Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

Blog, करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर राज ठाकूर | अमृत महोत्सवानिमित्त ७८ वा स्वातंत्र्य दिन जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल,माहूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माहूर शहराचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व शहरामध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये मिलिट्री पथक, भव्य तिरंगा पथक, लाठी काठी पथक, लेझीम पथक, भारत माता रथ, वर्ल्ड कप विजयी रथ, वीर भगतसिंग रथ, सर्वांचे लक्ष आकर्षित करणारे स्केटिंग पथक, आणि छोटे छोटे विद्यार्थी विविध वेशभूषा मध्ये खूप गोड दिसत होते. तसेच जीनियस किडझ इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांच्या घोषणेने संपूर्ण माहूर शहर दणाणून गेले होते. हे संपूर्ण देखावे याची देही याची डोळा बघण्यासाठी माहूर, महागाव तालुक्यातील पालकांनी गर्दी केली होती. ही रॅली यशस्वी करण्यासाठी पालकांचे मोठे योगदान दिसले,तसेच जीनियस किडझ च्या सर्व स्टाफनी आणि विद्यार्...
ऑपरेशन ‘ गगनभरारी ‘ अंतर्गत विष्णुपूरी शाळेस शुध्द पेयजल यंत्रणा प्रदान -NNL

ऑपरेशन ‘ गगनभरारी ‘ अंतर्गत विष्णुपूरी शाळेस शुध्द पेयजल यंत्रणा प्रदान -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात टिकावा, त्यांना उच्च व चांगल्या दर्जाच्या सुविधा तथा शिक्षण मिळावे, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारावा, शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसहभाग, कारपोरेट कंपन्यांचे सामुदायिक सामाजिक निधी अर्थात सि.एस.आर. फंड सहभागातून गगनभरारी हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी राबविला आहे. याच उपक्रमातून प्रेरित होवून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी त्यांचे माजी विद्यार्थी प्रा. डॉ ओमप्रकाश दरक यांना मागणी केली असता त्यांनी हैद्राबाद येथील सिग्नोड कंपनीतील अभियंता निखिल सोनी यांच्यावतीने कंपनीच्या सि.एस.आर.फंडातून एक लक्ष साठ हजार रुपयांचा शुध्द पेयजल प्रकल्प नुकताच विद्यार...
public-awareness ; गितमोह सांस्कृतिक कलामंचाच्या वतीने भारतीय नवीन फौजदारी कायदे विषयी जन जागृती -NNL

public-awareness ; गितमोह सांस्कृतिक कलामंचाच्या वतीने भारतीय नवीन फौजदारी कायदे विषयी जन जागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर, माणिक भिसे| माहिती आणि प्रसारण मंत्रालय,केंद्रीय संचार ब्यूरो,नांदेड आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, तसेच जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि ७ व ८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा व विधी सेवा प्राधिकरण जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे भारतीय नवीन फौजदारी कायदे २०२४ या विषयी मल्टी मीडिया चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्धघाटन नांदेड जिल्हाधिकारी मा.अभिजित राउत ,पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्ण कोकाटे व जिल्हा न्यायधीश एस.एस.कोसमकर यांच्या हस्ते करण्यात आले . प्रास्ताविक मा.माधव जायभये यांनी केले , तर सूत्रंचालन सुमित दोडल यांनी केले. उद्घाघाटनानंतर गितमोह सांस्कृतिक कलामंच शिराढोण या कला मंचचे शाहीर नालंदा सांगवीकर,बापूराव जमदाडे यांनी महाराष्ट्र गीतने सुरुवात केली. नंतर जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक व न्यायाधीश यांनी भारतीय नवीन फौजदारी कायदे व...
Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

नांदेड, लेख
श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून विशद केले आहे. 1. इतिहास - पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. ‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली 12 वर्षे म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान ला...
Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

Significance of Narli Purnima : नारळी पौर्णिमेचे महत्त्व -NNL

नांदेड, लेख
प्रस्तावना : वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात. ही पूजा करण्यामागील शास्त्र  या लेखातून स्पष्ट केले आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नारळी पौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व ! - पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती अधिक प्रमाणात येते, तर अमावास्येला ओहोटी अधिक प्रमाणात येते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते. समुद्र शांत झाल्यानंतरच मासेमार आणि जहाजांद्वारे समुद्री प्रवास अन् व्यापार करणारे लोक त्यांची निहित कर्मे पूर्ण करू शकतात. सूर्याच्या उष्णते...
Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL

Cousin committed murder due to agricultural dispute : शेतीच्या वादातून चुलत भावाने केला खुन; आरोपी फरार -NNL

