Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Central List of Other Backward Classes : इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती,समुदायांचा समावेश करण्यासाठी -NNL

Central List of Other Backward Classes : इतर मागासवर्गाच्या केंद्रीय यादीत महाराष्ट्रातील काही जाती,समुदायांचा समावेश करण्यासाठी -NNL

महाराष्ट्र, देश विदेश
नवी दिल्ली| राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) आज केंद्र सरकारकडे (i) लोध, लोधा, लोधी (Lodh, Lodha, Lodhi) या ओबीसी जाती / समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे. तसेच (ii) बडगुजर (Badgujar), (iii) सूर्यवंशी गुजर (Suryavanshi Gujar), (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (Leve Gujar, Reve Gujar, Reva Gujar); (v) डांगरी (Dangari); (vi) भोयर, पवार (Bhoyar, Pawar); (vii) कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, बुकेकरी (Kapewar, Munnar Kapewar, Munnar Kapu, Telanga, Telangi, Pentarreddy, Bukekari) जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे. याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 17 ऑक...
Dhananjay Munde : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

Dhananjay Munde : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| राज्यातील अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटकांचा समावेश झाला असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. राज्यातील अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत विविध बाबी राबविण्यात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत लाभार्थी निवड निकष यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या ...
Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड,गोविंद मुंडकर| ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्‍हणून दिनांक 11 ऑक्‍टोबर ते 15 नोव्‍हेंबर पर्यंत परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे अभियान राबविण्यांत येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले आहे. गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयांत स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत एक सर्व...
M.P. Bhavare Memorial Award : गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती पुरस्कार जाहीर; 14 ऑक्टोंबर 2024 सोमवारी पोटा येथे होणार पुरस्कार सोहळा – NNL

M.P. Bhavare Memorial Award : गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती पुरस्कार जाहीर; 14 ऑक्टोंबर 2024 सोमवारी पोटा येथे होणार पुरस्कार सोहळा – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| गुरुवर्य स्मृतीशेष एम.पी. भवरे कामारीकर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, बहुजन टायगर युवा फोर्स (सांस्कृतिक विभाग) महाराष्ट्र राज्य व पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ पोटा बु. च्या वतीने गुरुवर्य एम.पी. भवरे स्मृती पुरस्कार वितरण व पारंपारिक कलावंत शाहीर मेळावा दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोज सोमवारी पोटा बु. ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून, समाजातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, सांस्कृतिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना दरवर्षी गुरुवर्य एम.पी. भवरे कामारीकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये खालील व्यक्तींना गौरविण्यात येणार आहे. अभि. अशोक भोजराज (जिल्हा जलसंधारण अधिकारी, जि.प. नांदेड), गजानन सुर्यवंशी (मु.अ. कै. श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम बु.), सौ. वंदना समाधान सुर्वे, तातेराव बाळू वाघमारे, धम्मा धोत्रे (ग्राम विकास अ...
विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

विद्यार्थीच महासत्ताक भारत घडवू शकतात- आ.ग. ढवळे -NNL

करियर, नांदेड
अर्धापूर| भारत देशाच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त विषमता, जातीयता, भ्रष्टाचार नष्ट करुन विज्ञानाची कास धरुन तंत्रज्ञानाने देश बलवान घडविण्याचे काम विद्यार्थीच करु शकतात असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गीतकार, नाटककार आ.ग. ढवळे यांनी केले. ते नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोणी बु. येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये स्वलिखीत शाहिरी गीत गायनातून व एकपात्री नाट्यप्रयोग सादर करुन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. मुख्याध्यापक एस.आर. डमरे यांनी आ.ग. ढवळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन सत्कार केला. गुरु गौरव आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त नालंदा पाटील- भगत यांनी सुत्रसंचालन केले. अर्धापूरकर मॅडम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिंदे, डहाळे आदींनी परिश्रम घेतले....
Nalanda Patil honored : श्रीमती नालंदा पाटील जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानीत -NNL

Nalanda Patil honored : श्रीमती नालंदा पाटील जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानीत -NNL

नांदेड, करियर
अर्धापूर| शिक्षण विभाग जि.प. नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बु. येथील माध्यमिक शिक्षीका श्रीमती नालंदा सोपानराव पाटील (भगत) यांना दि. 4 ऑक्टोंबर 2024 रोजी कुसूम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन 2023 ने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांच्या हस्ते सहपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व ग्रंथ असे होते. श्रीमती पाटील यांनी विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक , राष्ट्रीय कार्यातील असाधारण योगदानाप्रित्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्मिती, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण...
Dr. Hansraj Vaidya : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे – डॉ. हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे – डॉ. हंसराज वैद्य -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सातत्याने चालणारा कायापालट सारखा उपक्रम भारतात कुठेही होत नसल्यामुळे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे असे प्रतिपादन नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य यांनी केले.पन्नासाव्या महिन्याच्या उपक्रमात ५२ भ्रमिष्टांना डॉ. वैद्य यांच्या हस्ते कपडे व शंभर रुपयाची बक्षीसी देऊन कायापालट करण्यात आला. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गोवर्धन घाट येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी सदिच्छा भेट दिली. या उपक्रमाची डॉ. वैद्य यांनी विस्तृतपणे माहिती घेतली.कडाक्याची थंडी असो अथवा मुसळधार पाऊस दिलीप ठाकूर यांचा कायापालट हा उपक्रम कधी रद्द झाला नाही.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट उपक्रम राबविण्यात येतो.यासाठी खा.अशो...
Dcm Devendra Fadanvis : महाराष्ट्रात होणार आशियातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाची निर्मिती -NNL

