Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Senior newspaper vendor : सिडको येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा -NNL

Senior newspaper vendor : सिडको येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा -NNL

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळ सलग्न महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या ‌२५ व्या वर्धापन दिनानिमित्त सिडको परिसरातील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सन्मान सोहळा उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला. १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे २५ व्या वर्धापन दिनानिमित्त व भारतीय वृत्तपत्र विक्रेता दिन‌ निमित्ताने सिडको वृत्तपत्र विक्रेता टिन‌शेड येथे जेष्ठ वृत्तपत्र विक्रेता यांच्या सत्कार सोहळा व वृत्तपत्र विक्रेता बांधव यांच्या सन्मान सोहळा सकाळी ७ वाजता सिडको वृत्तपत्र विक्रेता टिनशेड येथे माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे, सामाजिक कार्यकर्ते फारुक अहेमद, प्रदीप नागापूरकर, राज्य सचिव बालाजी पवार,विकास सुर्यवंशी सांगली, रविंद्र कुलकर्णी मालेगाव धूळे,विठ्ठल गायकवाड. नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर,चंद्रकांत ...
Sadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL

Sadanand alias Langde Maharaj : प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांच्या मठावर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री गुरुपुजन महाप्रसाद -NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही येथील प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांचे मठावर कोजागिरी पोर्णिमा निमित्त बुधवार १६ ऑक्टोबर रोजी गुरु पुजन व महाप्रसादाचा उत्सव साजरा होत आहे. यंदा या उत्सवाला सुमारे ४५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त विविध धार्मिक व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या धार्मिक कार्यक्रमाला व महाप्रसादाला पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहान मठाधीश प.पु सदानंद ऊर्फ लंगडे महाराज यांनी केले आहे. कोजागिरी पोर्णीमेनिमित्त होत असलेल्या प्रथम सञात सकाळी ९ वा गुरु पुजा,दुपारी १२ वा.पाद्य पुजा व आरती तर १ ते ३ वाजेपर्यत साधु संताचे पुजन, संध्याकाळी ४ वाजल्यापासून नैवद्य अर्पण करुण महाप्रसादला सुरुवात केली जाते, तर रात्री ९ वा.भजन गायणाला सुरुवात करुण ७० लीटर दुधाची बांसुदी करुण भाविकांना दिली जाते.मागील ४५ वर्षापासून अविरत पणे सुरु असलेल...
Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान होणार -NNL

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान होणार -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे भूषविणार असून, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील विनोदी अभिनेत्री मा. प्राजक्ता हनमघर उपस्थित राहणार आहेत. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे असणार आहेत. या महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभ दि. २१ ऑक...
Celebrating World Hand Washing Day : जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा; हात धुवा प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचे धडे -NNL

Celebrating World Hand Washing Day : जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा; हात धुवा प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचे धडे -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. जनतेच्या स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवून निरोगी आणि आनंदी जीवनासाठी जागतिक स्तरावर दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हात धुवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने, जिल्ह्यात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला. अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आज जागतिक हात धुवा दिनानिमित्त झालेल्‍या कार्यक्रमात पाणी व स्‍वच्‍छता मिशनचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना ते म्‍हणाले, प्रत्‍येकांनी स्‍वच्‍छतेच्‍या सवयी अ्रंगीकाराव्‍यात असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले. यावेळी सरपंच मारोतराव बुटले...
Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

Hand Wash Day : हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केली जनजागृती -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| लोहा तालुक्यातील मारतळा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती कार्यक्रम राबवला. 15 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात जाऊन हात धुण्याच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली. वेदिका शंकर गिरी, चैतन्या आनंदा ढेपे, सोनाक्षी कामाजी भोंग, नंदिनी सुभाष ढगे, स्वरा राजू पुणेबोईनवाड, सोहम परशुराम सोरटे, आदित्य उबाळे, सोहम शिंदे आदी विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. गावकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी भास्कर पाटील ढगे, ग्रामसेवक पुंड, मुख्याध्यापक रवी ढगे व इतर गावकरी उपस्थित होते....
Kamalkishore Kadam : पद्मश्रींचे कार्य प्रेरणादायी -कमलकिशोर कदम -NNL