नांदेड, क्राईम
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालुक्यातील रुई येथे भावकीच्या शेती वादातून पोलीस पाटलांच्या घरी बैठक बसविण्यात आली होती बैठकीत तोडगा न निघाल्याने मोठ्या भावाने चुलत भावाला गावकऱ्यासमोर विळ्याने वार करून मयत परवेज पंटूस देशमुख वय २१ वर्ष यास ठार केल्याची घटना दि १८ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. मयताचे वडील पंटुष शेरू साहेब देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून दि.१८ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपी पुतण्या साहील बबलु देशमुख याचा शेतीसंबंधी वाद असल्याने पोलीस पाटील परसराम भोयर यांचे घरी बैठक ठेवली होती. त्यावेळी तेथे मुलगा परवेज पत्नी साजराबी. पुतण्या पप्पू मीरसाहेब देशमुख, साहिल बबलू देशमुख, सोहेब बबलु देशमुख, भावजय फिरोजा देशमुख ,जावाई शे,इंरशाद तसेच सरपंच बाईचे पती गणेश राउत, पोलीस पाटिल परसराम भोयर, तंटामुक्ती अध्यक्ष उत्तमराव सुकळकर हे हजर होते. शेतीसंबंधी वाद असल्याने च...
९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – ‘सुराज्य अभियाना’ची राज्यपालांकडे मागणी -NNL

९ वर्षे रखडलेले संस्कृत पुरस्कारांचे अनुदान द्यावे – ‘सुराज्य अभियाना’ची राज्यपालांकडे मागणी -NNL

महाराष्ट्र
मुंबई| वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराचे अनुदान दिलेले नाही. वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत ‘कवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’ने स्वखर्चाने हे पुरस्कार प्रदान केले. यासाठी खर्च केलेली १८ लाख १७ हजार ९५८ रुपये रक्कम मिळावी, यासाठी या विश्वविद्यालयाने अनेकदा पाठपुरावा करूनही राज्य सरकारने अद्याप ही रक्कम दिलेली नाही. याउलट उर्दू घरे आणि उर्दू अकादमी यांसाठी वर्ष २०१५ पासून राज्य सरकारने तब्बल ३२ कोटी २९ लाख १५ हजार रुपये अनुदान दिले आहे. मागील ९ वर्षांत उर्दूसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च; मात्र संस्कृत भाषेच्या पुरस्कारासाठीचे दरवर्षी लागणारे दीड लाख रुपयेही सरकारने दिलेले नाहीत, हा भेदभाव का ? संस्कृत भाषेची ही उपेक्षा का?, असा प्रश्न ‘सुराज्य अभियाना’ने सरकारला केला आहे. १९ ऑगस्ट या दिवशी संस्कृतदिन आहे. यंदाच्या वर्षी तरी संस्कृत दिनाला संस्कृत पुर...
Creation, Scope and Importance of Sanskrit Language : संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! -NNL

Creation, Scope and Importance of Sanskrit Language : संस्कृत भाषेची निर्मिती, व्याप्ती आणि महत्त्व ! -NNL

लेख, नांदेड
दरवर्षी श्रावण पौर्णिमेला 'संस्कृत दिन' ही साजरा केला जातो. संस्कृत ही ईश्वरानेच निर्माण केलेली भाषा आहे. जगातील सर्वच भाषांची ती जननी आहे. संस्कृतचे महत्त्व आज पाश्चात्त्यांनीही ओळखले आहे. पाश्चात्त्य संगणकशास्त्रज्ञ अशा भाषेच्या शोधात होते की, जिचा संगणकीय प्रणालीत वापर करून, तिचे जगातील कोणत्याही आठ भाषांत तत्क्षणीच रूपांतर होईल. त्यांना तशी भाषा संस्कृत’च आढळली. संस्कृत ही संगणकीय प्रणालीसाठी उपयुक्त असणारी जगातील सर्वोत्तम भाषा आहे. वेद, उपनिषदे, गीता आदी मूळ धर्मग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. ज्या देववाणी संस्कृतने मानवाला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवला, त्या देववाणीलाच कृतघ्न मानव विशेषतः स्वातंत्र्योत्तर काळातील भारतातील अनेक राजकीय नेते नष्ट करायला सरसावले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न केले पाहिजेत. संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि थो...
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग विधानसभेच्या निवडणुका घेणार – ॲड रेवण भोसले -NNL

राजकीय
धाराशिव| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निष्क्रिय कारभार व जनहित विरोधी धोरणाचा विधानसभा निवडणुकीवर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून झारखंड व दिल्ली या राज्याच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रात एकाच वेळी तिन्ही राज्याच्या निवडणुका केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार निवडणूक आयोग जाहीर करील असे स्पष्टपणे दिसत असल्याचे मत समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी व्यक्त केले आहे. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपत असली तरी निवडणूक आयोगाला सहा महिन्याच्या आत निवडणूक घ्यावी लागते तसेच झारखंड व दिल्ली या राज्याच्या कार्यकाळ पुढील वर्षी जानेवारी व फेब्रुवारी मध्ये संपत आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका या दोन राज्याचे अगोदर घेतल्या तर त्याचा प्रतिकूल परिणाम झारखंड व दिल्ली या राज्याच्या मतदानावर होईल. त्यामुळ...
blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

blood donation and health camp : एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे महारक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे दि. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार रोजी सकाळी ठिक 11 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त पहेलवान गु्रप प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, आदिवासी युवा वाहिनी संघटन, एसटी महामंडळ कामगार- कर्मचारी, विश्वासू प्रवाशी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान व आरोग्य शिबीराचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या रक्तदान शिबीरामध्ये 131 रक्तदात्यांनी रक्तदान करुन आपला सहभाग नोंदवला व प्रवाशी बांधव व कामगार बांधवांनी आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेतली. डॉ. हरदिपसिंघजी व डॉ. जयंत माळाकोळीकर यांनी या शिबीरात ...
error: Content is protected !!