Urdhva Manar (Limboti) dam ; ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडले; मान्यड नदीपात्रात ७०हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग
लोहा l ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरण यंदा गुरुवारी(२८ ऑगस्ट,) रोजी सकाळी पूर्ण भरले सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास धरणाचे सात दरवाजे दशांश पाच मीटरने उचलले त्यातून330 क्युमेंक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला. पण धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत अहमदपूर, रेणापूर ,आंबेजोगाई या भागात जोरदार पाऊस झाल्याने दुपारी धरणाचे सर्व १५ दरवाजे दीड मीटर उचलण्यात आले.त्यातून नदीपात्रात ७०हजार ५८०क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता.
नदीकाठच्या१३ गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर आमदार प्रतापराव पाटील यांनी भरपावसात अतिवृष्टी झालेल्या भागांत जाऊन पाहणी केली .प्रशासनाना सूचना केल्या पूरपरिस्थिती ओढवलेल्या भागातील नागरिकांना दक्षता घेण्याचे अहवान केले
उर्ध्व मानार प्रकल्प ( लिंबोटी ) धरणाची पाणी पातळी- 447.56 मिटर इतकी असून उपयुक्त पाणीसाठा- 75.09 द.ल.घ.मी. इतका आहे धरण पूर्ण भरले आहे.
गुरुवा...