Kamalkishore Kadam : पद्मश्रींचे कार्य प्रेरणादायी -कमलकिशोर कदम -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक सहकारी संस्थांची मुहूर्तमेढ पद्मश्री शामराव कदम यांनी रोवली. त्यांचे कार्य आता नवीन पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर आपण सर्वांनी चालले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांनी केले. पद्मश्री शामराव कदम यांच्या 25 व्या पुण्यस्मरणानिमित्त लिंबगाव ता. नांदेड येथील समाधीस्थळी अभिवादन दि. 15 ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाप्रसंगी कदम बोलत हेाते. यावेळी सर्वप्रथम लिंबगाव येथील पद्मश्री शामराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला आणि शेतातील समाधीस्थळी माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, आ. बालाजी कल्याणकर, डॉ. हंसराज वैद्य, सुभाषराव कदम, डॉ. सुनील कदम यांच्यासह कदम कुटूंबिय, गावकरी यांनी अभिवादन केले. समाधीस्थळी आयोजित कार्यक्रमात बोलताना कमलकिशोर कदम पुढे बोलताना म्हणाले की, चांगले राजकारण करत असताना प्रभावीपणे शेती पद्मश्रींनी केली. प...
Election Officer Avinash Kamble : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक अधिकारी अविनाश कांबळे यांची तातडीची आढावा बैठक -NNL

Election Officer Avinash Kamble : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुक अधिकारी अविनाश कांबळे यांची तातडीची आढावा बैठक -NNL

नांदेड, सोशल वर्क
हदगांव, शेख चांदपाशा| मा. भारत निवडणूक आयोग यांनी आज दि. १५/१०/रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. त्याअनुषंगाने अविनाश कांबळे, निवडणूक निर्णय अधिकारी, ८४ हदगाव विधानसभा मतदार संघ, तथा उपविभागीय अधिकारी, हदगाव यांनी आज दिनांक १५/१०/२०२४ रोजी निवडणूक निर्णय अधिकारी, यांनी तहसिल कार्यालय हदगाव येथे विधानसभेची आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अनुषंगाने सर्व कार्यालय प्रमुख व पत्रकार यांची आढावा बैठक घेऊन निवडणूक आयोगाचे आदर्श आचार संहिते बाबत दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने काय करावे किंवा काय करु नये याबाबतचे तंतोतंत पालन करण्याबाबत सुचना दिल्या. सदर बैठकीस श्रीमती पल्लवी टेमकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हिमायतनगर व इतर प्रशास...
Tribute to former professor : माजी प्राध्यापक कॉ.जी.एन.साईबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदरांजली -NNL

Tribute to former professor : माजी प्राध्यापक कॉ.जी.एन.साईबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदरांजली -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आणि ९० टक्के दिव्यांग असलेले तसेच गुन्हा केला नसतानाही दहा वर्षे नागपूर स्थीत केंद्रीय कारागृहात अंडा सेल मध्ये जेल भोगलेले मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड जी.एन.साईबाबा यांना दि.१५ ऑक्टोबर रोजी इंडिया व डाव्या आघाडीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. साईबाबा यांचे १२ ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले असून ते दिल्ली येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अद्यापनाचे कार्य करीत होते. त्यांच्यावर माओवादी म्हणून गडचिरोली येथील न्यायालयाने साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु मुंबई उच्च न्यायाल्याने ती शिक्षा रद्द करून साईबाबा शिक्षेतून यांना निर्दोष मुक्त केले होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे डाव्या चळवळी मध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या पीआरओ आणि पूरग्रस्तांच्या आंदोलन स्थळी त्यांना आदरांजली...
Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

देश विदेश, राजकीय
नवी दिल्ली|  महाराष्ट्रासाठी  विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024  रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी  होणार आहे.  राजधानीतील विज्ञान भवन येथे आज पत्रकार परिषद घेवून महाराष्ट्र आणि  झारखंड  राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच देशातील विधानसभा, लोकसभा  पोटनिवडणुकीचा  कार्यक्रम जाहीर करण्यात आला.  भारत निवडणूक  आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त  राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार आणि डॉ सुखबीर सिंग संधू यासोबत वरिष्ठ अधिकारी महेश गर्ग, अजित कुमार , संजय कुमार, अनुज चांडक उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात आजपासून आदर्श आचार संहिता लागू  झाली आहे.    असा आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम महाराष्ट्रातील विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतद...
Hemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL

Hemant Patil took the oath of Legislative Council MLA : हेमंत पाटील यांनी घेतली विधानपरिषद आमदारकीची शपथ ; कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या पाच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीची नियुक्ती रखडली होती. अखेर विधानसभा निवडणुकीपुर्वी या नियुक्तीला मंगळवारी मुहूर्त मिळाला असून, १२ पैकी ७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांनाही आमदारकी बहाल करण्यात आली असून, यातून त्यांचा राजकीय पुनर्वसन झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोफावून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार करण्यात आली होती. या आमदारांच्या नावांची यादी सोमवारी राज्यपालाकंडे पाठवण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा राज्यपालांनी या नावांना मंजुरी दिली. राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये भाजपकडून चित्रा वाघ, विक्रम पाटील, धर्मगुरु महाराज राठोड या तिघांना संधी देण्यात आली आहे. तर शिवसेनेकडून माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे आणि र...
error: Content is protected !!