Dcm Devendra Fadanvis : महाराष्ट्रात होणार आशियातील सर्वात मोठ्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाची निर्मिती -NNL

महाराष्ट्र
मुंबई| आशियातील सर्वात मोठ्या पर्नोड रिकार्ड इंडियाच्या माल्ट डिस्टिलरी प्रकल्पाचे भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी बुटीबोरी, नागपूर येथे झाले. यावेळी पर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जॉ टूबूल यावेळी उपस्थित होते. कंपनीने २३ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारसोबत केलेल्या सामंजस्य कराराची पूर्तता करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा ऐतिहासिक सामंजस्य करार १० वर्षांच्या कालावधीत अंदाजे १७८५ कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीद्वारे समर्थित, पर्नोड रिकार्डची भारताप्रती असलेली वचनबद्धता अधोरेखित करतो. पर्नोड रिकार्ड इंडिया ही स्पिरिट्स आणि वाईन उद्योगातील जागतिक स्तरावरील अग्रेसर कंपनी आहे. या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यापासून, पर्नोड रिकार्ड इंडियाने या प्रकल्पाला पुढे नेण्यासाठी जमिनीच्या खर्चासह सुमारे १००कोटी रुपये गुंतवणूक करण्...
Palkhi Padayatra ceremony : विष्णुपुरी ते माता रत्नेश्वरी जानापुरी पालखी पदयात्रा सोहळ्यास ऊत्स्फुर्त प्रतिसाद -NNL

Palkhi Padayatra ceremony : विष्णुपुरी ते माता रत्नेश्वरी जानापुरी पालखी पदयात्रा सोहळ्यास ऊत्स्फुर्त प्रतिसाद -NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| नवरात्र महोत्सव निमित्त काळेश्वर मंदीर विश्वस्त समिती व आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्री माता रत्नेश्वरीदेवी जानापुरीस साडी-चोळी अर्पण ,विष्णुपूरी ते माता रत्नेश्वरी देवी मंदीर पदयात्रा पालखी सोहळयास विष्णुपूरी गावातील समस्त गावकरी, महिला यांनी सहभाग नोंदविला. दक्षिण विधानसभा मतदारसंघ आमदार मोहनराव हंबर्डे यांनी गोदावरी नदीतील पाण्याने भरलेल्या कलश व महादेव पिंड मुर्ती पुजन केल्यानंतर या भव्य पालखी पदयात्रा सोहळ्याला सुरूवात झाली. दरवर्षी प्रमाणे याही चौथ्या वर्षी 9 ऑक्टोबर 24 रोजी सकाळी 8 वाजता आमदार मोहनराव हंबर्डे, काळेश्वर मंदीर विश्वस्थ व सर्व विष्णुपूरी गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत कलश पुजन व महाआरती झाल्यानंतर सुरूवात झाली, प्रारंभी विधीवत रथ यात्रा माता रत्नेश्वरी जानापुरी साडी चोळी पुजन करण्यात आले. यावेळी काळेश्वर भगवान कि जय, जय माता दी...
Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL

Khadkekar honored with District Teacher Award : जिल्हा शिक्षक पुरस्काराने खडकेकर सन्मानित -NNL

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात माहूर तालूक्यातील जि. प.उ.,प्रा,शाळा, ईवळेश्वर येथील पदविधर शिक्षक संजय बापूराव खडकेकर यांना दि.४ ऑक्टोबर रोजी कुसुम सभागृह नांदेड येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार सन-२०२२ चा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार मा. अशोकरावजी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल (भा. प्र.से.) यांच्या हस्ते खडकेकर यांना सपत्नीक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, प्रमाण पत्र व ग्रंथ असे होते. यांच्या संपूर्ण विद्यार्थी विकासासाठी शैक्षणिक ,सामाजिक, सांस्कृतिक राष्ट्रीय कार्यातील असधारण योगदानाप्रीत्यर्थ तसेच शिक्षण विभागातील समावेशित शिक्षणातील, निवडणूक विभागातील राष्ट्रीय कार्यातील, शैक्षणिक साहित्य निर्माती, शैक्षणिक व्हीडीओ निर्माती, विदयार्थ्या...
error: Content is protected !!