उमरी/नांदेड। विधानसभा निवडणुका थोड्याच दिवसात लागतील आपण केलेले कामे व पक्षाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळाला ते माहिती कार्यक्रत्यांनी सक्षम पणे घराघरा माहिती द्यावे. येणार्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने नक्कीच आपले काम पाहून विचार करेल त्यासाठी सामदामदंड वापरून आपणच निवडणूक लढविणार असून कार्यक्रत्यानी कामाला लागावे असे व्ही.पी.के.उद्योग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भाजपाचे नेते मारोतराव कवळे गुरूजी यांनी उपस्थित कार्यक्रत्यांना आहावान केले.

यावेळी गणपतराव पाटील हस्सेकर,बापुराव पाटील करकाळेकर,प्रभाकरराव पुयेड, गणेशराव पाटील सरसे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरराव देशमुख धानोरकर, आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील ढगे, धर्माबाद बाजार समितीचे संचालक राजीव पाटील बोळसेकर, आनंदराव पाटील जामगावकर,दत्ताहरी पाटील कावलगुडेकर, पाडुरंग गळगे,चंद्रकांत पाटील हंबर्डे, संदिप पाटील कवळे,गोविंद पाटील जिगळेकर,मारोतराव पवार हातनीकर, नितीन पाटील पुयेड,अशोक पाटील कदम,मारोतराव उमाटे,व्यंकटराव पाटील जामगावकर,योगेश पाटील सावंत, विलास पाटील नरवाडे,बालाजीराव नासलवाड, मधुकर पाटील शिंदे,गोविंद ढगे,कैलास कवळे,वसंत जाधव, देविदासराव थेटे,बालाजी पाटील हुंडेकर,रावण पाटील, व्यंकटी पाटील, माधवराव पाटील ढगे,नानाराव पाटील, श्रीनिवास ढगे,माधवराव शेलगावकर, वामन पाटील एकनाथ पाटील, यासह हजारो कार्यक्रत्य उपस्थित होते.

यावेळी सुधाकरराव देशमुख धानोरकर, अमोल पाटील ढगे,राजीव पाटील बोळसेकर, दताहरी पाटील, आनंदराव पाटील,पाडुरंग गळगे,गोविंद पाटील जिगळेकर, व्यंकटराव पाटील सावंत, मारोती पाटील पवार,व्यंकटी पाटील, रावण पाटील, यासह अनेकांनी आपले विचार मांडताना कवळे गुरूजी तुमच्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळुन देण्यासाठी वाटेल ते करू,भागात उद्योग उभारल्यामुळे शेतकरी,शेतमजूर बेरोजगार तरुणाचे भले झाले,व्यापार पेठ भरभराटीला आले,सतत सर्वसामान्य लोकांपर्यंत तुम्ही पोहचता, अनेकांच्या सुखदुखात सहभाग तुमचा असतो.पक्ष काम करणाऱ्यांनाच उमेदवारी देतो तुम्ही जनतेच्या व सर्वसामान्य हिताचे काम केलात.रस्ते,नाल्या,इमारती उभे करणे हे साधे गावच्या सरपंचाचे काम आहे.


तो विकास नसून त्या त्या गावाच्या गरजा आहेत याला विकास म्हणता येणार नाही. कवळे गुरूजी तुम्ही एका मंञ्या पेक्षा ही जास्त मतदार संघात काम केलात हे आम्हीच नाही तर नांदेड जिल्हाला आपला हेवा वाटावे अशी ओळख निर्माण तुम्ही स्वतांची जिल्हासह मराठवाड्यात केलात. जो पक्षातील व्यक्ती सतत सामान्यांचे काम करतो,सतत जनतेत असतो त्यालाच उमेदवारी पक्ष देतो कवळे गुरूजी तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाच्या समोर पास झाला आहात.तुमचे काम पाहुन विरोधकांना सुधा हेवा वाटतो हे नाकारता येत नाही.

एकीकडे सामान्यांच्या फोन उचलत नाही,सामन्याचे काम करीत नाही,उदंट वागतो, पक्षाकडून इतरांना ञास होईल असे वागतो अशांना पक्ष नापास करतो. म्हणून येणारा काळ कवळे गुरूजी तुमचा आहे.कार्यक्रत्य व जनता सांभाळायचे तुम्हाला हातोटी आहे तुम्ही अभ्यासू गुरूजी म्हणजे एक हेडमास्तर आहात. तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही तरुण मंडळी, जेष्ठ , कनिष्ठ आधी कार्यक्रत्य पराकाष्ठा करून निवडून आणू असे अनेकांनी मनोगतातुन विचार मांडले.सुञसंचलन संतोष सरसे,तर आभार आनंदराव पाटील यांनी मानले.

