
नविन नांदेड| महाविद्यालयीन जीवनात शिक्षण घेत असताना खेळाडू वृत्ती जोपासली पाहिजे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यासाबरोबरच अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग नोंदवून शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले.
येथील श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव नाईक महाविद्यालय वसरणी नवीन नांदेड येथे २९ ऑगस्ट हॉकीचे जादूगार महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस अर्थातच राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्याल याचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार हे होते.


याप्रसंगी ते बोलत होते.व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख,डॉ. साहेबराव मोरे,सांस्कृतिक विभाग प्रमुख, डॉ. व्यंकटेश देशमुख, प्रा.डॉ.नागेश कांबळेयांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात पुढे बोलताना डॉ.शेखर घुंगरवार म्हणाले की,आजच्या तरुण पिढीने हॉकीचे महान जादूगर मेजर ध्यानचंद यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात वाटचाल करावी. विविध क्रीडा स्पर्धात हिरिरीने सहभागी होऊन आपलं, कुटुंबाचं,समाजाचं व महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा प्राणीशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर विस्तृतपणे अभ्यास पूर्ण असे सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख डॉ.साहेबराव मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्थशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख प्रा.डॉ.नागेश कांबळे यांनी मानले,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाचे सहायक प्राध्यापक डॉ.राहुल सरोदे यांनी विशेष परिश्रम घेतले.


यावेळी डॉ.पी.बी.बिरादार,डॉ.जी.वेणूगोपाल,डॉ.यु.एस.कानवटे, डॉ. अनिल गच्चे,डॉ.विजय मोरे, डॉ.गणेश लिंगमपल्ले,डॉ.दिलीप पालीमकर, डॉ.आर.एम.कांगणे,डॉ.साहेबराव शिंदे,डॉ.संजय गिरे, डॉ.संतोष शिंदे, डॉ.एस.व्ही.शेटे,डॉ.एल.व्ही. खरात, प्रा. कपिल हिंगोले, प्रा. नितीन मुंडलोड, प्रा. करण राठोड, प्रा. कांबळे,प्रा.हाळे, प्रा.सुरेश तिवारी,प्रा. अशोक आळणे,प्रा.शशिकांत हटकर, प्रा.पुयड,प्रा.प्रबुद्ध चित्ते,यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी व असंख्य विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.




