Happiness increases | आनंद वाढतो वाटल्याने- द.भ.प.साईनाथ महाराज -NNL
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आनंद द्विगुणित करायचा असेल तर इतरांना त्या आनंदात सहभागी करून घ्या, आनंद दिल्याने-वाटल्याने वाढतो असे मत राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांनी व्यक्त केले.
माहुरगड येथील सद्गुरू राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज यांच्या मठा मध्ये दिनांक ९ जुलै रोजी चहा ची हाॅटेल चालवुन उपजिविका व सामाजिक कार्यात सदैव तत्पर व सेवावृत्तीचे विजय कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता.त्या अनुषंगाने राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते पत्रकारां च्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मठाचे प्रवक्ते भाऊ पाटील हडसणीकर, शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष सुधिर जाधव, प्रविण वाघमारे ,रेहमत भाई , जेष्ठ पत्रकार हाजी कादर दोसानी , नंदकुमार संतान, वसंतराव कपाटे, विजय आमले रणजीत वर्मा ,सौ.सुरेखा तळनकर ,नंगर पंचायत चे कार्यालयीन अधिक्षक वैजना...
