HomeनांदेडAlternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत...

Alternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत वाहतूकीची पर्यायी व्यवस्था -NNL

नवीन नांदेड| सिडको हडको परिसरातील मुख्य बाजारपेठेत दरवर्षी श्री गणेश मूर्ती खरेदी व पूजेचे साहित्य घेण्यासाठी मुख्य रस्त्यावर होत असलेली गर्दी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशन कर्मचारी, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, व छत्रपती शिवाजी चौक भागातील युवा कार्यकर्ते यांनी मुख्य वाहतूक पर्यायी मार्गवर वळवून नागरीकां सह विक्रेते यांना दिलासा दिला असून या केलेल्या सहकार्य बदल विक्रेता बांधवांनी व विविध प्रतिष्ठान यांनी अभिनंदन केले आहे.

दरवर्षी प्रमाणे सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे चौक ते राज कॉर्नर मार्गावर छत्रपती शिवाजी चौक, क्रांती चौक भागात विविध प्रतिष्ठानचे व्यापारी श्री मुर्ती विक्रीसाठी तर पूजेचे साहित्य ग्रामीण भागातील लोहा, कंधार, पालम, गंगाखेड व नांदेड तालुक्यातील अनेक गावातून मोठया प्रमाणात पूजेचे साहित्य विक्रीसाठी गेल्या दोन दिवसापासून विक्रीसाठी आणले आहेत.

IMG 20240907 WA0062 Alternative arrangement of transport : श्री गणेश मूर्ती खरेदीसाठी सिडको मुख्य बाजारपेठेत वाहतूकीची पर्यायी व्यवस्था -NNL

तर फळ विक्रेते, फुल विक्रेते मोठया प्रमाणात आले असल्याने होणारी गर्दी पाहता, व सर्वाना दिलासा मिळावा यासाठी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, सारंग नेरलकर व सेवानिवृत्त उपनिरीक्षक चोपडे, शिवाजी चौक भागातील युवा नेते उदय देशमुख युवा कार्यकर्ते रवि रायभोळे, शिवराज देशमुख, ज्ञानेश्वर भांगे,राजु कौलंबीकर यांच्या सह ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शना खाली सिडको शिवाजी चौकी येथे कार्यरत पोलीस अलंकार उध्दव भारती,एच.व्ही.माने,शहाजी जाधव, होमगार्ड दिपक देशपांडे,गोपीनाथ जाधव, अभिजात सोनसळे,सुनिता कुलकर्णी बंदोबस्त ठेवुन सहकार्य केले. यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी पाहणी करून व पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या कर्मचारी व होमगार्ड यांच्यी हजेरी घेतली. पर्यायी वाहतूक मुळे ग्रामीण भागातील पूजेचे साहित्य विक्री करणारे,फुल ,फळ,प्रसाद व मुर्ती विक्रीसाठी आलेल्या अनेक विक्रेत्यां कडून सिडको हडको परिसरातील हजारो नागरीक ,युवक महिला यांनी कुटुंबासह खरेदी केली व या उपक्रमाचे अभिनंदन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments