HomeनांदेडMP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या...

MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL

नांदेड| नांदेड लोकसभा मतदार सांघाचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना सुरूवातीला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यांच्यावर हैद्राबाद किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. हैद्राबाद येथिल किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सम्पूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

457138123 814631810869659 954565003691187759 n MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL

मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्यात सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्‍या वसंत चव्हाण यांचे नाव घेतले जाते.

काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दर महिन्याच्या १० तारखेला ते डायलसिस करतात. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमले नाही. थोडे प्रकृतीकडेही दुर्लक्ष झाले असल्याने त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे तातडीने नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती ठीक झाली. मात्र कोणताही धोका न पत्करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने एअर अम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांनी हैद्राबाद येथिल किम्स हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्यामुळे नांदेडच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments