Monday, July 13

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Swachhata is a service campaign : स्‍वच्छता ही सेवा मोहिमेला सुरुवात गावस्‍तरावर व्‍यापक अभियान -NNL

Swachhata is a service campaign : स्‍वच्छता ही सेवा मोहिमेला सुरुवात गावस्‍तरावर व्‍यापक अभियान -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| केंद्र व राज्‍य शासनाच्‍या वतीने स्‍वच्‍छता ही सेवा पंधरवडा दिनांक 17 सप्‍टेंबर ते 2 ऑक्‍टोब 2024 या कालावधीत राबविण्‍यात येणार आहे. या मोहिमेचा आज जिल्‍हा परिषदेच्‍या प्रांरगणात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते हस्‍ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी जिल्‍हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्‍प संचालक डॉ. संतोष तुबाकले, सामान्‍य प्रशासन विभागाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, ग्रामपंचायत विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी शिवप्रसाद चन्‍ना, महिला व बाल विकास विभागाच्‍या उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार, कृषी अधिकारी विजय बेतीवार, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड ...
Participation of students of Physics Complex  ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची खगोलशास्त्राच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग -NNL

Participation of students of Physics Complex ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची खगोलशास्त्राच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग -NNL

नांदेड, करियर
नांदेड| कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभाग व पुणे येथील आयुका (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कंटेम्पररी इश्यूज इन अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिकल-२०२४’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलामधून ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये विशाल काळे, शंकर नरवाडे, नारायण कापुरे, अविनाश काळे, अक्षय कटारे, शेजल नादरे, निलीशा जकाते, मुस्कान शेख व नहानु शेख यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेसाठी देशातील विविध भागातील संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना विशेष तज्ञ संशोधक प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यशाळेत सहभाग घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केल्या...
Meenal Kanarwal : शेतकऱ्यांसाठी अनुदानावर गोबरगॅस योजना – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनरवाल -NNL

Meenal Kanarwal : शेतकऱ्यांसाठी अनुदानावर गोबरगॅस योजना – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनरवाल -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| ज्‍या शेतक-यांकडे चार ते पाच पेक्षा जास्‍त पशुधन असणा-या पशुपालकांना अनुदानावर गोबरगॅस योजनेचा लाभ देण्‍यात येणार आहे, अशी माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मिनल करनवाल यांनी दिली आहे. एन.डी.डी.बी मृदा मार्फत ही योजना जिल्‍हयात राबविण्‍यात येणार असून केंद्र शासनाच्‍या वतीने एस.सी., एस.टी. व सामान्‍य वर्ग ओबीसाठी संवर्गातील शेतक-यांना अनुदान देण्‍यात येणार आहे. 2, 4, 6 व 8 क्‍यूबिक मीटर गॅस क्षमतेचे असणारे प्‍लांट शेतक-यांसाठी देण्‍यात येणार आहेत. यासाठी शेतक-यांकडे गुरे असणे आवश्‍यक आहे.      योजनेचा लाभ घेण्‍यासाठी शेतक-यांनी आपल्‍या जवळच्‍या पशुवैद्यकीय दवाखान्‍यात अर्ज सादर करावेत. अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड व बॅक पासबुकची सत्‍यप्रत जोडावी. गोबरगॅस संयंत्रामुळे शेतकऱ्यांना इंधन खर्चात बचत होईल, जैविक खताचा वापर वाढेल तसेच महिला...
Collector abhijit raut : शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी -NNL

Collector abhijit raut : शेतकऱ्यांनी अर्थसहाय्य मिळवण्यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा- जिल्हाधिकारी -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| ई-पिक पाहणी तसेच सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेत प्रती शेतकरी 2 हेक्टरच्या मर्यादेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये ईपीक पाहणी पोर्टलवर नोंद नसणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. ज्यांना पैसे मिळाले नाही त्यांनी अपूर्ण माहिती पूर्ण करावी ई-पिक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदार यांच्या याद्या कृषि विभागाने गावनिहाय ठळक ठिकाणी प्रदर्शित केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कापूस /सोयाबिन पिकाची नोंद आहे मात्र ई-पिक पाहणी मध्ये त्यांचे नाव आले नाही अशा तक्रारी काही ठिकाणाहून प्राप्त झाल्या आहेत. कापूस व सोयाबिन पीक उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत यासाठी...
Cotton and soybean farmers : सन 2023 च्या खरीपातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

Cotton and soybean farmers : सन 2023 च्या खरीपातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार अर्थसहाय्य -NNL

कृषी, नांदेड
नांदेड| राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्यासाठी पात्र आहेत. पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.20 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थ सहाय्य देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे. तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्यावतीने देण्यात आलेले संमतीपत्र भरून देणे अपेक्षित आहे. या संमतीपत्रामध्ये आधारवरील असलेले नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक मराठी व इंग्रजीमध्य...
Participation of 50 children : “वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग -NNL

