नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सिडको हडको भागासह वसरणी, नवीन कौठा जुना कौठा व ग्रामीण भागातील विष्णुपुरी, वाजेगाव, धनेगाव ,तुप्पा याससह पाच गावात एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन करण्यात आले तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया घोषणांनी स्वागत करून स्थापना करण्यात आली.शहरी भागात २२ तर ग्रामीण भागात १३ सार्वजनिक गणेश मंडळ यांनी आनलाईन परवानगी घेतली आहे. तर अनेक गणेश मंडळ यांनी परवानगी घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव चतुर्थी निमित्ताने सिडको हडको परिसरातील शहरी भागातील नरसिंह, श्री गणेश, रिघ्दी सिध्दी, अष्टविनायक, बाळ गणेश मंडळ ,आर्दश,महषी वाल्मीकी, नवयुवक, जयमल्हार जिजाऊ, वसरणीअसदवन,वाघाळा, राहुल वैभव नगर, हडको, सिडको,जिजाऊ, गरूडा, सिध्दी विनायक, महाकाल, एकता, विसावा गणेश मंडळ, शिवराज्य,शिव शंकर, जय भवानी, नवयुवक, विवेकानंद, शंभु गर्जना, युवा शक्ती,शिवपुत्र, केदारनाथ रविनगर, जुना कौठा व नवीन कौठा भागासह महाराणा प्रताप, ओकांर गणेश मंडळ हडको या गणेश मंडळांनी श्री मुर्ती स्थापना केली आहे तर परिसरातील विविध भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी रात्री उशिरापर्यंत ढोलताशांच्या गजरात भव्य मंडपात श्री गणपती बाप्पा मुर्ती स्थापना केली आहे.
ग्रामीण भागातील विष्णुपुरी, धनेगाव, वाजेगाव,गोपाळचावडी ,तुप्पा यासह जवळपास ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी भव्य मूर्ती आकर्षक व सुबक बसविल्या असुन रात्री उशिरापर्यंत स्थापना चालू होती, यावेळी ग्रामस्थ, महिला, युवक,बालके मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,ग्रामीण पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे,विजय कांबळे,उपनिरीक्षक बि.ई.चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले, ज्ञानेश्वर मठवाड यांच्यासह पोलीस अमलदांर, होमगार्ड, यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
शहरी भागातील ऑनलाईन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी २२ तर ग्रामीण भागात १३ परवानगी घेतली आहे तर एक गाव एक गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वडगाव, बोढांर, सिध्दनाथ,फतेपूर या गावात करण्यात स्थापना करण्यात आली आहे, सदरील माहिती गोपनिय शाखेचे बालाजी दंतापले,बालाप्रसाद टरके यांनी दिली. सिडको हडको परिसरासह ग्रामीण भागातील नागरीक व ग्रामस्थ यांनी ऊत्साहात आकर्षक व सुबक अशा मुर्ती खरेदीसाठी बाजारपेठ मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.