Thursday, July 9

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Teej festival at Wai Tanda : दरवर्षीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील वाई तांडा येथे तीज उत्सव -NNL

Teej festival at Wai Tanda : दरवर्षीप्रमाणे हिमायतनगर तालुक्यातील वाई तांडा येथे तीज उत्सव -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिमायतनगर तालुक्यातील वाई तांडा येथे तीज उत्सवाला नाईक नागोराव जाधव कारभारी, परसराम पवार व तंटामुक्ती अध्यक्ष, लक्ष्मण जाधव माजी सभापती यांच्या शुभ हस्ते सुरुवात करण्यात आली. बंजारा समाजात तीज उत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी असते समाजातील अविवाहित मुलींच्या जीवनातील प्रत्येक वर्षात येणारा श्रावण मास काळात हा असावं साजरा केला जातो. तांडयाचा प्रमुख म्हणजे नायक व कारभारी 10 दिवस असणारा हा उत्सव नायकाच्या घरुनच सुरु होत असते. वसंतराव नाईक यांच्या विचाराने प्रभावित,सेवालाल महाराज यांच्या रक्ताच्या समाजातील प्रत्येक माणसाचे बंजारा चळवळी करीता रक्त सळसळल्या शिवाय राहत नाही. हिच खरी गोर संस्कृती असून ती जतन करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे जणू असा संदेश या उसवातून दिला जातो. बंजारा तीज उत्सव -काय आहे ? याच्या बद्दल थोडक्यात शुभम जाधव यांनी म...
रुग्ण मित्रांनी घेतला सहस्त्रकुंड येथे निसर्गसौंदर्याचा आनंद -NNL

रुग्ण मित्रांनी घेतला सहस्त्रकुंड येथे निसर्गसौंदर्याचा आनंद -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे।किनवट, नांदेड, हिंगोली, परभणी येथील रुग्णमित्रांची सहस्रकुंड येथे सहकुटुंब सहल २५ ऑगस्ट रोजी झाली. लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून रुग्णमित्र मागील दोन वर्षापासून जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा मराठवाडा व खानदेश येथे करत आहेत. यात जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना नाव नोंदणी कुठे करणे, कोणता ओपीडी नंबर कुठे, कोणती तपासणी कुठे होते, कोणते डॉक्टर कुठे भेटतात, कोणाला रक्ताची गरज आहे का, कोणाला ऑपरेशन साठी मदत करता येईल का, कोणाला भोजनाची व्यवस्था करता येईल का, अशा अनेक प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येत असते. श्रावण महिन्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी तसेच आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी चार जिल्ह्यातील रुग्णमित्र सहस्रकुंड येथे ६०च्या संख्येने सहकुटुंब एकत्र आले होते. याप्रसंगी डॉ. सुभाषजी जोशी ( बालरोग तज्ञ, बीड . देवगिरी प्रांत रुग्णमित...
Zilla Parishad Group-C Direct Service Examination-2023 ; जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

Zilla Parishad Group-C Direct Service Examination-2023 ; जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश – NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशात नमूद केलेल्या आयऑन डिजीटल झोन, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विष्णुपुरी गेट नं.18 आणि 22 नांदेड या परीक्षा केंद्रावर 28 ऑगस्ट 2024 दोन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आह...
scholarship ; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

scholarship ; अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन – NNL

करियर, नांदेड
छत्रपती संभाजीनगर| अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या सत्रातील अर्ज महाडीबीटी संकेतस्थळावर तात्काळ सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी केले आहे. आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असलेल्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातुर जिल्हयातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित महाविद्यालयांना भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजना व इतर योजनेचे शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in  प्रणाली कार्यान्वीत झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, ज...
Vyoshree and Tirtha Darshan Yojana; मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत बैठक संपन्न – NNL

Vyoshree and Tirtha Darshan Yojana; मुख्यमंत्री वयोश्री व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेबाबत बैठक संपन्न – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड | राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. सर्व धर्मातील जेष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थ क्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना”राबविण्यात येत आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी व पात्र लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील समाज कल्याण कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला समाज कल्याण विभाग लातूरचे समाज कल्याण अधिकारी गट-ब प्रादेशिक उपायुक्त, व्ही.एस. केंद्रे, जनसंपर्क अधिकारी एस.आर. देवकत्ते हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये समाज कल्याण कार्यालय अधिनस्त कार्यरत गृहपाल, मुख्याध्यापक अनुदानित वसतिगृहाचे वसतिगृह अधिक्षक , अनु.जाती आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, दिव्यांग शाळांचे...
BJP leader Madhavi Lata ; भारतीय जनता पार्टीच्या वतीने 28 रोजी दहीहंडी महोत्सव; भाजपा नेत्या माधवी लता प्रमुख आकर्षण – NNL

