श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आनंद द्विगुणित करायचा असेल तर इतरांना त्या आनंदात सहभागी करून घ्या, आनंद दिल्याने-वाटल्याने वाढतो असे मत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी व्यक्त केले.


माहुरगड येथील सद्गुरू राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज यांच्या मठा मध्ये दिनांक ९ जुलै रोजी चहा ची हाॅटेल चालवुन उपजिविका व सामाजिक कार्यात सदैव तत्पर व सेवावृत्तीचे विजय कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते पत्रकारां च्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


या प्रसंगी मठाचे प्रवक्ते भाऊ पाटील हडसणीकर, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुधिर जाधव, प्रविण वाघमारे ,रेहमत भाई , जेष्ठ पत्रकार हाजी कादर दोसानी , नंदकुमार संतान, वसंतराव कपाटे, विजय आमले रणजीत वर्मा ,सौ.सुरेखा तळनकर ,नंगर पंचायत चे कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिलखुलास व्यक्तिमत्त्व असलेले विजय कांबळे व राजकीय, सामाजिक, संस्कृतीक क्षेत्रातील सन्मान आयोजित करणा-या मठाबद्दल समयोचीत मार्गदर्शन केले. आशिर्वाद पर शब्द सुमनाने आध्यात्मिक समारोप साईनाथ महाराज वसमतकर महाराजांनी केले. साहित्यिक कवितेच्या शब्दगंधाने संचलन शेषराव पाटील गुरुजी यांनी केले.


या वेळी निरधारी जाधव, राजर्षी शाहू महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष भाग्यवान भवरे इलियास बावानी,राजु दराडे, नंदु कोलपवार, विनोद पाटील सुर्यवंशी,संजय घोगरे,केशव भगत, गणेश जाधव, संजय बनसोडे,अपिल बेलखोडे, फिरोज पठाण, प्रकाश मुनेश्वर रेणुकादास वानखेडे,दिगंबर जोशी, गोपाल खापर्डे, पुंडलिक हुम्बे,वैभव खराटे, शामराव राउतयांचे सह शहरातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक,व शासकिय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रम संपन्न झाला.



