Wednesday, July 8

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
पावसाळ्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले; ‘वीज कंपनीला दरवर्षीच पावसाची ऍलर्जी -NNL

पावसाळ्यात वीज गायब होण्याचे प्रकार वाढले; ‘वीज कंपनीला दरवर्षीच पावसाची ऍलर्जी -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर। सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कधीतरी पावसाची सर किंवा थोडा वाराही रात्रीच्या वेळेस आला म्हणजे वीज वितरण कंपनीकडून हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागातील वीज बंद करण्याचे प्रकार घडत आहेत.थोड्याच दिवसापूर्वीच्या वादळी वारा व विजांचा कडकडाटासह झालेल्या चक्रीवादळाने वीज वितरणचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यातून सावरत वीज व्यवस्थित होत नाही तोच आता साधा वारा किंवा पावसाचे थेंबही सुरू झाले म्हणजे वीज वितरण कंपनीकडून वीज गुल केल्या जात असल्याने ग्राहकात त्यांचेप्रति प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे.     सद्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून जूनचा शेवटचा आठवडा व जुलैचे पहिले एक दोन आठवडे उन्हाच्या झळा सोबतच कधीतरी पावसाच्या सरी कोसळत असतात.त्यामुळे अति प्रमाणात उकाळा होत असल्याने जनता घामाघूम होत पंख्याचा किंवा कुलरचा आसरा घेण्याच्या स्थितीत असतांना शक्यतो ग्रामीण भागात विजेचे अघोषित भारनिय...
MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL

MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड लोकसभा मतदार सांघाचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना सुरूवातीला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यांच्यावर हैद्राबाद किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. हैद्राबाद येथिल किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सम्पूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्यात सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या वसंत चव्हाण यांचे नाव घेतले जाते. https://twitter.com/NANA_PA...
प्रियदर्शिनी इंदिरा गांधीं प्राथमिक शाळेची विधार्थीनी प्राप्ती वाघमारे लावणी मध्ये प्रथम -NNL

प्रियदर्शिनी इंदिरा गांधीं प्राथमिक शाळेची विधार्थीनी प्राप्ती वाघमारे लावणी मध्ये प्रथम -NNL

नांदेड, मनोरंजन
नवीन नांदेड। येथील प्रियंदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती वाघमारे या विद्यार्थिनीने ज्युनियर कॅटेगिरी मध्ये लावणी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवून पूर्ण राज्यातून दुसऱ्या नंबर वर आली आहे. अखिल नटराजन अंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर ऑफ द इंटरनॅशनल डान्स कौन्सिलिंग अँड फेस्टिवल ,सीआयडी पॅरिस फ्रान्सच्या विद्यमाने आयोजित केलेल्या ऑल इंडिया 14th कल्चरल इंटरनॅशनल डान्स कॉम्पिटिशन अँड फेस्टिवल या कॉम्पिटिशन मध्ये सिडको नांदेड येथील प्रियंदर्शनी इंदिरा गांधी प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी कु. प्राप्ती वाघमारे या विद्यार्थिनीने ज्युनियर कॅटेगिरी मध्ये लावणी नृत्य सादर करून प्रथम क्रमांक मिळवून पूर्ण राज्यातून दुसऱ्या नंबर वर आली आहे. तिच्या या यशाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी तिचे गुरु आशिष व तिच्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच...
श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

श्रावण मासानिमित्त आयोजित शिराळ ऑनलाईन सजावट आणि भव्य वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड/हदगाव| श्रावण मासानिमित्त हदगाव तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या नागपंचमी सणातील शिराळ ऑनलाईन सजावट स्पर्धेला माहोलानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच भव्य वक्तृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून, या दोन्ही स्पर्धेचे बक्षीस वितरण आज हदगाव येथे करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्हा प्रभारी डॉ. रेखाताई पाटील चव्हाण गोर्लेगावकर यांच्या वतीने नागपंचमीनिमित्त शिराळ ऑनलाइन सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 21 स्पर्धकांनी भाग नोंदविला असून, त्या स्पर्धकांनी सुंदर अशा प्रकारची सजावट करून आणि विविध गाण्यांचा त्यात समावेश करून तो व्हिडिओ पाठवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. तसेच दिनांक १९ रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्या आले होते. या स्पर्धेसही ९३ स्पर्धकांनी सहभाग घेल्याने दोन वेगवेगळ्...
Shiva Mahapuran story : भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा -NNL

Shiva Mahapuran story : भोले शिवशंकर परीक्षा घेत आहेत, नांदेडकरांनो प्रतीक्षा करा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| कोणत्याही धार्मिक कार्यात अडचणी येतात म्हणजे परमेश्वर आपली परीक्षा घेत आहे, हे निश्चित मानले पाहिजे, जेव्हा ईश्वर आपली परीक्षा घेतो, तेव्हा आपण प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे, जेवढी प्रतीक्षा तेवढेच चांगले फळ ईश्वर आपल्या भक्तांना प्रदान करतो, आलेल्या संकटांना, दुःख, त्रास आणि परिश्रमांना न घाबरता भोळ्या शंकराची आराधना करीतच रहा, तुम्हाला एक ना एक दिवस शिवकृपा प्राप्त होईल, असा उपदेश परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी रविवारी शिवमहापुराण कथा वाचनात भक्तांना दिला. शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे रद्द झालेली शिवमहापुराण कथा रविवारी पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी ऑनलाईन कथावाचन केले. लाखो भाविकांनी या कथावाचनाचा लाभ घेतला. कथा वाचनाच्या प्रारंभीच पुज्य पंडितजींनी नांदेडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कथामंडपात कथा होऊ शकली नसल्याचे सांगून ही अतिवृष्टी म्हणजे भोळ्या शंकराने नांदेडमध्य...
Mp. Dr. Ajit Gopchde : बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करू -खा.डॉ.अजित गोपछडे -NNL

