लोहा l ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरण यंदा गुरुवारी(२८ ऑगस्ट,) रोजी सकाळी पूर्ण भरले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाचे सात दरवाजे दशांश पाच मीटरने उचलले त्यातून330 क्युमेंक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत अहमदपूर, रेणापूर ,आंबेजोगाई या भागात जोरदार पाऊस झाल्याने दुपारी धरणाचे सर्व १५ दरवाजे दीड मीटर उचलण्यात आले.त्यातून नदीपात्रात ७०हजार ५८०क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.


नदीकाठच्या१३ गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर आमदार प्रतापराव पाटील यांनी भरपावसात अतिवृष्टी झालेल्या भागांत जाऊन पाहणी केली .प्रशासनाना सूचना केल्या पूरपरिस्थिती ओढवलेल्या भागातील नागरिकांना दक्षता घेण्याचे अहवान केले

उर्ध्व मानार प्रकल्प ( लिंबोटी ) धरणाची पाणी पातळी- 447.56 मिटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा- 75.09 द.ल.घ.मी. इतका आहे धरण पूर्ण भरले आहे.


गुरुवारी ( २८ ऑगस्ट) रोजी सकाळी धरणाचे सात दरवाजे दशांश पाच मीटरने उचलले .धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अहमदपूर, रेणापूर, आंबेजोगाई व लोहा तालुक्यातील धरण परिसरात जोरदार पाऊस झाला., धरणात पाण्याची आवक ४३.३९ दलघमी इतकी असून दुपार नंतर धरणाचे १५ दरवाजे दीड मीटरने उचलण्यात आले.

मान्यड नदीपात्रात७०५८०क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग आठ तासापासून सुरू होता र्ध्व मानार पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता एम यु कमठाणे बी.टी.रानवळकर- पुर नियंत्रण अधिकारी (लिंबोटी धरण).बी टी राणवळकर , बी.एम.खेडकर, एस.ई.बारोळे, एस.एस.माळी, व्ही.डी.सोनटक्के, एस.जी.वाघमारे, यु.एन.व्यवहारे . डी.डी. चौरे हे सर्व पूर नियंत्रण कक्ष कर्मचारी धरणाच्या पाणीपातळीवर प्रत्यक्ष लक्ष ठेवून आहेत
पूरग्रस्त भागात नागरिकांनी दक्षता घ्यावी -आ चिखलीकर
पावसाची संततधार त्यात दोन्ही तालुक्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. तसकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन पाहणी केली प्रभारी उपविभागीय अधिकारी रामेश्वर गोरे, तहसीलदार परळीकर बीडीओ कुळकर्णी यासह संबधीताना सूचना दिल्या पूरग्रस्तांना सुरळीत स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूरपरिस्थिती बाबत अवगत केले.नागरिकांनी पुरग्रस्त भागात नागरिकांना दक्षता घ्यावी असे आवाहन केले
नदी काठच्या १३ गावात सतर्कतेचा इशारा
मान्यड नदीपात्रात लिंबोटी धरण व सततच्या पावसामुळे ७९ हजार ,क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे मान्यड नदी काठा लगत लोहा तालुक्यातील लिंबोटी ,डोंगरगाव चोंडी , दगड्संगावी मांजरे सांगवी , तर कंधार तालुक्यातील बोरी खु , उमरज , शेकापूर , घोडज हणमंतवाडी , संगमवाडी , वाडी इमामवाडी, या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे अहवान लोहा तहसीलदार विठ्ठल परळीकर, कंधार तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केले आहे
पांगरी पेनूर रस्ता बंद
लोह्याकडून पेनूरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पांगरी या गावातील नदीवर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा मार्ग काही वेळ बंद होता. या पुलाची उंची तसेच नदीचे खोलीकरण करण्याची गरज आहे

