हिमायतनगर,अनिल मादसवार| एका युवा शेतकऱ्याने हुंड्याने केलेल्या शेतातील चार एकरातील हरभऱ्याच्या ढीगाऱ्याला कुणीतरी अज्ञाताने आग (An unidentified person set fire to the pile of gram) लावली आहे. हि घटना दिनांक १३ फेब्रुवारी गुरुवारच्या मध्यरात्री तालुक्यातील मौजे खडकी बा. येथे घडली आहे. यात शेतकरी गोपाल गणेश शिंदे यांचे अंदाजे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर शहरापासून जवळच असलेल्या खडकी बा. येथील युवा शेतकरी गोपाल गणेश शिंदे यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी हुंड्याने पाच एकर शेती केली आहे. त्यात खरिपात सोयाबीनचे जेमतेम उत्पादन झाले, म्हणून रब्बीच्या उत्पादनाने घरातील अडचण दूर होईल या आशेवर हरभऱ्याची पेरणी केली. थंडीने शेतकऱ्यांना साथ दिल्याने हरभऱ्याचे पीक जोमात आले. पाच एकरापैकी चार एकर रानातील हरभरा नुकताच काढून हरभरा ढग लाऊन ठेवला होता.


राहिलेला एका एकरातील हरभरा काढून हार्वेस्टर द्वारे काढण्याच्या तयारीत शेतकरी होता. मात्र यंदाचे आलेल्या हरभऱ्याचे उत्पादन देखावले न गेल्याने कुणीतरी अज्ञाताने गुरुवारी रात्री चार एकर हरभऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लावून दिली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यावर लक्षात आला. तीन महिन्याच्या मेहेनतीने पिकविलेले हरभऱ्याच्या ढगांचा राखोंडा दिसून आल्याने शेतकरी हतबल झाला आहे. याबाबत त्यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.


याबाबत शेतकरी गोपाल गणेश शिंदे यांनी सांगितले कि, आत्तापर्यंतच्या काळात कधी नव्हे एवढी लाग हरभऱ्याच्या प्रत्येक झाडाला आली होती. त्यामुळे अंदाजे ३५ ते ४० कुंटल हरभऱ्याचे उत्पादन होईल अशी अपेक्षा होती. मात्र कुणीतरी ढगाला आग लाऊन जवळपास २ लाखाचे नुकसान केले आहे. ज्याने हरभऱ्याचा ढग जाळला…. याच्याने त्याचा काय …? फायदा झाला अशी निराशाजनक प्रतिक्रिया शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधीस बोलताना देऊन या घटनेचा तपास लाऊन मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे डोल्हारी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील दोन एकर रानातील हरभऱ्याच्या ढगाला दिनांक १२ फेब्रुवारी रोजी कुणीतरी अज्ञाताने आग लावली होती. हि घटना ताजी असताना दोन दिवसाच्या फरकत मौजे खडकी येथे दुसरी घटना घडली. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराला गांभीर्याने घेऊन शेतकऱ्याचे नुकसान करणाऱ्या त्या…अज्ञाताचा शोध घेऊन अद्दल घडवावी जेणेकरून अश्या घटना करण्याची हिम्मत कुणी करणार नाही अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.