Mp. Dr. Ajit Gopchde : बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करू -खा.डॉ.अजित गोपछडे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| केंद्र सरकारची महत्वाकांक्षी उपक्रम असलेली भारत संचार निगम (बीएसएनएल) ही कंपनी सध्या विविध समस्यांतून जात आहे. या सर्व समस्या दूर करून बीएसएनएलच्या पुनरुज्जीवनासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, असे आश्वासन खा.डॉ.अजित गोपछडे यांनी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले. बीएसएनएलचे विभागीय अभियंता एन.जे सूर्यवंशी, उपविभागीय अभियंता पी.एन.पडघणे , अधिकारी सुनील हिवरे आदींनी खा.डॉ.अजित गोपछडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेवून त्यांना बीएसएएनएलचे सीमकार्ड सुपूर्द केले. त्याप्रसंगी झालेल्या चर्चेत खा.डॉ.अजित गोपछडे यांनी कंपनीच्या विविध समस्या जाणून घेतल्या. इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत अनेक गावांमध्ये बीएसएनएल टॉवर उपलब्ध नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना बीएसएनएलच्या कमी दरातील सेवापासून वंचित रहावे लागत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्यानंतर अशा दूर्गम भागात बीएसएनएल टॉवर लवकरात...
नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात -NNL

नांदेड जिल्हा होमगार्डच्या नोंदणी प्रक्रियेस ३० ऑगस्ट पासून सुरुवात -NNL

नांदेड, करियर
नांदेड। नांदेड जिल्हा होमगार्ड मधील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी नोंदणी प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्पास येत्या दि.३० ऑगस्ट २०२४ पासून सुरुवात होणार आहे. अशी माहिती जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. नांदेड जिल्ह्यातील पथक निहाय महिला व पुरुष होमगार्ड यांच्या रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. दि.१६ ऑगस्ट २०२४ पासून पोलीस मुख्यालय, नांदेड येथे शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी तसेच शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्यात येणार होती.परंतु प्रशासकीय कारणास्तव ही नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. ती प्रक्रिया आता दि.३० ऑगस्ट २०२४ ते दि.५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहे. शैक्षणिक व इतर कागदपत्रांची तपासणी तसेच शारीरिक क्षमता चाचणी यासाठी अर्ज क्रमांकानुसार नविन सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमा...
इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराद्वारे 25 महिलांची शस्त्रक्रिया – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख -NNL

इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटाका कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराद्वारे 25 महिलांची शस्त्रक्रिया – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख -NNL

नांदेड, आरोग्य
किनवट, परमेश्वर पेशवे। भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्रात लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात येतो. त्या अनुषंगाने राज्यातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र किनवट तालुका हा बहुतांश जंगलांनी व्यापलेला असून अशा या किनवट आदिवासीबहुल भागातील इस्लापूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शस्त्रक्रियेसाठी किंवा महिलांच्या बाळंतपणासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षापासून येथे राष्ट्रीय कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करणे बंद होते. मात्र आता या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध झाल...
Janmotsav at Shri Krishna Temple at CIDCO : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन -NNL

Janmotsav at Shri Krishna Temple at CIDCO : सिडको येथील श्रीकृष्ण मंदिरात जन्मोत्सव निमित्ताने दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा निमित्ताने श्रीकृष्ण मंदीर संभाजी चौक सिडको येथे दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून २६ ला धुप आरती व भव्य मिरवणूक सायंकाळी ४ वाजता मुख्य रस्त्त्याने व सायंकाळी श्रीकृष्ण जन्मोत्सव व महाआरती व २७ रोजी धुपारती, दही लोणी प्रसाद वितरण, दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही २१वे वर्षी, भगवान पुर्णपरब्रह्म परमेश्वर अवतार श्रीकृष्ण परमात्माच्या जन्मोत्सव व सर्वज्ञांची कृपा, गुरुवर्याची प्रसन्नता, सुत्दांचे शुभचिंतन आणि आपले सर्वांचे ओतप्रीतयामुळेच जन्मोत्सव सोहळा या एक पवित्र क्षणाचा सुयोग आला आहे. त्यानिमित्त भगवदगीता पारायण, श्रीकृष्ण नामजप, श्रीकृष्ण चालिसा स्तोत्र पारायण प्रवचन असे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. सोमवार दि. २६ आगस्ट २४ सकाळी ७ वा. धुपआरती व प्रसाद ७ ते ९ श्रीकृष्ण ना...
error: Content is protected !!