Shiv Mahapuran ; आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा लाखो भाविकांच्या उपस्थितीत – NNL
नांदेड | नांदेड येथे सुरू असून पावसामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून कृपाछत्र उपक्रमांतर्गत संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून रविवारी रात्री पेंडॉलमध्ये थांबलेल्या बाहेर गावच्या भक्तांना कथेचे संयोजक डॉ.शिवराज नांदेडकर व पिंकू पोकर्णा यांच्या हस्ते छत्र्या वाटप करण्यात आल्या.तसेच कथास्थळी दररोज भाऊचा डबा वाटप करण्यात येत आहे.
शिवभक्तांना छत्री वाटप करताना दिलीप ठाकूर, शिवप्रसाद राठी, सुरेश लोट, सुरेश शर्मा,श्रीकांत पाचपोर,चंचल नागलिया, शिवा लोट,ओम तापडिया,शिवचरण लोट, गणेशसिंह परमार,श्रीकांत सावंत,कार्तिक यादव,श्री पांपटवार हे उपस्थित होते.कृपाछत्र उपक्रमाच्या पाचव्या वर्षी सफाई कामगार, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, वृत्तपत्र विक्रेते, रस्त्यावरील बेघर यांना २०२४ छत्र्या वाटप करण्यात येणार आहेत.आता पर्यंत ३१८ छत्र्यांसाठी देणगीदार मिळाले आहेत.त्यामध्ये धर्मभूषण ॲड.दिलीप...








