औरंगाबाद/नांदेड/हिमायतानगर। कुर्बानीसाठी गोवंश घेऊन जाणाऱ्या गाडीला अडवुन गाडी चालकाला मारहाण करून तसेच पोलिसांना कळवुन गुन्हा दाखल करणाऱ्या गोरक्षकावरील गुन्हा रद्द करण्याचे खंडपीठाने आदेश दिले.


याचिका करते किरण सुभाष बिच्चेवार, नांदेड विभाग गौरक्षा प्रमुख हे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांना गोवंश घेऊन जाणारी अप्पे ऑटो रिक्षा दिसल्यानंतर त्यांनी सदर गाडीला अडवुन गोवंश कशासाठी घेऊन चालले आहेत. अशी विचारपुस करून रिक्षा चालकाला शिवीगाळ करीत मारहाण करून पोलिसांना बोलुन गुन्हा दाखल केला होता. म्हणुन गाडी चालकाने याचिका कर्त्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला होता.


सदर गुन्हा रद्द करण्यासाठी याचिकाकर्त्यांनी ॲड. श्रीमंत मुंडे व ॲड. अमोल चाटे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर याचीका मंजुर करून, न्यायालयाने गौरक्षका वरील गुन्हा रद्द केला असल्याचे आदेश पारित केला आहे.



राष्ट्रीय महामार्गावर गाडी आडुन विचारपूस करणे व पोलिसांना बोलुन गुन्हा दाखल करणे हे कृत्य बेकायदेशीर नाही. त्याच बरोबर संविधानाच्या मूलभूत कर्तव्याचा भाग म्हणून कलम 48 नुसार दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता दिसून येत असेल तर भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणुन तो टाळण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्यात २०१५ पासून गोवंश रक्षण कायदा लावण्यात येऊन देखील रोज रकजरोस पणे गोवंशाची कत्तल व कुर्बाणीसाठी वाहतूक हे काही अधिकारी, कर्मचारी यांच्या आशिर्वादामुळे सुरूच आहे.

यामुळे याचिका कर्त्यावरील गुन्हा चुकीचा आहे. असे जाहीर करून मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने गौरक्षका वरील गुन्हा रद्द केलाचा आदेश दिला आहे. अशाच प्रकारचे संपुर्ण महाराष्ट्रभर गोरक्षकावर पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. यापुढे या निर्णयामुळे पोलिसांना गोरक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करून ॲड.श्रीमंत मुंडे व ॲड.अमोल चाटे यांचे गोरक्ष व गोप्रेमी मधून समाधान व्यक्त करून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत किरण बिच्चेवार म्हणाले, “आम्ही आजपर्यंत संविधानाने दिलेल्या मुलभुत कर्तव्याचा भाग म्हणून कायद्याच्या चौकटीत राहुन गोरक्षणाचे काम करत आलेलो आहोत. पण हप्तेखोर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आम्ही अडचण ठरत असल्याकारणाने पोलिसांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून गोरक्षकांवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत. आमचा न्यायपालिकेवर पुर्ण विश्वास होता आणि आज आम्हाला न्याय मिळाला याचा मनस्वी आनंद वाटतो” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


