल्याणकर, देविदास कदम,एस.के. उदंडे,गणपत कौशल्य, मोहम्मद नुरुद्दीन, युसुफ शहाबुद्दीन, प्रीतम लिंबेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते....
शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने प्रभातफेरी मधील विधार्थी यांना खाऊचे वाटप -NNL

शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने प्रभातफेरी मधील विधार्थी यांना खाऊचे वाटप -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको परिसरात काढण्यात आलेल्या विविध शाळेतील प्रभातफेरी मधील विधार्थी यांना शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने खाऊचे वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेख असलम मित्र मंडळ यांच्या वतीने सिडको परिसरातील राज कॉर्नर परिसरातील भागात नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष शेख असलम यांच्या मार्गदर्शनाखाली शेख मुकरम, शेख युनूस, ईम्रानखान, आकाश कदम, शेख निजाम, शेख ऊसमान खान, दिनेश मिरासे, आकाश राऊत, शिवम घोरबांड, मोईनखान, अनिकेत राक्षसमारे,वैभव धोत्रे,शेख सिकंदर, तफरोज पठाण, यांच्या सह मित्र मंडळ यांनी खाऊचे वाटप केले. यावेळी माजी नगरसेविका डॉ. करूणा जमदाडे यांनी भेट देऊन ऊपकमाचे स्वागत केले. वसरणी येथील निवासी अंध विघालय, धनेगाव येथील अंध विघालय येथे फळे व खाऊचे वाटप करण्यात आले....
महाराष्ट्र कोणाची जाहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

महाराष्ट्र कोणाची जाहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही – प्रा. लक्ष्मण हाके -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे। ओबीसी बचाव मेळावा भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती शेड मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा. लक्ष्मण हाके महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु असलेल्या obc आरक्षणात मराठा समाज घुसखोरी करू पाहत आहे. आज पर्यंत सर्व सत्ता त्यांच्याच हाती आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत तेच सत्ताधारी असतानाही मराठा समाजाला ई डबल्यू एस, एस. बी. सि.यासारखे आरक्षण देऊनही आता दबावतंत्राचा वापर करून ओबीसी आरक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याकरिता आता सर्व ओबीसी नी एकत्र येऊन आपला माणूस कसा निवडून आणता येईल हेच ध्येय ठेवा असा सबुरीचा सल्ला दिला. महाराष्ट्र कोणाची जहागिरी नाही महाराष्ट्र कोणाची मक्तेदारी नाही.नाहीतर पुढीची पिढी तुम्हाला माफ करणार नाही असेही ठनकाहून सांगितलं.तर अशोक चव्हाण अंतरवेलीला अनेकदा पायघडी घालायला जातात पण त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील, मतदार संघातील ओबीसी च उपोषण ...
माकप आणि सीटूच्या आंदोलनास १९८ दिवसाच्या साखळी उपोषणा नंतर यश -NNL

माकप आणि सीटूच्या आंदोलनास १९८ दिवसाच्या साखळी उपोषणा नंतर यश -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। काही ५० - १०० व्हूज प्राप्त करणारे युट्युबर आणि काही तोडपाणीसाठी उपोषण करणारे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते तसेच काही लोकप्रतिनिधी माकप आणि सीटूच्या सुरु असलेल्या उपोषणातील मागण्या आता सुटणार नाहीत असा दावा करीत होते. परंतु अखेर सर्व दावे फोल ठरवीत लाल बावट्याच्या कार्यकर्त्यांनी अखंड संघर्ष करीत दि.८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर रास्ता रोको आंदोलन करीत जेल भरो केला आणि महाराष्ट्र राज्य शासनास शासन निर्णय घेण्यास भाग पाडले.   मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड तालुका कमिटी आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन जिल्हा कमिटीच्या अथक परिश्रमातून हा संघर्षशील इतिहास घडला आहे. माकप,जमसं,डीवायफ आणि सीटू च्या नांदेड येथील कार्यकर्त्यांनी १९८ दिवस साखळी उपोषणास बसून अखेर महाराष्ट्र शासनास जीआर काढण्यास भाग पाडले आहे. महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल यांच्या नावाने व ...
जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धेत गोदावरी पब्लिक  स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांचे विभागीय पातळीवर निवड -NNL

जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धेत गोदावरी पब्लिक  स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांचे विभागीय पातळीवर निवड -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नविन नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत जिल्हास्तरीय सायकलिंग शालेय क्रीडा स्पर्धा दि.११ आगस्ट २४ रोजी असर्जन रोड, विष्णुपुरी येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये गोदावरी पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली त्यात १४ - वर्षाखालील वयोगटामध्ये प्रथमेश सूर्यवंशी हा नांदेड जिल्ह्यात प्रथम आला आहे. तर १७ - वर्षाखालील वयोगटामध्ये गायत्री टिमके ही द्वितीय आली आहे. त्याचबरोबर या स्पर्धेत वेद रंगारी ,तुलसी जोशी ,गौरव मठपती, स्नेहा वडगावकर, या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ.शशिकला बिरादार,सचिव संभाजी बिरादार, प्राचार्य गोविंद तोरणे, क्रीडा शिक्षक डॉ. अभिजीत खेडकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या....
श्री.शिवलिंगेश्वर मंदिर सिडको ते श्री काळेश्वर मंदिर विष्णूपूरी भव्य पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

श्री.शिवलिंगेश्वर मंदिर सिडको ते श्री काळेश्वर मंदिर विष्णूपूरी भव्य पदयात्रेला भाविक भक्तांचा प्रतिसाद -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड। श्रावण मास निमित्ताने संयोजक संतोष कांचनगिरे यांच्या वतीने सिडको शिवलिगेश्वर मंदिर ते श्री काळेश्वर विष्णुपूरी येथे १८ आगस्ट रोजी काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत माजी मुख्य पुजारी पिंटू महाराज ,सनमुख महाराज यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करून काढण्यात आली. यावेळी पदयात्रा मार्गावर पदयात्रेत सहभागी भाविक भक्तांसाठी किशनराव येवते व गजानन आयलवाड यांच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होते, हर हर महादेव, काळेश्वर भगवान कि जय यासह घोषणांनी परिसर दणाणून गेला या पदयात्रेत महिला सह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी श्री शिवलिंगेश्वर मंदिर, सिडको, नांदेड ते श्री काळेश्वर मंदिर, विष्णुपूरी येथे दि.१८ आगस्ट २४ रोज रविवारी सकाळी ११ वाजता भव्य पदयात्रा शिवलिगेश्वर मंदिरात महादेव पुजन व महाआरती करून या पदयात्रेस विनोद माधवराव कांचनगिरे,ड...
error: Content is protected !!