Participation of 50 children : “वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात आज 18 सप्टेंबरला झाली. नवी दिल्ली येथून झालेल्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील 50 बालकांनी सहभाग घेतला त्यापैकी दहा बालकांना कायम निवृत्ती वेतन कार्ड देण्यात आले. नांदेड जिल्ह्याचा 50 बालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन ऐकायला मिळाले.हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात ऑनलाईन घेण्यास आला. नांदेड जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक कालिदासू पक्काला, सहमहाव्यवस्थापक यु. सुरेश बाबू, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राम शृंगारे...
Survey of Nanded-Latur railway line : नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर – खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश -NNL

Survey of Nanded-Latur railway line : नांदेड-लातूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण प्रगतीपथावर – खा. अशोकराव चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गाचा फायनल लोकेशन सर्व्हे मंजूर करण्यात आला असून, सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना दिली आहे. रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात ही बाब नमूद आहे. खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुमारे १०४ किलोमीटर लांबीच्या नांदेड-लातूर रोड नवीन रेल्वे मार्गासाठी पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त उपक्रम 'महारेल'च्या माध्यमातून प्राथमिक अहवाल तयार करून घेतला होता. त्यानंतर राज्य सरकारकडे पाठपुरावा करून हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचारार्थ पाठविण्यात आला होता. या प्रस्तावानुसार सध्या फायनल लोकेशन सर्व्हे सुरु असून, त्याचा अहवाल तयार झाल्यानंतर या प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग यांनी आपल्या पत्रात म...
Ashokrao Chavan : नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार; खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश -NNL

Ashokrao Chavan : नांदेड जिल्ह्यात बीएसएनएल ९ टॉवर उभारणार; खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| जिल्ह्याच्या भोकर व मुदखेड तालुक्यातील नऊ गावांमधील दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने टॉवर उभारण्यास मंजुरी दिली असून, यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार भारत संचार निगम लिमिटेड म्हणजे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना या टॉवरच्या उभारणीसाठी जमीन भाडे तत्त्वावर घेण्यास किंवा संपादन करण्यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. या गावांमध्ये भोकर तालुक्यातील पाकी, पाकी तांडा, जामदरी, इळेगाव, सावरगाव माळ, भुरभुशी, देवठाणा तर मुदखेड तालुक्यातील दरेगाव आणि पिंपळकौठा मगरे या गावांचा समावेश आहे. संबंधित गावकऱ्यांनी आपल्या गावात दर्जेदार दूरसंचार सेवा मिळत नसल्याची तक्रार खा. अशोकराव चव्हाण यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी या संदर्भात दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह बीएसएनएलच्या नवी द...
Successful bariatric surgery : ५४ वर्षीय महीलेच्या अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया व उपचार – NNL

Successful bariatric surgery : ५४ वर्षीय महीलेच्या अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया व उपचार – NNL

आरोग्य, नांदेड
नांदेड| यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे नांदेड येथील सौ.कल्पना कुंटूरकर नावाच्या ५४ वर्षीय महिला रुग्णावर यशस्वीपणे बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करत रुग्ण महीलेस अतिलठ्ठपणामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता केली आहे यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. प्रसाद बाबू आणि डॉ. अमर चंद जे वरिष्ठ सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व बॅरियाट्रिक सर्जन यांच्या मार्गदर्शनात अतिलठ्ठपणावर यशस्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया करून रुग्णाचे वजन १२० किलावरून ७५ किलो ईतके कमी करत त्यांना होणाऱ्या दैनंदिन त्रासातून मुक्त केले आहे याविषयी सविस्तर माहीती अशी की नांदेड येथील जनरल सर्जन राजेश कोमावाड यांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांना पुढील उपचारांसाठी यशोदा हॉस्पिटल, सिकंदराबाद येथील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. प्र...
Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

महाराष्ट्र, कृषी
मुंबई| जागतिक तापमानातील वाढ, वातावरणातील बदल आणि कार्बन उत्सर्जनाच्या वाढत्या प्रमाणामुळे मानवजाती आणि पृथ्वी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. या मानवजाती आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी बांबू शेती करणे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. १८ सप्टेंबर हा दिवस जगभरात बांबू दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पद्मश्री भारत भूषण त्यागी, पद्मश्री कमल सिंग, पद्मश्री गेनाजी चौधरी, पद्मश्री सुलतान सिंग, पद्मश्री चंद्रशेखर, पद्मश्री जगदिश प्रसाद पारेख, मनरेगाचे महासंचालक नंदकुमार, प्रधान सचिव प्रवीण दराडे, दूरदर्शन निवेदिका म...
error: Content is protected !!