BJP leader Madhavi Lata ; भारतीय जनता पार्टीच्या वतीने 28 रोजी दहीहंडी महोत्सव; भाजपा नेत्या माधवी लता प्रमुख आकर्षण – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय जनता पार्टी उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दि. 28 ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण तेलंगणा येथील हिंदू शेरनी भाजपा नेत्या माधवी लता हे राहणार असून त्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. नांदेड शहरातील बी. के. हॉल समोरील श्रीनगर परिसरात दि. 28 ऑगस्ट रोजी हा दहीहंडी महोत्सव होणार आहे. या महोत्सवास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, माजी खासदार तथा लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, सुनील राणे, बंडू पावडे , आनंदा पावडे, शिवा नागरगोजे यांनी केले आहे....
Pandit Pradeepji Mishra ; प्रसन्नता हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सुख-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

Pandit Pradeepji Mishra ; प्रसन्नता हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सुख-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| आपण मृत्यूलोकात आहोत, येथे सुख आणि दुःख या दोन्ही बाजूंचा सामना करावा लागतो, सर्वांच्याच वाट्याला कधी सुख तर कधी दुःख येणारच, जीवनात कितीही मोठे दुःख आले तरी शिवभक्तीवरील दृढता, विश्वास प्रबळ असायला हवा, परमात्म्याला भक्तीचा आनंद, प्रसन्नता प्रीय आहे, चेहर्‍यावर नेहमी प्रसन्नता ठेवा,डमरुवाले बाबा तुमच्या जीवनात कधी ना कधी सुखप्राप्ती प्रदान करतील,जीवनातील सर्वात मोठे सुख म्हणजे प्रसन्नता हेच आहे, असे संबोधन शिवमहापुराण कथावाचनाच्या चौथ्या दिवशी परमपुज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी केले. चौथ्या दिवशी मोदी मैदानातील कथामंडपात झालेल्या कथावाचनाचा लाभ घेण्यासाठी अक्षरशः लाखोंच्या संख्येने भक्तीसागर उसळला होता. गेले दोन दिवस पावसाने विश्रांती दिल्याने चौथ्या दिवसाची शिवमहापुराण कथा कौठा येथील नियोजित मोदी मैदानावर झाली.कथा श्रवणासाठी आतुर झालेल्या लाखो भाविकांनी अलोट गर्दी केली होती....
gopalkala; गोपाळकाला – NNL

gopalkala; गोपाळकाला – NNL

लेख
गोपाळकाला म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जिवाचे रान करणारे तरुण डोळ्यांसमोर येतात; मात्र गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असून ते शास्त्र लक्षात घेऊन साजरा केल्याने जिवाला त्याची अनुभूती घेता येते. गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया. 1. ‘गोपाळकाला’चा अर्थ अ. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. आ. गोपाळकाला म्हणजे पांढर्‍या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा अधिकाधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समूच्चय. ‘काला’ हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य...
Prime Minister Narendra Modi : आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

Prime Minister Narendra Modi : आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी -NNL

देश विदेश
जळगाव| भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून 2047 पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसित भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येथे व्यक्त केला. स्वयंसहायता गटाला आर्थिक ताकद देतानाच गरीबांसाठी घरकूल बांधण्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. आतापर्यंत चार कोटी घरकूल वाटप करण्यात आली असून आगामी काळात 3 कोटी घरे बांधण्यात येतील, त्यात महिलांचे नाव प्रथम असेल, असेही त्यांनी सांगितले. जळगाव येथील प्राईम इंडस्ट्रीअल पार्क येथे (विमानतळ परिसर) देशपातळीवरील लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बोलत होते. राज्यपाल डॉ. सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कें...
आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड यांचा प्रवेश -NNL

आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड यांचा प्रवेश -NNL

राजकीय, हिंगोली
हिंगोली| राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आ.संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.संतोष बांगर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख सुरेश नाईक राठोड, ओंकार राठोड, सुदाम आडे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते....
error: Content is protected !!