MP Vasant Chavan passed away : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण काळाच्या पडद्याआड -NNL
नांदेड| नांदेड लोकसभा मतदार सांघाचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास निधन झाले आहे. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना सुरूवातीला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यांच्यावर हैद्राबाद किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. हैद्राबाद येथिल किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सम्पूर्ण नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मागील दोन दशकांत राज्य विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहांत प्रतिनिधित्व केल्यानंतर काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली होती. १९५७ पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले, त्यात सरपंचपदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणार्या वसंत चव्हाण यांचे नाव घेतले जाते.
https://twitter.com/NANA_PA...
